Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४

अटल पेंशन योजना २०२४ परिचय आणि उद्देश :

Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४ , अटल पेंशन योजनेत असंघटीत क्षेत्रातील नागरिकांना पेंशन देणे हा मुख्य उद्देश आहे .२०१५-२०१६ मधील वार्षिक अर्थसंकल्पांत भारत सरकारने सर्वाना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेंशन सर्वच भारतीयांना लागू केली .राष्ट्रीय पेंशन पद्धती (NPS) द्वारे Pension Fund Regulatory and Development Uthority (PFRD) द्वारा संचालित हि योजना आहे .या योजनेत वर्गानिदाराला कमीतकमी वीस वर्ष या योजनेत रक्कम जमा करावी लागते .ठराविक रकमेच्या पेंशन ची हमी भारत सरकार घेते .या योजनेत वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात १००० रुपये ,२००० रुपये , ३००० रुपये , ४००० रुपये , ५००० रुपये प्रती महिना वीस वर्ष जमा करावे लागेल, त्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षापासून पेंशन मिळेल .

Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४

अटल पेंशन योजना पात्रता :

१) अटल पेंशन योजना : हि सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे .

२) केंद्र सरकार कमीत कमी १००० रुपये किंवा वार्षिक वर्गणी ५० % आपल्या कडून खात्यात जमा करेल. (जे कमी असेल ते भरेल ).हि रक्कम सरकार २०१५-१६ ते २०१९-२० या वार्षिक वर्षात खात्यावर जमा करेल .

३) हि रक्कम सरकार फक्त अ श्रेणी वर्गणी दारांना देईल जे कर भारत नाहीत .

४) व जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत सामील नाहीत .

५) हि योजना कायम चालू राहील परंतु पाच वर्ष नंतर सरकार कोणतीही रक्कम जमा करणार नाही .

६) सरकारी वर्गणी फक्त PRN धारकांना दिला जाईल जो PFRD द्वारा दिला जाईल .

अटल पेंशन योजनेत सामील व्हायचे वय आणि काळ :

१) अटल पेंशन योजनेत सामील व्हायचे वय कमीत कमी १८ वर्ष आहे .

२)अटल पेंशन योजनेत सामील व्हायचे जास्तीतजास्त वय ४० वर्ष आहे . आणि वयाच्या ६० वर्षानंतर पेंशन घेता येईल .

३)वर्गानीचा काळ कमीत कमी २० वर्ष असेल किंवा त्यापेक्षा जास्त हि असू शकतो .(२० वर्ष वर्गणी भरणे बंधनकारक आहे. )

अटल पेंशन योजनेत सहभागी कसे व्हावे :

१) सर्व पात्र व्यक्ती चे कोणत्या न कोणत्या बँकेत खाते असावे .

२)योजनेत वर्गणी जमा करण्यासाठी बँकेतून परस्पर रक्कम काढून घेण्याची सुविधा असते ज्यामुळे वर्गणी जमा करण्याचा खर्च कमी होईल त्याच बरोबर वर्गणी दाराचे कष्ट थोडे कमी होतील वेळही वाचेल.

३) वर्गणी दराने महिन्याच्या ठराविक तारखेला विशिष्ट रक्कम खात्यात शिल्लक ठेवावी म्हणजे उशिरा पैसे भरण्याचा दंड वाचेल.

४)योजना सुरु केल्यानंतर पहिल्या महिन्यात ज्या तारखेला वर्गणी भरला त्यावरून वर्गणी भरायची तारीख निश्चित केली जाते .

५) जर निश्चित केलेल्या तारखेला वर्गणी जमा होत नाही असे लक्षात आले तर खाते बंद होवून त्यातील रक्कम परत केली जात नाही .

६) योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारला जर खोटी माहिती दिली आहे असे आढळून आले तर सरकारने देलेली वर्गणी आणि त्यावरील व्याज हिरावून घेण्यात येईल.

७) Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४ योजनेत सहभागी होण्यासाठी वर्गणी दाराकडे आधार कार्ड असणे बंधन कारक आहे.

