Chhatrapati Shivaji Maharaj Fort In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे गड -किल्ले

Chhatrapati Shivaji Maharaj Fort In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे गड -किल्ले, महाराष्ट्राच्या इतिहासात गड-किल्ल्यांना अनन्य साधारण महत्व आहे . सध्या मार्च महिना चालू आहे लवकरच उन्हाळ्याची सुट्टी लागेल तेव्हा कुठे फिरायला जायचा प्लान करताय कि नाही? भारत भर फिरायचा विचार आहे का ? कि परदेशात जायचं आहे ? अहो भारत तर बघाच किंवा परदेशात पण जा पण त्या आधी महाराष्ट्र बघितला का हे सांगा? महाराष्ट्रातले गडकिल्ले बघितले का हे सांगा ? नाही ना ! मग ह्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची सफर नक्की करा .आणि आपल्या इतिहासाचा आनंद घ्या . Chhatrapati Shivaji Maharaj Fort In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे गड -किल्ले या लेखात आपण महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती घेणार आहोत .त्या गड -किल्ल्यांवर कसे जायचे ? कधी जायचे? जतन करताना कोणती काळजी घ्यायची अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत .

शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेले हे गड किल्ले मराठ्यांचा इतिहास प्रकर्षाने सांगतात . संपूर्ण महाराष्ट्रात असलेले हे किल्ले स्वराज्यात सामावून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी किती कसोशीने प्रयत्न केले असतील हे आपण इतिहास वाचला कि आपल्या लक्षात येते. शिवाजी महाराजांनी गड-किल्ले महाराष्ट्रात आणले खरे पण अनेक आक्रमणे झाली त्यामुळे या गड किल्ल्यांची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली . पण आजच्या २१ व्या शतकात सुद्धा हे गडकिल्ले ताठ मानेने उभे आहेत .आता ह्या गडकिल्ल्यांची जपणूक करणे, किल्ल्यांवर स्वच्छता ठेवणे , गडाच्या किंवा किल्ल्याच्या सौंदर्याला धक्का लागणार नाही या कडे लक्ष ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे .

Chhatrapati Shivaji Maharaj Fort In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे गड -किल्ले यात महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती तर घेऊ या पण त्या आधी गड किल्ले फिरताना कोणती काळजी घ्यायची , किल्ल्यावर गेल्यावर कोणत्या गोष्टी करू नये याची माहिती घ्या कारण महाराष्ट्र शासन ,पुरातत्व विभाग किंवा काही दुर्ग प्रेमी संस्था किल्ल्यांची स्वच्छता करायचा काम करतच असतात पण आपण हि त्या वास्तूच काहीतरी देण लागतो हे लक्षात ठेवा आणि मग किल्ले फिरायला सुरुवात करा .

Chhatrapati Shivaji Maharaj Fort In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे गड -किल्ले

गड किल्ल्यांची अशी काळजी घ्या :

गड किल्ल्यांवर प्लास्टिक बाटल्या टाकू नये .

गड किल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहेत हे लक्षात ठेवून गड किल्ल्यांवर जाताना दारूच्या बाटल्या घेऊनच जाऊ नये .

काचेच्या बाटल्यांमुळे तेथील स्थानिक लोकांना किंवा गाई गुरांना त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा .

गड किल्ल्यांच्या भिंतींवर प्रेम संदेश लिहू नये .

गड चढताना तहान लागते म्हणून च्युइंगम खाता आणि तेच च्युइंगम खाऊन झाल कि कुठल्यातरी झाडाला किंवा दगडाला चिकटवता हो ना ? असे करू नका .

अर्धवट खाल्लेले अन्न पदार्थ किल्ल्यांवर टाकू नका .

गड किल्ल्यांवरील तलावात पाण्याच्या बाटल्या ,खाऊचे रिकामे पाकिट टाकू नका .

गड किल्ल्यांवरील तलावात हात पाय धुवू नये .

गड किल्ल्यांवरील झाडांना प्राण्यांना हानी होणार नाही याची काळजी घ्यावी .

ट्रेकिंगला जाताना अशी घ्या काळजी :

chhatrapati shivaji maharaj fort in marathi trekking

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात ट्रेकिंगला किंवा गड किल्ले बघायला जाताना काही विशेष काळजी घेणा खूपच गरजेचा असता म्हणूनच गड किल्ल्यांची काळजी कशी घ्यायची हे तर आपण बघितला त्याचप्रमाणे ट्रेकिंग ला जाताना आपण कोणती काळजी घ्यायची हे बघुयात .

