Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या लेखात आपण आपल्या लाडक्या , खोडकर ,प्रेमळ बहिणीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे संदेश बघणार आहोत . आई सारखा आपल्या वर प्रेम करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे आपली बहिण . बहिण लहान असो वा मोठी पण आपल्या हृदयात बहिणीसाठी विशेष असा स्थान असता .मोठी बहिण असेल तर ती आई सारखी माया लावते आपले सगळे हट्ट पुरविते, आपले लाड करते , आणि जर बहिण लहान असेल तर ती आपल्या खोड्या काढते ,त्रास देते , आपल्याकडे हट्ट करते पण तेवढाच आपल्यावर प्रेम देखील करते. आपल्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस असेल तर मग celebration तर व्हायलाच हवे , त्याच बरोबर जर बहिण आपल्या पासून लांब राहत असेल तर मग तिला वाढदिवसाचे खास शुभेच्छा संदेश तर आपण नक्कीच पाठवतो , Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या लेखात आपण असेच छान छान शुभेच्छा संदेश बघणार आहोत .

birthday wishes for sister in marathi

माझ्या प्रेमळ, गोड , काळजी घेणाऱ्या ,

वेडया बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले ,

लहानपणी हातात हात देऊन वाढवालस,

अशीच तुझी साथ आयुष्यभर लाभू दे,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

तू एक सुंदर व्यक्ती ,

विश्वासू मैत्रीण ,

आणि माझी खास बहिण आहेस ,

तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे ,

अश्या माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या इच्छा , तुझ्या आकांशा ,

उंच उंच भरारी घेवू दे ,

मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

व्हावीस तू शतायुषी ,

व्हावीस तू दीर्घायुषी ,

माझी एकच इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

आई बाबा मित्र मैत्रिणी आणि भावासाठी हि वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधताय मग हे हि बघा

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Birthday Wishes for Mother In Marathi | आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशBirthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मित्र मैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशBirthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश100+Birthday Wishes For Brother In Marathi 2024 | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी

नेहमी बाबांना नाव सांगणारी ,

पण वेळ आल्यावर नेहमी ,

आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात ,

कधीकधी तर तू मला आईच वाटतेस ,

माझ्या भावनांना केवळ तूच समजून घेतेस ,

हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी खंबीर होवून बळ देतेस …!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक जन्मी देवाने ,

मला तुझ्यासारखी बहिण द्यावी,

हीच माझी इच्छा ..!

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

चंद्रा मुळे असतात चांदण्या मस्त ,

चांदण्यांमुळे असते रात्र मस्त ,

रात्री मुळे होते life मस्त ,

आणि या जगात माझी बहिण सर्वात जबरदस्त ..!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

माझ्यासाठी नेहमी भांडणारी ,

परंतु वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने आणि

खंबीर पणे मला साथ देणाऱ्या माझ्या प्रिय बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी

कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहिण ….

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

मी खूप भाग्यवान आहे ,

मला बहिण मिळाली ,

माझ्या मानतील भावना समजणारी ,

मला एक सोबती मिळाली ,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहिण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहिण म्हणून मिळाली ,

बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

कुठल्याही कामात नेहमी excited असणारी ,

मी काही काम सांगितल कि नेहमी कारण देणारी,

मी कशी दिसते हा प्रश्न मला रोज विचारणारी ,

तिला मुद्दाम चिडवायला ,

आणि फुगलेले गाल बघायला मला खूप मज्जा येते

पण कधी मला बर नसेल तर माझ्या बाजूला बसून माझी काळजी घेणारी,

मी आहे तू कशाला tension घेतोस स ठाम पणे म्हणणारी माझी लाडकी ताई ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

बाबांची परी ती ,

अन सावली जणू आईची ,

कधी प्रेमळ कधी रागीट

हि कविता आहे माझ्या ताईची

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

जरी आपण छोटया छोटया गोष्टींवर ,

उंदीर मांजराप्रमाणे भांडत असलो तरीही

शेवटी तुला जे हवे ते मी देईन ,

कर्ण तू माझे हृदय आहेस .

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी …!

बहिण असते खास

तिच्याशिवाय जीवन आहे उदास

कधी नाही बोललो पण सर्वाधिक प्रिय आहे

मला माझ्या बहिणीची साथ…!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for sister in marathi

उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो

बहरलेली फुले तुला सुगंध देवो

आणि परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

तुझ्यासाठी झाली क्षितिजावर रंगांची दाटी

बघ सारी सृष्टी फुलली तुझ्या साठी

तुझ्यासाठी वसंत यावा हर एक कशाचे पायी

परीपुर्तीच्या यशोदिपाने तव जीवन उजळून जाई …..!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

तू फक्त माझी लहान बहिण नाहीस ,

तर तू माझा HAPPINES ,

माझा JOY

आणि माझी LIFE आहेस ,

हैप्पी बर्थडे माय CUTE LITTLE सिस्टर …!