८)आधार मुलेच पती पत्नी आणि नामांकित व्यक्ती ओळखण्यास मदत होईल.

९)वर्गणी दाराने पेन्शनची रक्कम १००० ते ५००० अशी ठरवावी आणि त्यानुसारच वर्गणी भरावी .

१०)वर्गणी दाराला जर पेंशन रकमेत किंवा काळात वाढ करायची असेल किवा कमी करायचा असेल तर फक्त एप्रिल महिन्यातच वर्गणीदार हे बदल करू शकतो.

११)योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक वर्गणी दाराला सहभागी झाल्याची पावती दिली जाईल ज्यात पेन्शनची रक्कम , वर्गणीची शेवटची तारीख आणि PRN चा उल्लेख असेल.

योजनेत वर्गणी उशिरा जमा केल्यास किती दंड होतो :

१) अटल पेंशन योजनेत निश्चित तारखेला वर्गणी भरणे बंधनकारक आहे . देलेल्या तारखेला वर्गणी जमा केली नाही तर दंड घेण्याचा अधिकार बँकांना आहे .

२) दंडाची रक्कम १ रुपया ते १० रुपये प्रती महिना असू शकते .

३) १०० रुपये मासिक वर्गणी साठी : एक रुपया प्रती महिना

४) १०१ ते ५०० रुपये मासिक वर्गणी साठी: दोन रुपये प्रती महिना

५) ५०१ ते १००० रुपये मासिक वर्गणी साठी : पाच रुपये प्रती महिना

६) १००१ किंवा त्यावरील मासिक वर्गणी साठी :दहा रुपये प्रती महिना

७) वर्गणी जमा करण्याचे बंद केले तर सहा महिन्यानंतर खाते गोठवण्यात येईल किंवा बारा महिन्यानंतर खाते निष्क्रिय करण्यात येईल किंवा चोवीस महिन्यानंतर खाते बंद होईल .

वर्गणी दाराला अटल पेंशन योजनेच्या माहितीचा अलर्ट पुरविणे :

१)अटल पेंशन योजनेचा वर्गणीदार बँकेशी मोबाईल द्वारे जोडलेले असतील .

२) खात्यात शिल्लक रक्कम आणि जमा केलेला निधी याबद्दल माहिती मोबाईल द्वारे वर्गणी दाराला मिळेल .

३)वर्गणी दाराला त्याचे नाव , पत्ता , फोन नंबर बदलण्याचा अधिकार राहील.

अटल पेंशन योजनेतून बाहेर पडणे शक्य आहे का :

१)Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४ योजनेतून बाहेर पडणे अशक्य आहे .

२) काही अपवादात्मक परिस्थितीतच या योजनेतून बाहेर पडता येते जसे कि वर्गणी दाराचा अपघाती किंवा आजारपणात मृत्यू झाल्यास .

पेंशन कधी पासून घेता येते :

वयाच्या ६० व्या वर्षी वर्गणी दार त्याच्या बँकेकडे निवृत्ती वेतनाची मागणी करू शकतो .

Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४ : निवृत्ती वेतन चार्ट

योजनेत सहभागी व्हायचे वय , वर्गणी भरवायचे एकूण वर्ष , मासिक वर्गणी आणि परतावा :

१) १००० रुपये निवृत्ती हवे असेल तर :

योजनेत सहभागी व्हायचे वय वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष मासिक वर्गणी रक्कम परतावा
१८ ४२ ४२ १०००
२० ४० ५० १०००
२५ ३५ ७६ १०००
३० ३० ११६ १०००
३५ २५ १८१ १०००
४० २० २९१ १०००

२ ) २००० रुपये निवृत्ती वेतन हवे असेल तर :

योजनेत सहभागी व्हायचे वय वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष मासिक वर्गणी रक्कम परतावा
१८ ४२ ८४ २०००
२० ४० १०० २०००
२५ ३५ १५१ २०००
३० ३० २३१ २०००
३५ २५ ३६२ २०००
४० २० ५८२ २०००

३)३००० रुपये निवृत्ती वेतन हवे असेल तर :

