AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४

AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत 2018 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू केले गेली. आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या केंद्र सरकारच्या आरोग्याशी संबंधित महत्वपूर्ण योजना आहेत. आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी दरवर्षी 5 लाख रुपये इतकी मदत या आरोग्य योजनेमार्फत देण्यात येणार आहे. आयुष्मान भारत योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) असे देखील संबोधले जाते.

सुदृढ आणि निरोगी भारत निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या सबल लोक आरोग्या च्या तक्रारींसाठी किंवा आजारपणासाठी कितीही पैसा खर्च करू शकता किंवा आरोग्य विमा घेऊ शकता. परंतु आपल्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही आर्थिकदृष्ट्या तितकी सबल नाही. त्यामुळे मोठमोठ्या आजारांसाठी आरोग्य विमा घेणे त्यांना परवडत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या आजारपणाला योग्य ते उपचार मिळत नाही. या गोष्टी लक्षात घेता भारतातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विमा चा लाभ मिळावा. भारतातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आजारपणावर गरज असतील ते उपचार घेता यावे. यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा दिला जातो.

AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. या योजनेत नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्याला आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड दिले जाते.आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतील. वय वर्ष 18 आणि त्यापेक्षा जास्त वय असणारे नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

आयुष्मान भारत योजना कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार ,यकृत रोग,हृदयरोग, श्वसन रोग, मानसिक आजार, नवजात मुलांचे रोग, तुम्ही संसर्गजन्य आजार या आजारांवरील उपचारांसाठी 5 लाखापर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. तसेच आजारा व्यतिरिक्त औषध व वैद्यकीय पुरवठा, निदान व प्रयोगशाळा चाचण्या, वैद्यकीय रोपण सेवा, राहण्याची सोय ,अन्न सेवा, उपचारादरम्यान निर्माण होणारे गुंतागुंत आणि त्यावरील उपचार यासाठी देखील आरोग्य विम्यात तरतूद आहे. परंतु असे काही आजार आणि वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यांना आरोग्य विम्यात समाविष्ट केले गेले नाही ते असे बाह्य रुग्ण विभाग सल्लामसलत, प्रजनन संबंधी उपचार, कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, दंत उपचार, एचआयव्ही एड्स उपचार, औषध व अल्कोहोल पुनर्वसन इत्यादी

या लेखात आपण आयुष्मान भारत योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेसाठी पात्रता व अटी काय आहेत, आयुष्मान योजनेचे कार्ड म्हणजे नक्की काय आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४

AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024

आयुष्यमान भारत योजनेचे उद्दिष्टे:

भारतातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एखाद्या दुर्धर आजारासाठी आर्थिक अडचणींमुळे उपचार घेता येत नाही . हीच समस्या लक्षात घेऊन आयुष्मान भारत या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक घटकाला आरोग्य विमा पुरवून आरोग्य संबंधीच्या कोणत्याही तक्रारीसाठी उपचार घेता यावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

आयुष्मान भारत योजनेचे फायदे:

1) भारतातील 10 कोटीहून अधिक बीपीएल BPL कुटुंबांचा या योजनेत समावेश आहे.

2) या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत आरोग्य विमा दिला जातो.

3) या योजनेअंतर्गत 1350 आजारांवर उपचार केले जातात.

4) या योजनेअंतर्गत औषधांचा आणि उपचारांचा खर्च सरकारमार्फत केला जातो.

5) भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील सर्वच कुटुंबांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

6) या योजनेमुळे गरीब कुटुंबांना दुर्धर आजारासाठी उपचार करणे सहज शक्य होणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचार दिले जाणारे आजार:

PM-JAY (AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४)अंतर्गत काही गंभीर आजारांचा समावेश केला आहे. विस्तृत श्रेणीतील या आजारांवर उपचार करणे महाग असते त्यामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडू शकतो याचा विचार करून अशा आजारांवरील उपचारांचा या योजनेत समावेश केला आहे.

कर्करोग

मूत्रपिंडाचे आजार

हृदयरोग

यकृत रोग

श्वसन रोग

न्यूरोलॉजिकल विकार

मानसिक आजार

प्रोस्टेट कॅन्सर

कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग

Skull base सर्जरी

डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट

पल्मनरी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट

बर्न जखमा( भाजलेल्या च्या जखमा)

नवजात मुलांचे रोग

जन्मजात विकार

संसर्गजन्य रोग( मलेरिया/ क्षयरोग)

डेकेअर प्रक्रिया व शस्त्रक्रिया

या रोगांसाठी उपचार करताना सहसा खूप प्रमाणात खर्च येतो. हा आर्थिक भार गरीब कुटुंबातील लोकांना पेलता येणे अशक्य असते त्यामुळे PM-JAY अंतर्गत या आजारांचा समावेश केला आहे.

