CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांच्या हाडांच्या उत्तम वाढीसाठी कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थ

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांच्या हाडांच्या उत्तम वाढीसाठी कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थ, बाळ गर्भात असल्यापासून आई त्याच्या उत्तम वाढीसाठी सतत काळजी करत असते. गर्भारपणात पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन बाळाला त्या अन्नपदार्थांवर पौष्टिक गुणधर्म कसे मिळतील याकडे आईचे सतत लक्ष असते. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाचे उत्तम आरोग्य घडवण्यासाठी आई दिवस-रात्र मेहनत करत असते. त्याला हवे नको ते बघत असते.

बाळ जन्माला आल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असते. आईच्या दुधातून त्याला गरजेपुरते कॅल्शियम मिळत असते. सहा महिन्यानंतर बाळाला द्रवपदार्थ खाऊ घालण्यास सुरुवात केली जाते. साधारण एक वर्षानंतर बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते. ज्यावेळेस बाळाला आईच्या दुधा व्यतिरिक्त अन्नपदार्थ दिले जातात त्यावेळी त्या अन्नपदार्थांमध्ये किती पोषणमूल्य आहे हे माहीत असणे खूप गरजेचे असते.

अशावेळी आपण बाळाला अन्नपदार्थ देत आहोत त्या अन्नपदार्था तून बाळाला कॅल्शियम, लोह, प्रोटीन मिळतात की नाही बघणे खूप गरजेचे आहे. बाळाच्या उत्तम शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी हे सर्व घटकांची खूप आवश्यकता असते. यावेळी आईने सतर्क असणे खूप गरजेचे असते. बाळाच्या हाडांचा विकास होण्यासाठी त्याचबरोबर चांगल्या प्रतीचे दात तयार होण्यासाठी व त्या दातांचा विकास होण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणे खूप गरजेचे असते. खरे तर लहानपणापासून शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम पुरवले गेले तर भविष्यात सुद्धा त्या बाळाला हाडांचे, दातांचे, किंवा मूत्रपिंडाचे विकार होण्याची शक्यता खूप अंशी कमी होते. शरीरात कॅल्शियमची योग्य पातळी असल्यास ऑस्टिओपोरोसिस यासारख्या रोगापासून शरीराचे संरक्षण होऊ शकते.

आपल्याला सर्वांनाच माहित आहे की डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजेच दूध, पनीर, दही यासारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते. परंतु डेअरी प्रोडक्ट्स व्यतिरिक्त देखील असे काही पदार्थ आहेत ज्यामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते. आजच्या या लेखात आपण दुधात व्यतिरिक्त कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थ बघणार आहोत.

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांच्या हाडांच्या उत्तम वाढीसाठी कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थ आजच्या या लेखात आपण शरीरासाठी कॅल्शियम का महत्वाचे असते हे बघणार आहोत, त्याच बरोबर कॅल्शियमच्या अभावामुळे कोण कोणते रोग होऊ शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत. रोजच्या दैनंदिन आहारात किती कॅल्शियमची आवश्यकता असते याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तसेच दुधा व्यतिरिक्त कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थांचे ओळख करून घेणार आहोत. त्याच बरोबर काही सोप्या आणि सहज बनवता येतील अशा कॅल्शियम समृद्ध पाककृती बघणार आहोत.

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांच्या हाडांच्या उत्तम वाढीसाठी कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थ

मुलांच्या शरीरासाठी कॅल्शियमची का आवश्यकता असते?

1) कॅल्शियम चा मुख्य उपयोग म्हणजे हाडांचे आरोग्य उत्तम राखणे, यात हाडांचे योग्य पद्धतीने प्रसरण आणि आकुंचन होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.

2) शरीरातील हाडे, दात, केस, नखे यांच्या वाढीसाठी आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.

3) शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य पद्धतीने चालण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.

4) पेशींचे योग्य पद्धतीने विभाजन होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.

5) हृदयाचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी देखील कॅल्शियम जबाबदार असतात.

हे हि वाचा

६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/

२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/

लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/

मुलांच्या दैनंदिन आहारात किती कॅल्शियम आवश्यक असते? ( अंदाजे)

0-6 महिने: 200 mg

6-12 महिने:260 mg

एक ते तीन वर्षे: 700 mg

चार ते आठ वर्ष:1000 mg

9 ते 18 वर्षे :1300 mg

(वरील सांगितलेले कॅल्शियमचे प्रमाण हे अंदाजे सांगितलेले आहेत. प्रत्येक मुला-मुली नुसार त्यांच्या वयानुसार हे प्रमाण वेगवेगळे असू शकते.)

