PINK-E-RIKSHAW YOJANA 2024 |पिंक इ -रिक्षा २०२४ योजना

PINK-E-RIKSHAW YOJANA 2024 |पिंक इ -रिक्षा २०२४ , महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या 2024 25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक इ रिक्षा या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे.

महाराष्ट्र सरकार नेहमीच महिलांसाठी विविध योजना राबवत असते. महिलांचा विकास व्हावा महिलांनी आत्मनिर्भर बनवावा, त्यांना आर्थिक स्वावलंबी बनता यावं यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजनांच्या घोषणा सरकारने केले आहे. या माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना यासारख्या विविध योजना आहेत.

या सर्व योजनांचा उद्देश फक्त एकच आहे की राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्माण करून देणे, त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे, राज्यातील प्रत्येक महिला व मुलीला आत्मनिर्भर बनवणे, तसेच त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे.

PINK-E-RIKSHAW YOJANA 2024 या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे हा आहेच त्याच बरोबर महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा हाही यामागचा उद्देश आहे. पिंक इ -रिक्षा योजनेसाठी महाराष्ट्रातील सतरा शहरांची निवड करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे ,नाशिक, नागपूर, कल्याण ,अहमदनगर, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरांचा पिंक इ -रिक्षा योजनेत सहभाग असणार आहे. या शहरांमधील इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकार तर्फे अर्थसहाय्य मिळणार असून रिक्षा चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा ही देण्यात येणार आहे. हिमा योजना मुख्यत्वे गरजू मुली आणि महिलांसाठी आहे.

पिंक इ -रिक्षा योजनेअंतर्गत 10,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला गुलाबी रिक्षा योजना असेही संबोधले जात आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज करताना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात, तसेच योजनेसाठी पात्रता व अटी काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात बघणार आहोत.

PINK-E-RIKSHAW YOJANA 2024 |पिंक इ -रिक्षा २०२४

पिंक इ -रिक्षा योजनेचा उद्देश:

1) राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे.

2) राज्यातील महिला व मुलींना रिक्षा मिळवून देण्यासाठी अर्थसहाय्य तर मिळेलच परंतु रिक्षा चालवण्यासाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

3) महिला व मुलींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.

4) गरजू महिला व मुलींना आत्मनिर्भर बनवणे.

5) राज्यातील महिला व मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.

6) राज्यातील महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा हा या योजनेचा आणखी एक उद्देश आहे.

पिंक इ -रिक्षा योजनेचे स्वरूप:

1) या योजनेअंतर्गत गरजू महिला व मुलींना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.

2) अर्थसहाय्य याबरोबरच चालविण्यासाठी च्या इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

3) ई रिक्षा च्या किमतीमध्ये सर्व करांचा म्हणजेच GST, Registration,Road Tax इत्यादींचा समावेश असणार आहे.

4) नागरी सहकारी बँका/ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/ राष्ट्रीयकृत बँका/ अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँका या सर्वांकडून ई रिक्षा किमतीचा 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

5) ई रिक्षा च्या एकूण किमतीच्या 20% रक्कम ही राज्य सरकार देणार आहे.

6) लाभार्थी महिला व मुलींना एकूण किमतीच्या 10% रक्कम द्यावी लागणार आहे.

7) एकूण कर्जाचा परतफेड कालावधी हा पाच वर्ष असणार आहे.

पिंक इ -रिक्षा योजनेतील लाभार्थी:

महाराष्ट्र राज्यातील गरजू मुली व महिला.

पिंक इ -रिक्षा योजनेसाठी पात्रता :

1) योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

2) अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.

3) अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

4) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे.

5) अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे वाहन चालक परवाना असणे बंधनकारक आहे.

6) विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्य गृह मधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षण गृह/ बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.

7) महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील महिला व मुलींना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येईल.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/

पिंक इ -रिक्षा योजनेच्या अटी:

1) या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला एकदाच लाभ घेऊ शकते.

2) लाभार्थी महिलेने शासनाच्या महिलांसाठीच्या इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

3) लाभार्थी महिला हे कर्जबाजारी नसावी.

4) कर्जाची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलेची असेल.