आजारा व्यतिरिक्त PM-JAY मध्ये या गोष्टी समाविष्ट आहेत:

पूर्व रुग्णालय भरती

सल्लामसलत, वैद्यकीय उपचार आणि तपासणी

औषध आणि वैद्यकीय पुरवठा

निदान व प्रयोगशाळा चाचण्या

वैद्यकीय रोपण सेवा

राहण्याची सोय

अन्न सेवा

उपचारादरम्यान निर्माण होणारी गुंतागुंत आणि त्यावर उपचार

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसापर्यंत फॉलो अप

या गोष्टींचा PM-JAY मध्ये समावेश आहे. परंतु ही यादी पूर्ण नाही या व्यतिरिक्त देखील अजून घटकांचा यात समाविष्ट आहे. परंतु योजनेच्या काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांचा आणि धोरणांचा विचार करूनच या गोष्टी विम्यात समाविष्ट केल्या जातात. व्यक्तीने घेतलेल्या आरोग्य सुविधा आणि व्यक्तीच्या वैयक्तिक तपशीलावर देखील खूप गोष्टी अवलंबून असतात.

आयुष्मान भारत योजनेतून वगळलेले आजार:

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत खूप महत्त्वाच्या आजारांचा आणि वैद्यकीय परिस्थितींचा समावेश करण्यात आला आहे. परंतु काही आजार आणि काही वैद्यकीय परिस्थिती यातून वगळले आहेत. त्यापैकी काही आजार आणि वैद्यकीय परिस्थिती खालील प्रमाणे:

बाह्य रुग्ण विभाग सल्ला मसलत आणि प्रक्रिया

प्रजनन संबंधी उपचार( इन विट्रो फर्टिलायझेशन)

कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया

दंत उपचार आणि प्रक्रिया

एचआयव्ही/ एड्स उपचार

औषध आणि अल्कोहोल पुनर्वसन

आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

रेशन कार्ड

कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार कार्ड

मोबाईल नंबर

रहिवासी दाखला

आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

1) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सरकार च्या mera.pmjay.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वर जा.

2) वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि स्क्रीन वरील कॅपचा कोड टाका.

3) तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी (OTP)येईल तो OTP समोरील स्क्रीनवर टाका.

4) आता जे पेज ओपन होईल त्यावरून तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करू शकता.

5) तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याचा पर्याय निवडा.

6) अर्जात विचारलेले वैयक्तिक माहिती जसे की मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर, आणि RSBY URN नंबर टाका.

7) जर तुमचे नाव ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल तर तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र आहात.

8) त्यानंतर तुम्ही फॅमिली नंबर ऑप्शन वर वर क्लिक करून योजनेबद्दल अधिक तपशील तपासू शकता.

9) अशाप्रकारे आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

आयुष्मान भारत योजनेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:

1) आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लोकसेवा केंद्र (CSC) वर जावे लागेल. तेथून अर्ज घ्यावा लागेल.

2) अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरून , आवश्यक कागदपत्रांसह अर्ज लोकसेवा केंद्रात सबमिट करावा.

3) सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुमची नोंदणी करण्यात येईल.

4) त्यानंतर 10 ते 15 दिवसात तुम्हाला लोकसेवा केंद्राद्वारे आयुष्मान भारतचे गोल्डन कार्ड देण्यात येईल.

5) आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

निष्कर्ष:

AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४ या लेखात आपण आयुष्मान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने बद्दल सविस्तर माहिती घेतली.या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारांवर घेऊ शकतो हे बघितले, गोष्टी या योजनेतून वगळले आहेत याची देखील माहिती घेतली. अशाच महत्त्वपूर्ण लेखांसाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:AYUSHAMAN BHARAT YOJANA 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४

1) आयुष्मान भारत योजनेसाठी कोण पात्र आहे?

ans: आयुष्मान भारत योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील आणि गरीब कुटुंबीय तसेच BPL कार्डधारक कुटुंबीय योजनेचा लाभ घेऊ शकतात .

2) आयुष्मान भारत गोल्डन कार्ड चे फायदे काय?

ans: आयुष्मान भारत गोल्डन कार्ड अंतर्गत मोफत उपचार घेता येतात तसेच 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ मिळू शकतो.

3) आयुष्मान भारत योजना अंतर्गत किती रुपये आरोग्य विमा मिळतो?

ans: आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळतो.

4) आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: आयुष्मान भारत योजना साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकतो.

5) आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

ans: आयुष्मान भारत योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

रेशन कार्ड, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला इत्यादी

6) आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कधी मिळते?

ans: आयुष्मान भारत योजनेत अर्ज केल्यानंतर, सर्व कागदपत्रांची पडताळणी होते त्यानंतर या योजनेअंतर्गत तुमचे नाव नोंदणी होते आणि मग तुम्हाला आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्रदान केले जाते.