आपण जगात हजारो नाती बनवतो ,

पण त्यातील काहीच नाती शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात ,

असेच आपले नाते ,

ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा …!

पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नको ,

ओय हिरो कुठ चालला अस बोलणारी बहिण पाहिजे ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो

आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो

हीच ईश्वरचरणी प्रार्थना …

तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

आभाळभर माया ,

प्रेमळ तिची छाया ,

ममतेने ओथंबलेले बोल

तर कधी रुसवा धरून होई अबोल

आईचे दुसरे रूप जणू ताईच

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासारखी ताई मिळाल्याबद्दल ,

मी खरच भाग्यवान आहे,

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे कि,

तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी …!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ

एकाच मागण आहे तुझ लवकर लग्न ठरू दे ….

म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल …

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

आपण नेहमी भांडतो परंतु मी

काहीही न बोलता तू माझ्या मनातला नेहमी ओळखतेस .

अशा माझ्या खडूस बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

तू खरच माझ्यासाठी प्रेरणा आणि आदर्श आहेस

तू माझी मोठीबहिण आणि मैत्रीण आहेस त्याबद्दल धन्यवाद

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

कडक पर्सनालिटी एखाद्या हेरोईनला पण लाजवेल अशी ,

सुंदर बोलणे सर्वांचे मन चोरून घेते ,

अशा माझ्या मॉडेल बहिणीला ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

माझा नवीन पेन असो ,

किवा माझा मोबईल ,

टी व्ही चा रिमोट असो ,

किवा माझा नवीन टी शर्ट

सगळ्यावर आपला हक्क सांगणाऱ्या ,

माझ्या लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

मला नेहमीच आधार , शक्ती आणि प्रेरणा देणारी ,

हक्काची जागा म्हणजे माझी बहिण

माझ्या अप्रतीन बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

ताई तू मनाने , विचाराने आणि सौंदर्याने खूप श्रीमंत आहेस ,

तुझ्या या ऐश्वर्य संपन्नेत अशीच वाढ होऊ दे

आणि तुझी कीर्ती जगभर पसरू दे

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

एकमेकांतील अंतर आणि वेळ आपल्याला कधीच वेगळे करू शकत नाही

कारण बहिण भावाचे नाते हे एकमेकांच्या हृदयाशी जोडलेले असते ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिमिरात असते साथ तिची,

आनंदात तिचाच कल्ला असतो,

अनुभवी आणि निरपेक्ष असा

कायम माझ्या बहिणीचा सल्ला असतो ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी …!

सर्वात वेगळी आहे माझी बहिण

सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहिण

कोण म्हणत आयुष्यात सुखाच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहिणच आहे सर्वकाही

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

आई बाबांच्या मारा पासून वाचवणारी मोठी बहिण असते

प्रत्येक संकटात पाठीशी उभी राहणारी मोठी बहिण असते ,

आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जिला आनंद होतो ती मोठी बहिण असते ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

साखरेची गोडी थोड्यावेळच राहते

पण माणसाच्या स्वभावाची गोडी आयुष्यभर राहते

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी …!

वाढदिवस असला ताई चा

त्यात धिंगाणा आमच्या भावंडांचा

ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी , नव्या वैभावानी

आनंद शतगुणित व्हावा ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

माझ्या यशामागील कारण

आणि आनंदामागील आधार

असणाऱ्या माझ्या ताई ला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

बहिण घरात असली कि घरात आई असल्यासारखा वाटत

भावाच्या काळजीपोटी वेळोवेळी तीच मन दाटत ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

ताई तू आमची जान आहेस

मम्मी पप्पांची शान आहेस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

आवडीच्या मिठाईचा एक भाग ठेवते ती मजसाठी

आयुष्यातले काही स्वप्न सहज त्यागते ती मजसाठी

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

रडवायला सगळ्यांना जमत ,

समजवायला सगळ्यांना जमत ,

पण,

रडवून समजवायला फक्त ताईलाच जमत

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

मी प्रार्थना करतो कि येणाऱ्या काळात

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो

तुम्हाला आनंद सुख शांती लाभो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब …!

संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

जीवनात सर्वात खडूस teacher म्हणजे आपली sister

आणि सर्वात कूल friend म्हणजे आपली sister

हैप्पी बर्थडे sister …!

माझ्यासाठी मैत्रीण, आई वडील अशा सर्वच भूमिका निभावणारी माझी ताई

ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!

आपल्याला आज काय देवू शुभकामना

दुख आणि संकटांशी कधी न हो सामना ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …!

मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे

ताई माझ्याकडून तुला हैप्पी बड्डे …!