Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For father In Marathi

Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखात आपण आपल्या वडिलांच्या वाढदिवसासाठी स्पेशल शुभेच्छा बघणार आहोत .

वडील म्हटले कि आदर, शिस्त , भीती या सगळ्या भावना मनात येतात , परंतु वडील हे फणसा सारखे असतात बाहेरून कडक आणि आतून प्रेमळ ,वडील कितीही कडक असले तरी ते आपले सगळे लाड पूर्ण करतात .व आपल्या शिक्षनासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वडील दिवस रात्र मेहनत करतात. कितीही थकले तरी वडील कधीच बोलून दाखवत नाही,आपल्या सगळ्यांचेच वडील त्यांच्या मानतील भावना खूप कमी वेळा बोलून दाखवतात.अश्या आपल्या अबोल वडिलांचा वाढदिवस असेल तर celebration तर व्हायलाच हवा , त्याबरोबर बाबांना वाढदिवसाच्या काहीतरी स्पेशल शुभेच्छा देखील द्यायला हव्या , Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखात असेच आपण नवनवीन शुभेच्छा संदेश बघणार आहोत .

Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

बाबा तुम्हाला चांगले आरोग्य , सुख , समृद्धी

आणि दीर्घायुष्य लाभो ,हीच देवाकडे प्रार्थना !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

बाबांसाठी पुरतील एवढे

शब्द नाहीत कोठे

काय लिहू कसे लिहूबाबां वरती लिहिण्या इतपत

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे !

आपण मागण्याआधीच

आपल्या गरजा ओळखून त्या पूर्ण

करणार बाबा च असतो !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

जन्म झाल्यापसून ,

मला कायम परीसारखा जपलं आणि

कर्तुत्ववान बनवलं ,

अश्या माझुं बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कितीही संकटे आली तरी

चेहऱ्यावर सदैव आनंद कसा ठेवायचा

हे शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो ,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,

परमेश्वर आपणास नेहमी सुखात ठेवो !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

आम्ही आयुष्यभर सावलीत

रहाव म्हणून स्वतः आयुष्यभर उन्हात झिजला ,

कधी कधी उपाशी राहून ,

आम्हाला अन्नाचा घास भरविला ,

अशा या वात्सल्याच्या मूर्तीला ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For father In Marathi

ठेच लागल्यावर आई ग हा शब्द

आपल्या तोंडून बाहेर पडतो,

पण एखादा साप आडवा आल्यावर

बापरे हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो

छोट्या संकटांसाठी आई चालते पण

मोठी वादळे झेलताना बापच आठवतो !

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा बाबा !

नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर

वडिलांचा आशीर्वाद असतो ,

त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा

त्यांचा देव त्यांच्या सोबत असतो !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

देवाने सर्व काही दिल आहे ,

अजून काही मागावस वाटत नाही ,

फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना !

माझे अखंड प्रेरणा स्थान असलेल्या ,

माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्यांचा नुसता खांद्यावर हात असला तरी ,

अडचणींना सामोरे जाण्याची हिम्मत मिळते ,

अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची,

कल्पना करणे शक्य नाही,

नेहमी असेच माझ्या सोबत सावली प्रमाणे राहा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणारया

व्यक्तीस बाबा म्हणतात ,

मी खूपच भाग्यशाली आहे कि,

तुम्ही साथ मला लाभली !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा

आज वाढदिवस , ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून,

त्यांच्या आनंदाचा त्याग करून ,

आम्हाला आनंदी जीवन दिले !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!

कधी रागावतात तर

कधी प्रेम करतात ,

अशा प्रिय बाबास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

काळजातून काळजाशी काळापर्यंत बोलणारे दोन शब्द म्हणजे बाप ,

माझुं आयुष्या मध्ये तुमची सावली नेहमी अशीच राहूदे ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा !

जेव्हा आई ओरडत होती ,

तेव्हा कोणीतरी गुपचूप हसत होते ,

ते म्हणजे बाबा …..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा …!

रखरखत्या उन्हात सावली देणारा

जत्रेत खांद्यावर घेवून फिरवणारा ,

माझ्या आयुष्यातील सर्व सुखांचे कारण असणारा

एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा ,

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

वडिलांसाठी काय स्टेटस ठेवायचे ,

आज जे काही आहे ते वडिलांमुळेच आहे….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

कितीही मोठी अडचण असली तरी मी आहे असा म्हणत

खांद्यावर हात ठेवणारे माझे बाबा ,

तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही

आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा मी धनवान नाही ,

अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक मुलीचे पहिले प्रेम तिचे लाडके बाबा असतात ,

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्या पद्धतीने सूर्य किरणांशिवाय सकाळ होत नाही ,

त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय ,

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा !

हे हि बघा, आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश https://marathisampada.com/birthday-wishes-for-mother-in-marathi/

आकाशालाही लाजवेल अशी उंची,

आभाळालाही लाजवेल असे कर्तृत्व ,

असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

तुम्ही असेच हसात राहा ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा !

