Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार

Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार, या लेखात आपण आपल्या १ ते ३ वर्षाच्या बाळाला जेवणात कोण कोणते पदार्थ देऊ शकतो हे बघणार आहोत . साधारण बाळ १ वर्षाच झाल कि सगळं जेवतो . परंतु खाताना बाळाची जी काही नाटकं असतात ती फक्त त्या बाळाची आईच समजू शकते . कधीकधी कितीही काहीही लाडीगोडी लावली तरी बाळ जेवण करत नाही .बाळाने जेवण नाही कला तर आईला टेन्शन तर येणारच ना , आपण जी नेहमीची भाजी पोळी वरण भात करतो हे बाळाला आवडेलच असे नाही म्हणूनच बाळाच्या पोटात सगळेच अन्न पदार्थ जाण्यासाठी नेहमीच्याच अन्न पदार्थांना थोडं वेगळ्या पद्धतीने बनवून बाळाला दिला तर कदाचित ते खातील , आणि सगळेच पोषण द्रव्ये त्यांच्या पोटात जातील. असेच काही आपले नेहमीच पदार्थ बाळासाठी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून बाळाला खाऊ घालुयात , Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार या लेखात मी तुम्हाला काही सध्या सोप्या रेसिपीज सांगणार आहे त्या तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की बनवा आणि बाळाला खाऊ घाला .

पौष्टिक रेसिपीज खालील प्रमाणे :Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार

१) मऊसूत नाचणीचे लाडू :

साहित्य :

नाचणीचे पीठ : २ वाटी

बारीक चिरलेला गुळ : १ +१/२ वाटी गुळ

साजूक तूप :१/२ वाटी

वेलची पूड : १/२ चमचा

पाणी

कृती:

१) एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या थोडे कोमात पाणी घेऊन पीठ मळून घ्या. थोडावेळ पीठ भिजू द्या .

(अगदी घट्ट किंवा सैल पीठ मळू नये )

२)एक रुमाल घ्या त्यावर पिठाचे छोटे थालीपीठ करून घ्या .

३) तव्यावर तूप टाकून मंद आचेवर दोन्हीही बाजूने चांगले भाजून घ्या .

४) थालीपीठ थंड झाल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करून घ्या . नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या .

५) बारीक झालेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या , आणि त्यात १ १/२ गुळ घाला, वेलची पावडर घाला आणि परत सगळ मिश्रण मिक्सर मध्ये २-३ सेकंद साठी फिरवून घ्या म्हणजे गुळ चांगला मिक्स होईल .

६) मिश्रणाचे लाडू बनवून घ्या .

पोषण मुल्ये :

नाचणीची प्रवृत्ती हि थंड असते त्यामुळे आता उन्हाळ्यात देखील हे लाडू तुम्ही बाळाला देऊ शकतो .

रक्त वाढीसाठी उपयुक्त .

मुबलक प्रमाणात कॅल्सिअम असल्यामुळे हाडांसाठी उपयुक्त आहे .

२) बीट रूट लाडू :

साहित्य :

२ कप किसलेले बीट

१-१/२ वाटी साखर

१/२ वेलची पावडर

ड्राय फ्रुट पावडर

किसलेले खोबरे

तूप -२ चमचे

कृती :

१) कढईत २ चमचे तूप टाका आणि किसलेले बीट त्यात टाकून चांगले परतून घ्या .

२) त्यानंतर मिश्रणात साखर टाकून झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्या .

३) मिश्रणातील संपूर्ण पाणी आटे पर्यंत हे मिश्रण परतवून घ्या .

४) मिश्रणातील सर्व पाणी आटले आणि मिश्रण थोडा ड्राय झाल कि मग त्यात वेलची पावडर, ड्राय फ्रुट पावडर टाका आणि परत एकदा मिक्स करून घ्या .

५) मिश्रण संपूर्ण थंड करून घ्या.

६) मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू बनवून घ्या .

७) बनवलेले लाडू किसलेल्या खोबऱ्यात घोळवून घ्या .

८) तयार आहेत बीट रूट लाडू .

पोषण मुल्ये :

रक्तवाढीसाठी उपयुक्त .

३) दुधी भोपळा -बटाटा पराठा :

साहित्य :

किसलेला दुधी भोपळा : १ कप

उकडलेला बटाटा : १

हिरवी मिरची : १ लहान तुकडा

लसून : १-२ पाकळ्या

जिरे

कोथिंबीर

लिंबू

मीठ

कृती :

१) पाणी गरम करायला ठेवा पाणी उकळले कि त्यात किसलेला भोपळा घाला ५-१० मिनिटे चांगले शिजू द्या.