एकट्याने ट्रेक करण्यापेक्षा ग्रुप बरोबर ट्रेक करावा .

ज्या ठिकाणी ट्रेकला जायचे आहे त्या ठिकाणाची अगोदरच माहिती काढून ठेवा .

किती दिवस ट्रेक ला जाणार आहात त्या प्रमाणे कपडे आणि बाकी समान सोबत ठेवा .

ट्रेकिंगला जाताना एक दोरखंड सोबत असावा .

पावसाळ्याच्या दिवसांत अवघड ठिकाणी ट्रेक ला जाणे टाळावे .

मुसळधार पावसात ट्रेक करण्याचा हट्ट करू नये .

पावसाळ्यात शेवाळ आलेले असते त्यामुळे पाय घसरून तोल जाण्याची शक्यता असते .

उन्हाळ्याच्या दिवसांत ट्रेकला जाताना पाण्याची बॉटल , चोकोलेत, सोबत ठेवा .

उष्माघाताचा त्रास होवू शकतो त्यामुळे लिंबू पाणी ताक ,मठ्ठा यासारखे पदार्थ सोबत ठेवा .

उन्हाळ्याच्या दिवसांत ट्रेक करताना टोपी .चष्मा ,छत्री वापरा .

उन्हाळ्याच्या दिवसांत ट्रेकला जाताना अंगभर सैल कपडे घाला म्हणजे सुर्याकिरणांचा त्वचेला त्रास होणार नाही .

उन्हाळ्याच्या दिवसांत ट्रेकला जाताना अंगाला सन स्क्रीन लावा.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे गड -किल्ले

आज आपण शिवाजी महाराज्यांच्या शिवनेरी किल्ल्याची माहिती घेऊ त्या किल्ल्यांवर कसे जाऊ शकतो .कोणते रेल्वे स्टेशन त्या किल्यापासून जवळ आहे .बसने जाऊ शकतो का? कसे जायला लागेल ?याबद्दल सविस्तर माहिती बघुयात :

१) शिवनेरी किल्ला ( Shivneri Fort Information in marathi )

chhatrapati shivaji maharaj fort in marathi  shivneri fort

किल्ल्याचा इतिहास :

इसवी सन ११७० ते १३०८ या काळात यादवांनी नाणेघाट टेकडीवर शिवनेरी किल्ला बांधला . त्यानंतर १४४३ मध्ये यादवांचा पराभव करून मालकांनी हा किल्ला ताब्यात घेतला. १६ व्या शतकात अहमद नगरच्या सुलतानाला हा किल्ला देण्यात आला होता .१५९५ मध्ये अहमद नगरच्या सुलतानाने मालोजी भोसले म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज्यांचे आजोबा यांना हा किल्ला भेट म्हणून दिला .१९ फेब्रुवारी १६३० ला याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला .१८२० मध्ये तिसऱ्या इंग्रज -मराठा युद्धानंतर हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात आला.

पूर्वी नाणेघाट हा व्यापारासाठी महत्वाचा मार्ग मानला जायचा .यावर नियातार्ण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा असा अंदाज आहे .नाणेघाट या डोंगरांगे मध्ये शिवनेरी , चावंड, जीवदान, हडसर हे देखील किल्ले आहेत

राणी जिजाबाईंनी शिवाई देवी ला नवस कला होता कि पुत्र झाला तर तुझे नाव त्याला ठेवीन .१९ फेब्रुवारी १६३० लासूर्यास्ता नंतर याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला . जिजाबाईंनी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले.

शिवनेरी किल्ल्याची माहिती :

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास २००० वर्ष पूर्वीचा आहे .

शिवनेरी किल्ला समुद्रसपाटीपासून जवळ जवळ ३५०० फुट इतका उंच आहे .

शिवनेरी किल्याला सात दरवाजे आहेत .हे दरवाजे वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या वेळी बनवले आहेत .

शिवनेरी किल्ल्याला ४००-५०० पायऱ्या आहेत .

