APPRENTICESHIP PROMOTION SCHEME 2024 IN MARATHI | शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना ,राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना ( National Apprenticeship Promotion Scheme) (NAPS) अंतर्गत महाराष्ट्रात शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजनेचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील कुशल कारागीरांना औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी आधुनिक केंद्र सामुग्री व आधुनिक तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्राप्त करून देणे कारागिरांना स्वावलंबी बनवणे हा शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश आहे.
1961 अन्वये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास इयत्ता मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात शिकाऊ उमेदवारी कायदा , 1961 मध्ये सुधारणा करून 2018 मध्ये हा नवीन कायदा पुन्हा अस्तित्वात आला, या कायद्यामुळे अंतर्गत औद्योगिक आस्थापनांमध्ये त्यांच्याकडील एकूण मनुष्यबळाच्या 25% शिकाऊ उमेदवार भरती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कायद्यांतर्गत औद्योगिक आस्थापनेत( कंत्राटी कामगारांना सहित) 30 किंवा त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ आहे अशा आस्थापनेत वित्तीय वर्षात शिकाऊ उमेदवारी 2.5% ते 15%( महाराष्ट्र राज्यासाठी मर्यादा 25%) पर्यंत करणे बंधनकारक आहे.
औद्योगिक आस्थापनेत शिकाऊ उमेदवारांची भरती करताना किमान 5 टक्के जागा फ्रेशर व कौशल्य प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात यावे.
ज्या औद्योगिक आस्थापनेत( कंत्राटी कामगारांना सहित) 4 ते 29 पर्यंत मनुष्यबळ आहे. त्यांना शिकवू उमेदवारांची भरती करणे बंधनकारक नाही. औद्योगिक आस्थापनाच्या आवश्यकतेनुसार शिकाऊ उमेदवाराची गरज असल्यास भरती करू शकतात.
ज्या औद्योगिक आस्थापनेत 3 किंवा त्यापेक्षा कमी अशा औद्योगिक आस्थापनांना शिकाऊ उमेदवार भरती करण्यास मान्यता नाही.
शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी राज्यात 45 मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTRI) कार्यरत आहेत.
APPRENTICESHIP PROMOTION SCHEME IN MARATHI | शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेत प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्यात दोन योजना राबविण्यात येत आहे.
1) राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना( National Apprenticeship Promotion Scheme) (NAPS) :
ही योजना 2016 पासून शिकाऊ उमेदवारांच्या भरती करता प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना भरती करण्यासाठी औद्योगिक आस्थापनांना दरमहा प्रती शिकाऊ उमेदवाराला विद्या वेतनाच्या 25% किंवा 1500/- रुपये यापैकी कमी असलेली रक्कम द्यावी लागेल.
हे विद्यावेतन DBT द्वारे शिकाऊ उमेदवाराच्या खात्यात जमा होते.
2) महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना ( Maharashtra Apprenticeship Promotion Scheme) (MAPS) :
शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिव का उमेदवारांची भरती वाढवण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेस 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवाराला विद्या वेतनाच्या 75% किंवा जास्तीत जास्त 5000 रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन औद्योगिक आस्थापनांना द्यावे लागेल.
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रतिवर्षी 1 लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना अंतर्गत उमेदवारांना 6 ते 36 महिन्याचे on job training देण्यात येते.
शिकाऊ उमेदवाराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात पहिल्या वर्षातील मिळणाऱ्या विद्या वेतनात दराच्या अनुक्रमे 10% ते 15 टक्के वाढ होते.
शिकाऊ उमेदवारी योजनेचे प्रकार व त्यासाठी आवश्यक अहर्ता खालील प्रमाणे आहे
अनु .क्रमांक | शिकाऊ उमेदवारीचा प्रकार | आवश्यक अहर्ता |
1 | Trade apprentice | passed out of ITIs |
2 | Fresher Trade apprentice | class 8th,10th, & 12th pass out |
3 | Graduate Apprentice | Graduate in Engineering & Non-engineering courses |
4 | Technician Apprentice | passed out of polytechnics |
5 | technical (vocational) apprentice | passed out of a 10 +2 vocational training courses |
6 | apprentice who perusing their graduation/diploma courses | – |
7 | apprentice who have passed out of any NSQF alinged short term training courses including courses under PMKVY/DDUGKY/MES | – |
8 | fresher apprentices amongst those who are class 5th pass & above who are not covered under any of the afore-mentioned categories but meet the educational /technical qualifications as specified in the course curriculum. | – |
प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना कामाच्या मोबदल्यात शासनाच्या प्रचलित दरानुसार खालील प्रमाणे विद्या वेतन देण्यात येते.
अ क्र . | प्रकार | विद्यावेतानाचा प्रतिमहा किमान दर |
१ | इयत्ता ५ वी ते ९ वी उत्तीर्ण | रु . ५०००/- |
२ | इयत्ता १० वी उत्तीर्ण | रु . ६०००/- |
३ | इयत्ता १२ वी उत्तीर्ण | रु . ७०००/- |
४ | राष्ट्रीय किंवा राज्य प्रमाणपत्र धारक | रु . ७०००/- |
५ | तंत्रज्ञ (व्यावसायिक) | रु . ७०००/- |
६ | तंत्रज्ञ (पदविका धारक ) | रु . ८०००/- |
७ | पदवी धारक | रु . ९०००/- |
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येतात. केंद्र शासनाने सुरू केलेल्या www.apprenticeshipindia.gov.in या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.
आस्थापनेचे नोंदणी, प्रशिक्षणार्थींची नोंदणी, विद्या वेतन अदा करणे व विद्यावेतन प्रतिकृती याबद्दल माहिती वेबसाईट वर नमूद करण्यात आली आहे.