योजनेत सहभागी व्हायचे वय वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष मासिक वर्गणी रक्कम परतावा
१८ ४२ १२६ ३०००
२० ४० १५० ३०००
२५ ३५ २२६ ३०००
३० ३० ३४७ ३०००
३५ २५ ५४३ ३०००
४० २० ८७३ ३०००

४) ४००० रुपये निवृत्ती वेतन हवे असेल तर :

योजनेत सहभागी व्हायचे वय वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष मासिक वर्गणी रक्कम परतावा
१८ ४२ १६८ ४०००
२० ४० १९८ ४०००
२५ ३५ ३०१ ४०००
३० ३० ४६२ ४०००
३५ २५ ७२२ ४०००
४० २० ११६४ ४०००

५) ५००० रुपये निवृत्ती वेतन हवे असेल तर :

योजनेत सहभागी व्हायचे वय वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष मासिक वर्गणी रक्कम परतावा
१८ ४२ २१० ५०००
२० ४० २४८ ५०००
२५ ३५ ३७६ ५०००
३० ३० ५७७ ५०००
३५ २५ ९०२ ५०००
४० २० १४५४ ५०००

Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४ FAQ:

१)अटल पेंशन योजनेत कोणत्या वयापासून गुंतवणूक करू शकतो ?

ans : वयाच्या १८ व्या वर्षापासून अटल पेंशन योजनेत गुंतवणूक करू शकतो .

२) अटल पेंशन योजनेत निवृत्ती वेतन कधी पासून मिळते ?

ans : अटल पेंशन योजनेत निवृत्ती वेतन वयाच्या ६० व्या वर्षपासून मिळते .

३) साधारण किती पेंशन मिळू शकते ?

ans: तुम्ही ज्याप्रमात वर्गणी जमा केली त्याप्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल साधारण १००० रुपये ते ५००० रुपये पर्यंत निवृत्ती वेतन मिळते .

४) अटल पेंशन योजनेत वर्गणी भरायचा कालवधी किती असतो ?

ans : अटल पेंशन योजनेत वर्गणी भरायचा कालवधी कमीत कमी २० वर्ष आणि जास्तीत जास्त ४२ वर्ष आहे .

५) Atal Pension Yojana In Marathi | अटल पेंशन योजना २०२४ कोणा साठी आहे ?

ans: अटल पेंशन योजना असंघटीत क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे.

६) अटल पेंशन योजनेसाठी कोणत्या बँकेत खाते असावे ?

ans : अटल पेंशन योजनेसाठी कोणत्याही अधिकृत बँकेत खाते असेल तरी चालेल .

७)अटल पेंशन योजनेत कसे सहभागी होवू शकतो ?

ans : अटल पेंशन योजनेत online आणि offline दोनी पद्धतीने सहभागी होवू शकतो.

८) अटल पेंशन योजनेत सहभागी होण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ?

ans: अटल पेंशन योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे .

९)जास्तीत जास्त किती निवृत्ती वेतन मिळते ?

ans : जास्तीत जास्त ५००० रुपये निवृत्ती वेतन मिळते.

१०) अटल पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे का ?

ans :अटल पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचे नागरिकत्व असणे बंधनकारक आहे .

११) अटल पेंशन योजनेत वर्गणी भरण्यासाठी उशीर झाला तर दंड आकारला जातो का ?

ans: होय ,अटल पेंशन योजनेत वर्गणी भरण्यासाठी उशीर झाला तर दंड आकारला जातो.

१२)अटल पेंशन योजनेत वर्गणी दाराला जर पेंशन रकमेत किंवा काळात वाढ करायची असेल किवा कमी करायचा असेल तो करू शकतो का ?

ans : अटल पेंशन योजनेत वर्गणी दाराला जर पेंशन रकमेत किंवा काळात वाढ करायची असेल किवा कमी करायचा असेल तर फक्त एप्रिल महिन्यातच वर्गणीदार हे बदल करू शकतो.

१३)अटल पेंशन योजनेचे update वर्गणी दाराला कसे मिळतात ?

ans: अटल पेंशन योजनेचे update वर्गणी दाराला त्याने registered केलेल्या मोबईल नंबर वर मिळतात