शिवनेरी किल्ला चढायला एक तास लागतो

शिवनेरी किल्ल्यावरील प्रेक्षणीय ठिकाणे :

१. शिवाई देवी मंदिर

२. बदामी पाण्याचे तळे

३.कडेलोट बुरुज

४. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाची इमारत

५. इंदगाह

६.कमानी मशीद

७. हमामखाना

८. गंगा जमुना पाण्याची टाकी

९.अंबरखाना

तसेच शिवनेरी किल्ल्यावर वीर मावळ्यांची तीन उद्याने देखील आहेत

१. तानाजी मालुसरे उद्यान

२.बाजीप्रभू देशपांडे उद्यान

३.जीव महाला उद्यान

शिवनेरी किल्ल्यावर कसे जावे ? ( How to Reach Shivneri Fort)

बस सेवा :

जुन्नर शहरापासून शिवनेरी किल्ला २ km अंतरावर आहे . तुम्ही बसने किंवा स्वतःच्या गाड्यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊ शकता .

रेल्वे सेवा :

शिवनेरी किल्ल्यापासून पुणे रेल्वे स्टेशन ९५ km अंतरावर आहे. या स्टेशन वरून अनेक खाजगी गाड्या उपलब्ध आहे .

शिवनेरी किल्ल्यापासून तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन ८२ km अंतरावर आहे.

विमान सेवा :

शिवनेरी किल्ल्यापासून पुणे विमानतळ ८८ km अंतरावर आहे .

शिवनेरी किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ,मुंबई विमानतळ १५६ km अंतरावर आहे .

विमानतळापासून जुन्नर ला जाण्यासाठी MSRTC बस देखील उपलब्ध आहेत तसेच कॅब भाड्याने घेऊ शकता .

शिवनेरी किल्ल्याला भेट देताना घ्यावयाची काळजी :

किल्ला फिरायला एक तास एवढा वेळ लागतो त्यामुळे सोबत पाण्याची बाटली आणि खायचे पदार्थ सोबत ठेवा .

कॅमेरा सोबत ठेवा .

गरज भासल्यास मार्ग दर्शक घ्या .

किल्ल्यावर कचरा करू नका. किल्ला स्वच्छ ठेवा .

ऐतिहासिक वास्तूची हानी होणार नाही याची काळजी घ्या .

शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ :

१. तुम्ही किल्ल्याला कोणत्याही वेळी भेट देऊ शकता .

२. ऑक्टोबर ते मार्च महिन्यात तेथे गर्दी असते . हवामान थंड असते त्यामुळे आरामात किल्ला पाहू शकता .

३. उन्हाळ्याच्या ,दिवाळीच्या सुट्टीतही तुम्ही जाऊ शकता .

शिवनेरी किल्ल्याचे प्रवेश शुल्क आणि प्रवेशाची वेळ :

१. प्रवेशाची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ५ आहे .

२. रात्रीच्या वेळी ट्रेकिंगला परवानगी नाही .

३. प्रवेश शुल्क : प्रवेश शुल्क आकारले जात नाही .सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे .

FAQ

१. शिवनेरी किल्ला किती फुट आहे ?

ans : शिवनेरी किल्ला समुद्र सपाटीपासून ३५०० फुट उंच आहे .

२. शिवनेरी किल्ला का प्रसिद्ध आहे?

ans : शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज्यांचे जन्मस्थळ म्हणू प्रसिद्ध आहे .

३. शिवनेरी किल्ला हा कोणत्या प्रकारचा दुर्ग आहे :

ans :शिवनेरी किल्ला हा गिरिदुर्ग या प्रकारचा किल्ला आहे .

४. शिवनेरी किल्ल्यावर रोपवे आहे का ?

ans : शिवनेरी किल्ल्यावर रोपवे नाही आहे .

निष्कर्ष :

Chhatrapati Shivaji Maharaj Fort In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे गड -किल्ले या लेखात आपण गड किल्याना भेट देताना कोणती काळजी घ्यायाला हवी . आपल्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन कसे करावे आणि ह्या वस्तूंना आपल्या कडून हानी होणारा नाही याची खबरदारी कशी घ्यावी हा बद्दल माहिती बघितली .तसेच शिवनेरी या किल्ल्याची देखील माहिती बघितली. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास ,किल्यावरील प्रेक्षणीय स्थळे , किल्ल्यावर कसे जावे जाताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती बघितली . असेच अजून काही गड किल्ल्यांची माहित पुढील लेखात बघुयात .लेख आवडला असल्यास आम्हाला नक्की कळवा . आणि आपल्या प्रियजनांना लेख नक्की शेयर करा .धन्यवाद .

(आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाला एकदा तरी भेट नक्की द्या )