हे हि वाचा
माझी लाडकी बहिण योजना २०२४https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/
पिंक इ रिक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/pink-e-rikshaw-yojana-2024/
प्रशिक्षणाचा एकूण कार्यक्रम :
प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम:
प्रत्येक अभ्यासक्रम केंद्र सरकारद्वारे डिझाईन केलेला असतो. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंतिम परीक्षा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषद नवी दिल्ली त्याद्वारे घेण्यात येते. यशस्वी उमेदवारांना अंतिम प्रमाणपत्र दिले जाते.
प्रशिक्षणासाठी प्रवेश पात्रता:
1) प्रशिक्षणासाठी व्यक्तीचे( पुरुष किंवा स्त्री) यांचे वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे.
2) प्रशिक्षणासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असावी.
प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया:
केंद्र शासनाने शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती वर्षातून केव्हाही करता येते. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणाचा कालावधी संपताच अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेस उमेदवार बसू शकतो. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते.
भरतीची पद्धत:
1) स्वतःचे मूलभूत प्रशिक्षण केंद्र असणारे आस्थापना नवीन शिकाऊ उमेदवारांना भरती करू शकते.
2) स्वतःचे मूलभूत प्रशिक्षण केंद्र नसलेल्या आस्थापना औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना शिकाऊ उमेदवार म्हणून घेऊ शकते.
3) शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी औद्योगिक आस्थापना स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊ शकता.
4) तसेच शिकाऊ उमेदवारांची भरती करण्याकरता भरती मेळावे देखील घेण्यात येतात.
प्रशिक्षण कालावधी:
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना अंतर्गत उमेदवारांना 6 ते 36 महिन्याचे on job training देण्यात येते.
प्रशिक्षण कार्यक्रम:
प्रशिक्षण कार्यक्रमात खालील गोष्टींचा समावेश आहे.
1) मूलभूत प्रशिक्षण
2) कार्यशाळा प्रशिक्षण
विद्या वेतन दर:
अ क्र . | प्रकार | विद्यावेतानाचा प्रतिमहा किमान दर |
१ | इयत्ता ५ वी ते ९ वी उत्तीर्ण | रु . ५०००/- |
२ | इयत्ता १० वी उत्तीर्ण | रु . ६०००/- |
३ | इयत्ता १२ वी उत्तीर्ण | रु . ७०००/- |
४ | राष्ट्रीय किंवा राज्य प्रमाणपत्र धारक | रु . ७०००/- |
५ | तंत्रज्ञ (व्यावसायिक) | रु . ७०००/- |
६ | तंत्रज्ञ (पदविका धारक ) | रु . ८०००/- |
७ | पदवी धारक | रु . ९०००/- |
अंतिम व्यवसाय परीक्षा:
संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिकाऊ उमेदवाराची अंतिम परीक्षा घेण्यात येते. त्या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येते.
शिकाऊ उमेदवार भरती:
शिकाऊ उमेदवारांची भरती वर्षातून केव्हाही करता येते. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी संपताच उमेदवार अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत बसू शकतो. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते.
रोजगाराची ऑफर आणि स्वीकृती:
औद्योगिक आस्थापनाने शिकाऊ उमेदवाराला रोजगार देणे बंधनकारक असणार नाही.
तसेच या औद्योगिक व्यवस्थापनात उमेदवाराने प्रशिक्षण पूर्ण केले आहे तेथेच नोकरी स्वीकारणे उमेदवाराला बंधनकारक असणार नाही.
शिकाऊ उमेदवारीचा करार:
प्रत्येक शिकाऊ उमेदवार आणि औद्योगिक आस्थापनेत प्रशिक्षणाचा करार केला जातो. शिकाऊ उमेदवार अल्पवयीन असेल तर उमेदवाराचे पालक आणि आस्थापनेत करार होतो. करारनाम्यात सरकार, आस्थापना, आणि शिकाऊ उमेदवार त्यांची काय कर्तव्य आहेत ते आपण बघूयात.
1) सरकार:
शिकाऊ उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा साठी साठी खर्च करणे.
शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणाच्या प्रगतीची पाहणी करणे
शिकाऊ उमेदवारां चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंतिम परीक्षा घेणे आणि प्रमाणपत्र देणे.
2) आस्थापना:
चांगले मार्क्स असलेल्या शिकाऊ उमेदवाराला नियुक्त करणे.
शिकाऊ उमेदवारांना व्यवसायाच्या तसेच शॉप फ्लोर प्रशिक्षणाच्या संबंधित सर्व सूचना देणे.
शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन देण्यासह प्रशिक्षण देण्यासाठी खर्चाचा जो नमूद केलेला हिस्सा आहे तो देणे.
शिकाऊ उमेदवारांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण यांची काळजी घेणे.
3) शिकाऊ उमेदवार:
शिकाऊ उमेदवाराने त्याचा व्यवसायाचा अभ्यासक्रम प्रामाणिकपणे पूर्ण करणे.
औद्योगिक आस्थापनाच्या नियमांचे व कायद्याचे पालन करणे.
गुन्हे आणि दंड
करारात सांगितलेल्या अटी व शर्ती पूर्ण करण्यात एखादी औद्योगिक आस्थापना अपयशी ठरले आणि त्यामुळे शिकाऊ उमेदवाराचा करार संपुष्टात आल्यास त्या आस्थापनाने शिकाऊ उमेदवाराला त्याच्या शेवटच्या तीन महिन्यांच्या विद्या वेतनाच्या समान रकमेची भरपाई द्यावी.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/
प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/
प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/
प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/
प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/