आपण गरीब कितीही असलो तरी प्रत्येक बाबासाठी ,

आपली मुलगी हि राजकुमारीच असते ,

बाबा तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकीकडून हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For father In Marathi

बोट धरून चालायला शिकवलं ,

आम्हाला शांत झोप दिली ,

आपले अश्रू लपवून आम्हाला हसवलं ,

अशा आमच्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती ,

जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता ,

तुम्हाला ओरडते ज्जेव्हा तुम्ही एखादी चूक करतात ,

तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता ,

आणि तुम्ह्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरतात ,

happy birthday बाबा !

स्वतःच्या मुलांचे दुख सहन करणाऱ्या ईश्वराला

आपण बाबा म्हणतो ,

धन्यवाद बाबा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याल बद्दल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

बोट धरून चालायला शिकवला ,

आपली झोप विसरून आम्हाला शांत झोप दिली ,

आपले अश्रू लपवून आम्हाला हसवलं ,

अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे ,

संपूर्ण जग प्रकाशमय झाल्या सारखा दिसते ,

बाबा नेहमी असेच आनंदी राहा ,

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

आयुष्यात तुम्हाला सुख, समाधान,समृद्धी मिळो ,

तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ,

बाबा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

जेव्हा जेव्हा मी अपयशी ठरलो तेव्हा तुम्ही मला येथे उचलून घेतले ,

आणि मला पुन्हा योग्य मार्गावर आणले ,

तुमच्या शिवाय मी आज इथे पोहचू शकलो नसतो !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

हाच जन्म पुन्हा मिळणार नाही,

असंख्य लोक मिळतील या जगात ,

पण तुमच्यासारखे बाबा मिळणार नाही ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

खूप लोक हे देवावर विश्वास ठेवत नाही ,

कारण त्यांनी अजून माझा बाबा बघितलेला नाही ,

happy वाला birthday बाबा !

खिसा रिकामा असूनही त्यांनी नकार दिला नाही ,

वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पहिली नाही,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

dady माझे आत्ता पर्यंतचे

सर्व लाड पुरविल्याबद्दल धन्यवाद ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

ज्यांचे बोट धरून ,

चालायला शिकलो ,

ज्यांच्याकडे बघून,

संकटांशी लढायला शिकलो ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

कितीही मोठी अडचण असली तरी मी आहे ,

असे म्हणत खांद्यावर हात ठेवणारे माझे बाबा ,

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक आनंद प्रत्येक क्षण खास असतो ,

जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावो,

तुम्ही नेहमी असेच हसत राहा,

तुमच्यामुळे आज आम्ही इथे आहोत,

तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही ,

तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी नांदो ,

तुम्ही नेहमी आमच्यासाठी special राहाल ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

बाबा तुमचा मायेचा स्पर्श उबदार ,

नेहमीच दिला आश्वासक आधार ,

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास ,

जणू बनलात आमचे श्वास ,

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला ,

सुख समाधान मिळो तुम्हाला ,

तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे,

तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!

Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

जसे झाडाचे खोड हे ,

फांद्यांना आधार देत असते ,

तसेच वडील आपल्या मुलांना मार्गदर्शन करतात

आणि आधार देत असतात

माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

बाबा जेव्हा तुम्ही हसता ,

तेव्हा संपूर्ण जग आनंदी झाल्यासारखा वाटत,

बाबा नेहमी असेच हसत राहा,

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बाबा !

वय म्हणजे फक्त एक संख्या आहे ,

शरीर वृद्ध होते पण मन नेहमी तरुण असते ,

बाबा तुम्हाला ५० व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

तुमचा काय माझा काय बाप तो बाप असतो

सगळे जणी वरवर असले ,

तरी हा एकटाच खास असतो ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात ,

आयुष्यभर ते कर्ज फेडतात ,

आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात,

ते फक्त वडील च असतात !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

जगाच्या गर्दीत माझ्या सर्वात जवळ जे आहेत ,

ते माझे वडील, माझा परमेश्वर आहे!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

कठीण परिस्थितीत जेव्हा

खूप लोक हात सोडून निघून जातात ,

तव्हा फक्त आपले आई वाडी ,

आपला हात पकडून ठेवतात

अशा माझ्या लाडक्या बाबांना ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

बाबा तुम्ही सोबत आहात न मग

मला कशाचीही काळजी नाही

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा !

बाबा आजही तुमचे ओरडणे ऐकले नाही तर ,

निर्णय चुकल्या सारखा वाटतो ,

आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ हवीये !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

गाडीवर बसून फिरण्यात एवढा आनंद नाही वाटत ,

जेवढा आनंद लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसण्यात वाटत होता ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

वडिलांची सोबत माझ्यासाठी सूर्यासारखी आहे,

सूर्य तापट नक्कीच असतो परंतु,

तो नसताना सर्वत्र अंधार असतो!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात ,

पण माझा देव तर माझे वडील आहेत

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !

खूप प्रेम करतात माझ्यावर ,

कधीकधी करतात धुलाई ,

पप्पा तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक बधाई !