२)थंड झाल्यावर किसलेल्या भोपाळ्यातील सर्व पाणी पिळून घ्या .

३) शिल्लक राहिलेल्या पाण्यात पराठ्यासाठी लागणारे गव्हाचे पीठ मळा .

४)मिरची लसून जिरे याची पेस्ट करून घ्या .हि पेस्ट शिजलेल्या भोपळ्यात मिसळा.

५) या सर्व मिश्रणात उकडलेला बटाटा किसून घाला ,म्हणजे मिश्रणाला चांगली binding येईल .

६) मिश्रणाचे लहान गोळे करून पुरणपोळी करतो तसे पराठे बनवून घ्या .

७) तूप किंवा तेल लावून तव्यावर दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या .

८) बाळाला देताना दह्यासोबत द्या .

पोषण मुल्ये :

विटामिन क मुलांची प्रतिकार शक्ति वाढवते .

झिंक यकृताचे आरोग्य सुधारते .

स्नायू व हाडे विकसित व्हायला मदत होते .

तुमच्या ६-१२ महिन्याच्या बाळासाठी पदार्थ आणि कृती शोधताय मग हे हि वाचा : https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/

Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार

४) आलू टिक्की :

साहित्य :

उकडलेले बटाटे : ६-७ बटाटे

हिरवी मिरची

कोथिंबीर

मीठ

मक्याचे पीठ :२-३ चमचे

तेल

कृती :

१) उकडलेले बटाटे सोलून घ्या , बारीक केलेली मिरची, मीठ, कोथांबीर घाला . मिश्रण चांगले मिक्स करून घ्या .

२) त्यात २-३ चमचे मक्याचे पीठ घालून परत एकदा मिश्रण मळून घ्या .

३)तयार झालेल्या मिश्रणापासून लहान लहान टिक्की बनवून घ्या .

४) तव्यावर ३-४ चमचे तेल टाकून टिक्की शालो फ्राय करून घ्या .

५)टिक्की दोन्ही बाजूने चांगली खरपूस झाल्यावर सॉस बरोबर सर्व्ह करा .

पोषण मुल्ये :

हिमोग्लोबिन तयार करायला मदत करते

पोट साफ व्हायला मदत होते .

आतड्यांची हालचाल सुरळीत करते .

५) रताळे -केळी पॅनकेक:

साहित्य :

रताळे :२ मध्यम आकाराचे

केळी : १

अंड : १

गव्हाचं पीठ : १ वाटी

खायचा सोडा : चिमुटभर

मीठ : चवीनुसार

कृती :

१) एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या , मीठ आणि सोडा घालून मिश्रण बाजूला ठेवा .

२) ब्लेंडर मध्ये रताळ्याचे काप आणि केळ्याचे काप घालून त्याची घट्ट प्युरी बनवा .

३) अंड घालून परत एकदा मिश्रण ब्लेंड करून घ्या .

४) तयार झालेली प्युरी तयार केलेल्या गव्हाच्या मिश्रणात घाला आणि मिक्स करा .

५) तयार पीठाचे तव्यावर तूप किंवा तेल लावून पॅनकेक बनवून घ्या.

६)पॅनकेक दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या . तयार पॅनकेक सर्व्ह करा .

पोषण मुल्ये:

रताळे आणि केळी बद्धकोष्टता कमी करतात

रताळ्या मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते .

केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते .

Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार

६) काकडीची लस्सी :

साहित्य :

काकडी : १

दही : १ वाटी

मीठ

धने पावडर

जिरे पावडर

हिंग

कृती :

१) काकडी साल काढून स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.

२) १ वाटी दही मध्ये १ वाटी पाणी घालून चांगले मिक्स करा . त्यात बारीक चिरलेली काकडी ,१/२ चमचा जिरे पावडर , १/२ धने पावडर , चिमुटभर हिंग आणि मीठ टाकून मिक्स करा .

३) तयार काकडी लस्सी मुलांना दुपारच्या वेळी प्यायला द्या .

पोषण मुल्ये :

बद्धकोष्टता कमी करते .

मुलांमध्ये कर्करोग होण्याचा धोका कमी करते .

काकडी मध्ये पाणी खूप प्रमाणात असल्यामुळे dihydration होत नाही .

मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढते .

७) गोड पालक ज्यूस :

साहित्य :

पालक : २-३ वाटी

केळी : १

कृती :

१)पालक स्टीमर मध्ये ठेवा पालक मऊ शिजे पर्यंत ५-७ मिनिट वाफवून घ्या >

२)शिजलेला पालक आणि पिकलेलं केळ ब्लेंडर मध्ये टाकून घट्ट प्युरी बनवून घ्या .

