Baby Food Recipes in Marathi for 6 -12 Month Baby | ६-12 महिन्याच्या बाळाचा आहार.

Baby Food Recipes in Marathi for 6 -12 Month Baby | ६-12 महिन्याच्या बाळाचा आहार या लेखात बाळा चा आहार कसा असावा , बाळाला तो आहार कसा द्यावा याबद्दल माहिती बघणार आहोत . साधारण बाळ ६ महिन्याचे झाले कि त्याला आईच्या दुधाबरोबर वरचे अन्न द्यावे असे डॉक्टर सुचवतात. पण बाळा चा आहार कसा असावा , बाळाला तो आहार कसा द्यावा याबद्दल मनात खूप शंका असतात. साधारण बाळाला कोणते पदार्थ द्यावे ते पदार्थ कसे द्यावे याबद्दल ६-12 महिन्याच्या बाळाचा आहार या लेखात आपण 6-8 month baby food chart and 9-12 month baby food chart तसेच home made food recipes ची माहिती घेणार आहोत. पण त्याआधी तुमचे बाळ अन्न खाण्यासाठी तयार आहे कि नाही बद्दल डॉक्टरांना नक्की विचारून घ्या.

6 -12 month Baby food recipes

पण बाळ जसेजसे मोठे होते तसा बाळाचा आहार वाढत जातो , प्रत्येक आईला अंगावर पुरेसे दुध येतेच असे नाही त्यामुळे सुरवातीचे काही दिवस डॉक्टर फोर्मुला मिल्क वापरायला सांगतात .या ६ महिन्यांच्या काळात बाळाची पचन संथा मजबूत होते आणि त्यानंतर साधारण बाळ ६ महिन्याचे झाले कि आपण बाळाला बाकीचा आहार देवू शकतो.

बाळच्या सर्वांगीण विकासासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समवेश करायचा, ते पदार्थ कसे बनवायचे , त्या पदार्थांचा बाळाला की फायदा होवू शकतो याबद्दल माहिती आपण ६-12 महिन्याच्या बाळाचा आहार या लेखात बघणार आहोत .

Baby Food Recipes in Marathi for 6 -12 Month Baby | ६-12 महिन्याच्या बाळाचा आहार.

लेखातील काही मुद्दे खालील प्रमाणे :

१) ६-८ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा/ 6-8 month baby food chart .

२) ९-१२ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा/ 9-12 month baby food chart .

३)आहार देताना घ्यावयाची काळजी

४) home -made food recipes /पदार्थ बनविण्याची पद्धत

५)पदार्थातील पौष्टिकता

वरील मुद्यांची सविस्तर माहित खालील प्रमाणे :

१) ६ -८ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा/6-8 month baby food chart

६-12 महिन्याच्या बाळाचा आहार या लेखात आपण६-८ महिन्याच्या बाळाला कसा आहार द्यावा याबद्दल माहिती बघणार आहोत.

१) आईचे दुध किवा फोर्मुला मिल्क

२) भाताचे पाणी

३) डाळीचे पाणी (शक्यतो मुगाची डाळ द्यावी )

४) रव्याची खीर

५) नागली/नाचनी ची पेज

६) साबुदाण्याचे पाणी

७) सफरचंद , चिकू पपई या सारख्या फळांचा रस

८) कड धान्य शिजवून त्यांचे वरचे पाणी

२)९-१२ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा/9-12 month baby food chart

९-१२ महिन्याच्या बाळाला आपण थोडे घट्ट पदार्थ देऊ शकतो , आता बाळाला नवीन पदार्थ खायची सवय झालेली असते त्यामुळे थोडे घट्ट पदार्थ बाळ सहज खाऊ शकतो . बाळाला खाली यादीत दिलेले पदार्थ देऊ शकतो .पदार्थांची यादी खालील प्रमाणे :

१) रव्याची घट्ट खीर .

२) नागली /नाचणी ची घट्ट पेज, गव्हाच्या पिठाची लापशी .

