BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024 |बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४

BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024 |बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना २०२४ ही भारत सरकारचे मुलीसाठीची महत्त्वपूर्ण योजना आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तर 918 झाले आहे. म्हणजेच एक हजार मुलांमागे 918 मुली असे गुणोत्तर आहे. 22 जानेवारी 2015 ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत किंवा या अभियानांतर्गत संपूर्ण देशात बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी प्रचार करण्यात आला. या अभियानासाठी साक्षी मलिक या महिला कुस्ती पटूला सदिच्छा दूत म्हणून निवडले गेले.

महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मदतीने केंद्र सरकारने हे अभियान राबवले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मुलींचा मृत्यू दर कमी करणे, समाजातील मुलगा मुलगी असा भेदभाव कमी करणे, मुलींमधील रक्ताशय आणि कुपोषण कमी करणे, लिंग चाचणी करून गर्भात करण्याला आळा घालने, मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, तसेच मुलींना उत्तम आरोग्य, उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024 |बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४ या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत तिच्या पालकांना तिच्या बँक खात्यात तशी रक्कम जमा करावी लागते. या बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळतो. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा केलेल्या रकमेतील 50टक्के रक्कम पालक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा इतर खर्चासाठी काढू शकतात. त्यानंतर मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढू शकतात.बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मुलीच्या बँक खात्यात कमीत कमी प्रति महिना ₹1000 ते जास्तीत जास्त प्रतिवर्षी दीड लाख रुपये जमा करू शकता. ही रक्कम 14 वर्षांसाठी जमा करायची आहे.

केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मुलींना विशेष कौशल्य प्रदान करणे, शालेय शिक्षणात त्यांची नोंदणी वाढवणे, बालविवाहाला बंदी घालने, मुलींना मासिक पाळी बद्दल जागृती निर्माण करणे, त्यांच्या आरोग्य समस्या बद्दल त्यांना जागरूक करणे, स्वरक्षणासाठी कसे वागावे याबद्दल प्रशिक्षण देणे यासारख्या अनेक नवीन घटकांचा या योजनेत केला आहे.

BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024 |बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४ या योजनेचा मुख्य उद्देश लिंग गुणोत्तरात सुधारणा करणे हा आहे. समाजामध्ये मुलींच्या जन्माविषयी जी काही नकारात्मक भावना आहे, नकारात्मक विचार आहेत त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे. मुलांप्रमाणेच मुलींच्याही जन्मदरात वाढ करणे किती गरजेचे आहे . हे समाजाला पटवून देणे. मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मुलाप्रमाणे मुलीला देखील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

या योजनेचा प्रसार करण्यासाठी सुरुवातीला लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असलेल्या 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. या जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणे, जनजागृती करणे, सामूहिक पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, बाजारपेठा जिथे लोकांचा वापर जास्त आहे तेथे पथनाट्याद्वारे बेटी बचाव बेटी पढाव याची माहिती देणे. योजनेचा उद्देश, फायदे लोकांना समजून सांगणे. मुलींचा जन्मदर वाढवण्याचे महत्त्व पटवून देणे. लिंग गुणोत्तर मधील तफावत समजावून सांगून मुलीच्या भ्रूण हत्येला आळा घालने. यासारखे विविध उपक्रम या योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये घेण्यात आले. आता संपूर्ण देशात ही योजना राबवली जात आहे.

या लेखात आपण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, योजनेसाठी अर्ज कसा करावा, योजनेसाठी काय पात्रता व अटी आहेत, योजनेचा अर्ज करताना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतील, याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

Table of Contents

BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024 |बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४

बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना २०२४

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची वैशिष्ट्ये:

1) लिंग गुणोत्तरात वाढ करणे.

2) मुलींचे भ्रूणहत्या रोखणे.

3) समाजातील मुलगा मुलगी असा भेदभाव नाहीसा करणे

4) मुलींना सुरक्षित आणि उच्च शिक्षण मिळण्यास मदत करणे.

5) या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत तुम्ही कधीही तिचे खाते उघडू शकता.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे उद्देश:

1)बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा मुख्य उद्देश हा लिंग गुणोत्तरात वाढ करणे हा होय.

2) मुलीच्या पालकांना मुलीला उच्च शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करणे.

3) मुलीच्या जन्माविषयी असलेला नकारात्मक विचारांत बदल घडवून आणणे.

4) मुलींच्या जन्मदरात वाढ करणे , मुलींचा जन्मदर वाढणे किती गरजेचे आहे याचे महत्व समाजाला पटवून देणे.