PINK E- RIKSHAW YOJANA 2024

पिंक इ -रिक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

पॅन कार्ड

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र

कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचे फोटो

मतदार ओळखपत्र

रेशन कार्ड

वाहन चालक परवाना

योजनेमार्फत मिळालेली रिक्षा लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र

योजनेच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत चे हमीपत्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 https://marathisampada.com/punyashlok-ahilyadevi-holkar-mahila-startup-yojana-2024/

पिंक इ -रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

1)नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेबद्दल घोषणा करण्यात आली . या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट लवकरच महिलांसाठी व मुलींसाठी खुली करून देण्यात येणार आहे. वेबसाईट खुली झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील महिला व मुली या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

2)अर्जा बरोबरच वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची छायाप्रत ऑनलाइन अर्ज करताना सबमिट करावे लागेल.

3) तुमच्या अर्जाची आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र तर तुम्हाला कळविण्यात येईल. आणि त्यानंतर निवड प्रक्रिया करण्यात येईल.

4) त्यानंतर लाभार्थ्याला रिक्षा खरेदीसाठी बँकेकडून जे 70% कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता बँकेत करावी लागेल. त्यानंतरच कर्ज मंजूर करण्यात येईल.

5) बँकेने रिक्षा किमतीच्या 70 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर लाभार्थी ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम भरणे अनिवार्य आहे.

6) लाभार्थ्याला परमिट मिळाल्यानंतर शासनातर्फे उरलेली 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला देण्यात येईल.

7) पिंक इ रिक्षा ही लाभार्थी महिले कडूनच चालवली जात आहे की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्र आणि परिवहन विभागाची राहील.

8) पिंक रिक्षा पुरुष चालविताना आढळून आल्यास ती रिक्षाच्या महिलेची आहे तिच्यावर कारवाई करण्यात येईल.

निष्कर्ष:

PINK-E-RIKSHAW YOJANA 2024या लेखात आपण पिंक इ रिक्षा या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. या योजनेअंतर्गत कोणकोणत्या शहरातील महिला व मुली या योजनेचा लाभ घेऊ शकता याबद्दल माहिती घेतली. योजनेसाठी पात्रता व अटी काय आहे, योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागता याबद्दल सविस्तर माहिती घेतली. योजनेचा जास्तीत जास्त गरजू महिला व मुलींना लाभ घेता यावा यासाठी हा लेख जास्तीत जास्त महिला व मुलींना शेअर करा. महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनां ची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:पिंक इ -रिक्षा २०२४

1) पिंक इ रिक्षा योजना कोणासाठी आहे?

ans: पिंक ए रिक्षा योजना महाराष्ट्र राज्यातील गरजू महिला व मुलींसाठी आहे.

2) पिंक इ रिक्षा योजनेअंतर्गत किती महिलांना लाभ घेता येईल?

ans:पिंक इ रिक्षा योजनेअंतर्गत 10,000 महिलांना लाभ घेता येईल.

3)पिंक इ रिक्षा योजनेसाठी वयाची काय अट आहे?

ans: या योजनेसाठी महिला व मुलीचे वय 18 ते 35 वर्षे या वयोगटातील असावे.

4)पिंक इ रिक्षा योजना राज्यातील किती शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे?

ans:पिंक इ रिक्षा योजना राज्यातील 17 शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे.

5)पिंक इ रिक्षा योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans:पिंक इ रिक्षा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

आधार कार्ड, पॅन कार्ड,महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र,कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला,बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो,मतदार ओळखपत्र,रेशन कार्ड,वाहन चालक परवाना, योजनेमार्फत मिळालेली रिक्षा लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र, योजनेच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत चे हमीपत्र इत्यादी.

6)पिंक इ रिक्षा योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करावा?

ans:पिंक इ रिक्षा योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

7)पिंक इ रिक्षा योजने अंतर्गत मिळणारी रिक्षा लाभार्थी महिलेनेच चालवावी हे बंधनकारक आहे का?

ans:पिंक इ रिक्षा योजने अंतर्गत मिळणारी रिक्षा लाभार्थी महिलेनेच चालवावी हे बंधनकारक आहे .

8)पिंक इ रिक्षा योजनेचा लाभ एकदाच घेता येतो का?

ans: पिंक इ रिक्षा योजनेचा लाभ एकदाच घेता येतो

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/