३) Homemade cerelac.

४)गाजर , रताळे , बटाटा, हिरवा वाटणा शिजवून बारीक करून द्यावे .

५)सुरुवातीला आपण कड धान्याच पाणी बाळाला देत होतो आता आपण तेच कड धान्य शिजवून बारीक करून बाळाला देऊ शकतो .

६) वरण -भात बारीक करून द्यावा . दही -भात देखील द्यावा .

७)मुगाच्या डाळी बरोबर तूर, मसूर ची डाळ देण्यास काही हरकत नाही

८)हिरव्या पालेभाज्या , तसेच फळ भाज्या उकडून बारीक करून किवा मग त्याचे सूप करून द्यावे .

९)मऊ पातळ खिचडी देखील बाळाला द्यावी , खिचडी करताना त्यात टोमाटो , पालक, बटाटा, गाजर, डांगर (लाल भोपळा ) या पैकी एखादी भाजी टाकावी , खिचडीची पौष्टिकता वाढतेच तसेच भाजी बाळाच्या पोटात जाते.

१०) पोळी बारीक कुस्करून दुधातून किवा वरण सोबत खावू घालावी .

११)मांस खात असाल तर बाळाला चिकन सूप द्यावे, अंड्याचे बारीक तुकडे करून खाऊ घालावे .

३) आहार देताना घ्यावयाची काळजी :

६-12 महिन्याच्या बाळाचा आहार या लेखात आपण बाळाला आहार देताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती बघणार आहोत ,आहार देताना घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती खालील प्रमाणे :

१) नवीन पदार्थ देताना तो शक्यतो दिवसाच द्यावा , त्यामुळे बाळाला काही त्रास होतो का यावर लक्ष ठेवता येईल .

२) सुरुवातीला नवीन पदार्थ एकच वेळेला द्यावा, नंतर बाळाच्या आवडीनुसार दोन किवा तीन वेळेस द्यावा , सोबत स्तनपान देखील करावे .

३)नवीन पदार्थ दिल्यांनतर बाळाला उलटीचा किवा शी चा त्रास झाल्यास तो पदार्थ देणे थांबवावे , डॉक्टरांचा सल्ला घेवून मगच परत नवीन आहार चालू करावा .

४) फळ देताना सुरुवातीला कोणते तरी एकच फळ द्यावे (सफरचंद द्यावे असे डॉक्टर सांगतात ).ते फळ बाळाला पचते का त्याची काही allergy होत नाही न यावर लक्ष ठेवावे ,

५)फळे दिल्यांनतर बाळाला सर्दी कफ चा काही त्रास होतो का हे देखील बघावे, काही त्रास होतोय असे लक्षात आले तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

६)सुरवातीला सफरचंद थोडे वाफवून मग बारीक पेज करून बाळाला खावू घालावे . थोडा घट्ट खायची बाळाला सवय झाली कि मग सफरचंद किसून देखील देऊ शकता

७)केळी , चिकू, पपई यासारखे पदार्थ smash करून मगच द्यावीत .

८) साधारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच बाळाला दही भात खाऊ घालावा. पावसाळा , हिवाळ्यात शक्यतो दही-भात खाऊ घालणे टाळावे .

९)बाळ सुरुवातीला थोडे कमीच अन्न खाईल , बाळाला जबरदस्ती करू नये , त्याच्या कलाप्रमाणे घेवूनच खाऊ घालावे .

१०)बाळाला दिवसातून किती वेळा खाऊ घालावे या बद्दल वेग वेगळे मत आहे. तरी सुरुवातीला एक किवा दोन वेळा घन आहार आणि इतर वेळी स्तनपान करावे , त्यानंतर ८ व्या महिन्यापासून दोन वेळा snack आणि दोन किवा तीन वेळा घन पदार्थ द्यावे . सकाळी उठल्यावर किवा मध्ये मध्ये स्तन पान करावे .