5) मुलींचे अस्तित्व वाचविण्यासाठी मुलींना सुरक्षा प्रदान करणे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे फायदे:

1) या योजनेअंतर्गत मुलीचे पालक मुलीच्या जन्मापासून ते मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत तिचे बँक खाते उघडू शकतात. त्यात दरवर्षी एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम 14 वर्षापर्यंत जमा करावे. आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर त्यातील 50% रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर उरलेली संपूर्ण रक्कम हे मुलीच्या लग्नासाठी वापरता येते.

2) मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैशांची योग्य तरतूद या योजनेअंतर्गत होते. त्यामुळे मुलीच्या पालकांवर आर्थिक भार येत नाही.

3) या योजनेअंतर्गत बँकेत जमा केलेल्या रकमेवर उच्च व्याजदर मिळतो.

BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024

बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी पात्रता:

1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचे नागरिक असणे बंधनकारक आहे.

2) फक्त भारतीय रहिवासी असणाऱ्या मुलींसाठीच ही योजना आहे.

3) दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या पालकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

4) या योजनेमध्ये मुलीचे बँक खाते उघडायचे असल्यास मुलीचे वय शून्य ते 10 वर्ष या वयोगटात असावे.

5) मुलीचे वय 10 वर्षापेक्षा जास्त असल्यास या योजनेअंतर्गत मुलीचे बँक खाते उघडता येणार नाही.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात त्यांची यादी खालील प्रमाणे :

आधार कार्ड

रहिवासी दाखला

जन्माचा दाखला

रेशन कार्ड

बँक खात्याचा तपशील

आई-वडिलांचे ओळख पत्र

पासपोर्ट साईज फोटो

मोबाईल नंबर

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज कसा करावा याबद्दल माहिती खालील प्रमाणे:

1) या योजनेअंतर्गत मुलीचे बँक खाते उघडण्यासाठी मुलीच्या पालकांनी जवळच्या अधिकृत बँकेमध्ये जाऊन चौकशी करावी.

2) बँक कर्मचाऱ्या कडून या योजनेसाठी बँक खाते उघडण्यासाठी अर्ज घ्यावा.

3) अर्ज वाचून व्यवस्थित भरावा आणि अर्जात सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडून, अर्ज बँकेत सबमिट करावा.

4) अर्ज बँकेत सबमिट केल्यानंतर, बँक कर्मचाऱ्याकडून पोचपावती घ्यावी.

5) अशा प्रकारे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी मुलीचे बँक खाते उघडले जाते.

6) बँके प्रमाणेच तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही मुलीचे खाते उघडू शकता.

7) पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेसाठी खाते कसे उघडायचे याबद्दल पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांकडून योग्य ती माहिती घ्या. आणि योजनेसाठी चा अर्ज भरा.

8) आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पोस्ट ऑफिस मध्ये जमा करा.

9) अशा प्रकारे या योजनेसाठी तुम्ही तुमच्या मुलीचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता.

निष्कर्ष:

BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024 |बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४ या लेखात आपणबेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सविस्तर माहिती घेतली. योजनेचे उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, फायदे काय आहेत, योजनेसाठी पात्रता काय आहेत, योजनेसाठी अर्ज कसा करावा, अर्ज करताना कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते याबद्दल सविस्तर माहिती बघितली. मुलींसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. असे महत्त्वपूर्ण लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लेख वाढल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:BETI BACHAO BETI PADHAO YOJANA 2024 |बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२४

1)बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात कधी झाले?

ans: या योजनेची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये केले.

2)बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ans:बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लाभ फक्त भारतीय मुलीच घेऊ शकतात.

3) बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी मुलीचे बँक खाते कधी उघडावे?

ans: या योजनेसाठी मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत कधीही मुलीचे बँक खाते उघडता येईल.

4)बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी बँक खात्यात कमीत कमी किती रक्कम जमा करावी लागते?

ans:बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी बँक खात्यात कमीत कमी ₹1000 रक्कम प्रति महिना जमा करावी लागते.

5)बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी बँक खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम जमा करावी लागते?

ans:बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी बँक खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख इतकी रक्कम जमा करावी लागते.

6)बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

7)बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans:बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड, रहिवासी दाखला, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, बँक खात्याचा तपशील, आई-वडिलांचे ओळख पत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर इत्यादी.

हेही वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/

लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/