कॅल्शियमच्या अभावामुळे उद्भवणारे आजार:

ऑस्टिओपोरोसिस

सांधेदुखी

स्नायू आखडणे

स्नायूंमध्ये क्रॅम्प येणे

दात कमकुवत होणे/ तुटणे

नखे आणि केस कमकुवत होणे

हृदयरोग/ हार्ट अटॅक

ब्लडप्रेशर

स्ट्रोक

त्वचा कोरडी होणे

लहान मुलांसाठी कॅल्शियम युक्त पदार्थांची माहिती:

1) डेअरी प्रोडक्ट्स:

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की दूध दही पनीर यासारख्या डेअरी प्रोडक्ट्स मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे लहान मुलांच्या दैनंदिन आहारात या पदार्थांचा उपयोग करणे फायदेशीर ठरते. दररोज किमान एक ग्लास दूध मुलांना प्यायला दिल्याने त्यांना योग्य ते कॅल्शियम मिळू शकते.

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI

2) सोया दूध:

सोया दूध देखील आता भरपूर प्रमाणात प्रचलित झाले आहे. सोयाबीन पासून बनवलेल्या दुधाला सोया दूध म्हणतात. या दुधामध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते. सोया दुधात गाईच्या दुधात असतात इतकेच कॅल्शियम उपलब्ध असते.

3) नाचणी/ नागली:

नागली मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते. कॅल्शियम बरोबरच नागली मध्ये लोह देखील उपलब्ध असते. लहान मुलांना दररोज नागलीची पेज द्यावी. तसेच तुम्ही नागलीचे थालीपीठ, डोसा, इडली बनवून मुलांना देऊ शकतात.

हेही नक्की वाचा

वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/

शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/

वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/

वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/

झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/

4) राजगिरा:

राजगिरा मध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. आपल्याकडे राजगिरा उपवासाला खाल्ला जातो. परंतु लहान मुलांना रोजच्या आहारात राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की किंवा राजगिरा पिठाची पेज किंवा त्याचा शिरा बनवून दिल्यास शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते.

5) बदामाचे दूध:

बदामामध्ये भरपूर प्रमाणात लोह, प्रोटीन, आणि कॅल्शियम उपलब्ध असते. तुम्ही लहान मुलांना दररोज रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी बदाम खायला देऊ शकतात. मुलांना बदाम चावून खाणे आवडत नसल्यास बदाम बारीक करून त्याचा मिल्कशेक बनवून देखील तुम्ही मुलांना देऊ शकता. शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळवून देण्यासाठी बदामाचे दूध हा एक उत्तम पर्याय आहे.

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI

6) अंजीर:

अंजीर हे एक ड्रायफ्रूट आहे. अंजीर मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, विटामिन सी, विटामिन ए, मॅग्नेशियम आणि लोह उपलब्ध असते त्याचबरोबर अंजीर मध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट देखील असतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंजीर चा उपयोग करणे फायद्याचे ठरते. रोज रात्री अंजीर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्यास बद्धकोष्ठता सारखे आजार दूर होण्यास मदत होते.

7) संत्री/ अननस:

संत्री आणि अननस या फळांमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते त्याचबरोबर कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे रोजच्या आहारात संत्री आणि अननसाचा समावेश करणे फायद्याचे ठरते.

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI

8) चिया सीड:

चिया सीड मध्ये कॅल्शियम उपलब्ध असते कॅल्शियम बरोबरच इतर अनेक पोषणमूल्य चिया सीड मध्ये असते. चियासीड चा उपयोग शक्यतो वजन कमी करण्यासाठी केला जातो. चिया सीड पाण्यात भिजवून आणि मग खाल्ले जातात. तुम्ही सरबतामध्ये किंवा ज्यूस मध्ये भिजवलेले चिया सीड टाकून खाऊ शकतात.

9) हिरव्या पालेभाज्या:

हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, भेंडी, ब्रोकोली, बीन्स, हिरवे वाटाणे यामध्ये भरपूर कॅल्शियम उपलब्ध असते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, लोह, विटामिन ए आणि इतर खनिजे देखील उपलब्ध असतात. त्यामुळे रोजच्या आहारात एका तरी हिरव्या पालेभाजीचा समावेश आवश्यक असावा.

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI

10) तीळ:

तिळा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, विटामिन डी 6, तांबे, विटामिन ई उपलब्ध असते रोजच्या आहारात एक चमचा तिळाचा समावेश करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात तिळाचा समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते.