३) तयार झालेला ज्यूस फ्रीज मध्ये २-३ दिवस टिकू शकतो .

४)१ कप आठवड्यातून दोनदा दुपारच्या जेवणात बाळाला देऊ शकता .

पोषण मुल्ये :

यात भरपूर पाणी असल्यामुळे बाळाच्या शरीरात पाण्याची पातळी राखली जाते .

प्रतिकार शक्ती वाढते

पचनसंस्थेला मदत होते

८) बटाटा लॉलीपॉप:

साहित्य :

उकडलेले बटाटे : वाटी

बारीक चिरलेला कांदा :१

कोथिंबीर

ब्रेडची पावडर : १ वाटी

धने पावडर : १ चमचा

आल लसून पेस्ट : १ चमचा

अंड :१

मीठ

कृती :

१) एका वाटीत उकडलेला बटाटा , बारीक चिरलेला कांदा ,कोथिंबीर,धने पावडर, आल लसून पेस्ट मीठ टाकून चांगले मिक्स करा .

२)एका डिश मध्ये ब्रेडची पावडर घ्या , आणि एका वाटीत अंडे फेटून बाजूला ठेवा .

३)बटाट्याचे गोळे बनवून अंड्यात बुडवून नंतर ब्रेडच्या पावडर मध्ये घोळवून सोनेरी होई पर्यंत तेलात तळून घ्या .

४) तयार लॉलीपॉप चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा .

पोषण मुल्ये :

हिमोग्लोबिन तयार करायला मदत करते

पोट साफ व्हायला मदत होते .

आतड्यांची हालचाल सुरळीत करते .

Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार

९) नाचणीचे थालीपीठ :

साहित्य :

नाचणीचे पीठ : १ वाटी

गव्हाचे पीठ :१ चमचा

बेसन पीठ :१ चमचा

तांदळाचे पीठ : १ चमचा

किसलेले बीट रूट : १/२ वाटी

कोथिंबीर

मिरची

आल लसून पेस्ट

जिरे पावडर

धने पावडर

मीठ

कृती :

१) सगळे साहित्य एकत्र करून त्याचा सैलसर गोळा तयार करून घ्या .

२) रुमाला वर लहान लहान थालीपीठ बनवून घ्या .

३) तेल किंवा तुपाचा वापर करून तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या .

४) तयार थालीपीठ दह्यासोबत बाळाला खायला द्या .

पोषण मुल्ये

रक्त वाढीसाठी उपयुक्त .

मुबलक प्रमाणात कॅल्सिअम असल्यामुळे हाडांसाठी उपयुक्त आहे .

१०) पंचमेळ डाळ :

साहित्य :

तुरडाळ : ५ चमचे

मुगडाळ : १ चमचा

उदित डाळ :१ चमचा

मसूर डाळ :१ चमचा

हरभरा डाळ :१ चमचा

तूप /तेलात

हिंग

हळद

मिरची

धने पावडर

जिरे पावडर

मीठ

कृती :

१) सर्व डाळी धुवून कुकरला शिवून घ्या .

२)तूप /तेलात हिंग ,हळद, मिरची, धने पावडर, जिरे पावडर टाकून शिजलेली डाळ टाकून चांगले उकळून घ्या

३) चवीप्रमाणे मीठ घाला.

४) पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा .

पोषण मुल्ये :

प्रोटीन स्नायू बळकट करायला मदत करतात .

लोह हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते .

folic acid मेंदूसाठी आणि हाडांसाठी गरजेचे असते .

निष्कर्ष :

Baby Food Recipes in Marathi for 1-3 Years Baby | १ ते ३ वर्षाच्या बाळाचा आहार यालेखात आज आपण आपल्या १ ते ३ वर्षा मधील बाळासाठी कोणते अन्नपदार्थ बनवू शकतो हे पहिला . वरती दिलेल्या रेसिपीज ह्या बेसिक माहितीच्या आधारे दिल्या आहेत कोणताही पदार्थ तुमच्या बाळाला सुरुवातीला थोड्या प्रमाणातच द्या , बाळाला आवडला ,पदार्थ पचला तर पदार्थाची मात्रा वाढवा . मला माहित असलेल्या काही सोप्या अन्न पदार्थांच्या कृती मी आज तुमच्या सोबत शेयर केल्या आहेत . पदार्थ बनवून बघा ,बाळाला आवडला कि नाही हे सांगा , लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा ,आणि लेख तुमच्या प्रियजनांन सोबत नक्की शेयर करा . धन्यवाद