११) बाळाला प्लास्टिकच्या भांड्यातून खाऊ घालू नये , त्या ऐवजी चांदीच्या भांड्यात खाऊ घालावे , चांदी हा धातू बाळा साठी लाभदायी आहे .

४)Home-Made Food Recipes /पदार्थ बनविण्याची पद्धत :

१) सफरचंदाचा रस /juice

6 -12 month Baby food recipes -safarchandacha juice

साहित्य :

१ सफरचंद

कृती :

१) सफरचंदाची साल काढून घ्यावी

२) कुकर मध्ये किवा पातेल्यात सफरचंद वाफवून घ्या .

३) नंतर बारीक करून /पेस्ट करून बाळाला खाऊ घाला , गरज असेल तर बारीक केलेले मिश्रण गळून घ्या .

२) नागली/नाचणीची पेज :

6 -12 month Baby food recipes - nagalichi pej

साहित्य :

२ चमचे नागलीचे पीठ

१ चमचा तुप

पाव चमचा गुळ

गरजे प्रमाणे पाणी

कृती :

१) नागलीचे पीठ : नागली स्वच्छ धुवून सावलीत सुकवून घ्यावी त्यानंतर बारीक दळून तिचे पीठ तयार करावे . हे पीठ हवा बंद डब्यात ठेवावे खराब होत नाही .

२) पातेल्यात १ चमचा तुप टाकावे .

३) त्यात २ चमचे नागलीचे पीठ टाकावे आणि २-३ मिनिटे पीठ भाजून घ्यावे.

४)गरजे नुसार पाणी टाकून झाकण ठेवून पेज शिजवून घ्यावी .

५) पेज शिजल्यावर त्यात थोडा गुळ टाकावा .थंड झाल्यावर बाळाला खाऊ घाला .

३) रव्याची खीर :

साहित्य :

२-३ चमचे रवा

१ चमचा तुप

पाव चमचा गुळ

कोमट पाणी

कृती :

१) तुपात रवा चांगला भाजून घ्यावा .

२)कोमट पाणी टाकून झाकण ठेवून रवा शिजवून घ्यावा .(आपण खीर बनवतोय त्यामुळे पाणी थोडे जास्तच टाकावे).

३)खीरीला चांगली उकळी आल्यानंतर त्यात गुळ टाकावा . कोमट असतानाच बाळाला खाऊ घालावे .

४)दलिया खिचडी

6 -12 month Baby food recipes -daliya khichadi

साहित्य :

अर्धी वाटी दलिया

१ चमचा मुग डाळ

१ चमचा मसूर डाळ

अर्धा चमचा उडीत डाळ

अर्धा चमचा तूर डाळ

१ लसून पाकळी

१ लहान हिरवी मिरचीचा तुकडा

तेल/ तुप

हळद

जिरे

मीठ

पाणी

कृती:

१) दलिया आणि बाकी सर्व डाळी स्वच्छ धुवून १०-१५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवाव्या .

२) फोडणीसाठी कुकर मध्ये तेल टाकावे त्यात जिरे लसून मिरची टाकून परतवून घ्या .त्यात हळद टाका .

३) दलिया आणि बाकी डाळींचा मिश्रण कुकर मध्ये तेलात टाकून चांगले परतून घ्या.

४) गरजे नुसार पाणी टाका , मीठ टाका , झाकण लावून तीन शिट्या करून घ्या .

५) तुप टाकून बाळाला खाऊ घाला .

(बाळाला किती तिखट लागते हे बघून मिरचीचा वापर करा , नुसते मीठ टाकून खिचडी केली तरी चालेल )

५) मुगाच्या डाळीची खिचडी :

6 -12 month Baby food recipes -mugachi khichadi

साहित्य :

अर्धी वाटी तांदूळ

पाव वाटी मुग डाळ

१ लसून पाकळी

तेल/ तुप

हळद

जिरे

मीठ

पाणी

कृती:

१) तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून १०-१५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवाव्या .