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI

लहान मुलांसाठी कॅल्शियम समृद्ध सहज सोप्या पाककृती:

1) नागली+ राजगिरा पेज:

साहित्य:

तूप

तेल

हिरव्या मिरचीचा लहान तुकडा

जिरे

लसूण

मीठ

पाणी

कृती:

1) सहा महिने ते एक वर्षाच्या बाळासाठी नागली- राजगिरा पेज:

तुपात गरजेनुसार नागली आणि राजगिरा चे पीठ थोडे भाजून घ्या. त्यानंतर त्यात पाणी टाकून पातळसर पेज बनवून घ्या. थोडी थंड झाल्यावर तुम्ही बाळाला पेज देऊ शकता.( तुम्ही जर बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये मिठाचा वापर करत असल्यास पेज बनवताना देखील थोडे मीठ टाका.)

2) दीड वर्षाच्या पुढील बाळांसाठी नागली राजगिरा पेज:

तेलात थोडे जिरे, लसुन आणि हिरवी मिरची टाकावी गरजेनुसार नागली आणि राजगिऱ्याचे पीठ टाकून थोडे भाजून घ्या. त्यानंतर त्यात पाणी टाकून घट्टसर पेज बनवून घ्या. थोडे मीठ टाकून ते चांगले शिजवून घ्या. थोडे थंड झाल्यावर त्यावर थोडेसे तूप टाकून बाळाला तुम्ही देऊ शकता.

3) राजगिरा चा शिरा:

साहित्य:

राजगिरा पीठ

तूप

साखर/ गुळ

पाणी/ दूध

कृती:

1) राजगिरा पीठ तुपावर खमंग भाजून घ्या.

2) त्यानंतर त्यात गरम पाणी किंवा गरम दूध टाकून शिजवून घ्या.

3) शिजल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार साखर किंवा गूळ टाकून पुन्हा एकदा शिजवून घ्या.

4) तयार झालेल्या राजगिरा शिरा तुम्ही मुलांना देऊ शकता.

4) तिळाची चिक्की/ लाडू:

साहित्य:

तीळ

गुळ

तूप

कृती:

1)तीळ चांगले भाजून बाजूला काढून घ्या.

2) कढईत गुळाचा पाक बनवून त्यात थोडे तूप घाला त्यात भाजलेले तीळ घाला आणि मिश्रण चांगले मिक्स करून त्याचे आवडीनुसार लाडू किंवा चिक्की बनवून घ्या.

5) गुळ शेंगदाणा लाडू:

साहित्य

भाजलेले शेंगदाणे

गुळ

कृती :

भाजलेले शेंगदाणे आणि गुळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक झालेल्या मिश्रणाचे लहान लहान लाडू वळून घ्या. दररोज एक लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता.

6) डाळ पालक:

साहित्य:

तुरीची डाळ

मुगाची डाळ

पालक

टोमॅटो

लसूण

हिरवी मिरची

जिरे

तेल

मीठ

पाणी

कृती:

1) तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुऊन शिजवून घ्या.

2) पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.

3) तेलात जिरे, लसुन आणि हिरवी मिरची टाका .

4) वरील सर्व साहित्य तेलात व्यवस्थित परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला पालक घाला. पालक व्यवस्थित शिजवून घ्या.

5) त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली तुरीची आणि मुगाची डाळ घाला. गरजेनुसार पाणी आणि मीठ टाका आणि डाळ पालक चांगली शिजवून घ्या.

6) डाळ पालक ला चांगली उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. आणि झाकण ठेवून परत एकदा शिजवून घ्या.

7) तयार झालेल्या डाळ पालक तुम्ही मुलांना पोळीसोबत किंवा भातासोबत देखील देऊ शकतो.

निष्कर्ष:

CALCIUM RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांच्या हाडांच्या उत्तम वाढीसाठी कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थ, या लेखात आपण कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थांची थोडक्यात माहिती घेतली. कॅल्शियम चा अभाव असल्यास कोणकोणते आजार उद्भवू शकतात हे बघितले. त्याचबरोबर कॅल्शियम समृद्ध सहज सोप्या पाककृती ज्या तुम्ही लहान मुलांना देऊ शकतात त्या बघितल्या. असेच महत्त्वपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला आवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

(वरील लेखात सांगितलेले कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थ हे सर्वसामान्य माहितीच्या आधारे सांगितलेले आहे. तुमच्या मुलांच्या आहारात कॅल्शियम समृद्धी अन्न पदार्थांचा समावेश करण्याआधी त्यांना त्या पदार्थांचे एलर्जी आहे का हे एकदा तपासून त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)