२) फोडणीसाठी कुकर मध्ये तेल टाकावे त्यात जिरे लसून टाकून परतवून घ्या .त्यात हळद टाका .

३) तांदूळ आणि डाळीचे मिश्रण कुकर मध्ये तेलात टाकून चांगले परतून घ्या.

४) गरजे नुसार पाणी टाका , मीठ टाका , झाकण लावून तीन शिट्या करून घ्या .

५) तुप टाकून बाळाला खाऊ घाला .

६) मिश्र कडधान्याचे कढण :

साहित्य :

१ चमचा मुग

१ चमचा मटकी

१ चमचा चवळी

अर्धा चमचा हरभरा

अर्धा चमचा राजमा

तेल

मीठ

जिरे

हळद

पाणी

कृती :

१)सर्व कडधान्य रात्रभर भिजत ठेवावे

२) सकाळी सर्व कडधान्य धुवून कुकर मध्ये शिजवून घ्यावे .

३) शिजलेले कडधान्य थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करावे .

३) कढई मध्ये तेल टाकावे , जिरे टाकून फोडणी द्या. थोडीशी हळद टाकावी .बारीक केले मिश्रण त्यात टाकून थोडे पाणी टाकून शिजवून घ्यावे.

४)चवी प्रमाणे मीठ टाकावे , थंड झाल्यावर बाळाला खाऊ घालावे .

७) सुप :

साहित्य :

पालक (१ पान )

१ तुकडा बीट

१ -२ तुकडे टोमाटो

तेल

मीठ

जिरे

पाणी

कृती :

१) पालक, बीट, टोमाटो कुकरला शिजवून घ्यावे .

२)तेलात जिरे टाकून smash केलेले पालक, बीट आणि टोमाटो चे मिश्रण त्यात टाकावे .

३) मीठ टाकावे, थोडे जास्तीचे पाणी टाकून चांगली उकळी आल्यानंतर हे सुप तयार होते .

४) थोडे कोमट असतानाच बाळाला पाजावे .

८) डाळ -पालक

साहित्य :

१-२ पाने पालक

२-३ चमचे डाळ(तूर/मुग डाळ )

१ तुकडा टोमाटो

तेल

जिरे

हळद

मीठ

पाणी

कृती:

१) डाळ , पालक आणि टोमाटो स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घ्यावे .

२)तेलात जिरे हळद टाकून शिजवलेले मिश्रण त्यात टाकावे, पाणी टाकून उकळून घ्यावे

३) चवीनुसार मीठ टाकावे

४) भात किवा पोळी बारीक करून त्यावर डाळ पालक टाकून बाळाला खाऊ घालावे , वरतून थोडे तुप टाकावे .

५)पदार्थातील पौष्टिकता :

६-12 महिन्याच्या बाळाचा आहार या लेखात आपण बाळाचा आहार कसा असावा हे बघितल आता आपण जे पदार्थ बाळाला देतो त्यात किती पौष्टिकता असते ते बघू :

१) नाचणीच्या पेज किवा गव्हाची खीर मध्ये कॅल्शियम असते . हाडांच्या विकासासाठी खूप गरजेचे असते

२) सफरचंदामुळे प्रतिकार शक्ती वाढते . बाळ आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते .

३)गाजर , पपई , हिरव्या पालेभाज्या शिजवून त्याचे सूप दिल्यामुळे अनेक जीवनसत्वे आणि खनिज युक्त तत्वे बाळाच्या पोटात जातात .

४) पालक , बीट मध्ये मोठ्या प्रमाणात iron असते .

५)बीट रक्त वाढीसाठी चांगले असते .

६) वेगवेगळ्या डाळी मधून प्रोटीन मिळते .

( वरील लेखात बाळाच्या अन्न पदार्थांबद्दल बेसिक माहिती दिली आहे , कोणतेही अन्न पदार्थ बाळाला देण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)