PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR MAHILA STARTUP YOJANA 2024 | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR MAHILA STARTUP YOJANA 2024 | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024, स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने खूप महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच महिलांसाठी विविध योजनांची आखणी करत असते. महाराष्ट्रातील महिलांनी सर्व क्षेत्रात आघाडीवर राहावे. सर्वच क्षेत्रात प्रगती करावी यामागे मानस असतो. अशाच विविध योजनांची घोषणा सरकारने अर्थसंकल्पात केली.

पुरुषांप्रमाणे महिलांना देखील स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. परत व्यवसाय कसा चालू करावा. त्यासाठी आर्थिक सहाय्य मिळविणे थोडे कठीण होते. स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना खूप फायद्याची आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एक लाखापासून ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाईल.

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR MAHILA STARTUP YOJANA 2024 योजने अंतर्गत स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना या आर्थिक मदतीमुळे स्वतःचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मोठे पाठबळ मिळेल. त्याचप्रमाणे इतरही महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या योजनेचा फायदा हा फक्त महिलांनाच मिळणार असून महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, महिला स्वावलंबी होतील आणि यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावेल यात काही शंका नाही.

ज्यावेळेस महिला एखादा स्टार्टअप चालू करतात त्यावेळेस महिलांना विविध प्रकारच्या आव्हानांना आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेसा निधी अभावी एखादा स्टार्टअप यशस्वी होणे थोडे अवघड ठरते. अशावेळी महिलांना योग्य मार्गदर्शन करून तसेच स्टार्टअप चालू करण्या विषयीची योग्य ती पद्धत समजावून सांगणे त्याचप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले तर महिला नक्कीच उत्तम व्यवसाय करू शकतात . आणि इतरही महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात.

महिला नेतृत्वातील स्टार्टअप मुळे/ व्यवसायामुळे स्थानिकांच्या गरजा लक्षात घेता तसेच स्थानिक ठिकाणी जो कच्चामाल उपलब्ध आहे त्यावर आधारित स्टार्टअप / व्यवसाय विकसित होऊ शकतील. असे महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या जीआर मध्ये म्हटले आहे.

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR MAHILA SATRTUP YOJANA 2024 योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळू शकतो. योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेसाठी चा पात्रता व अटी काय आहेत, योजनेचा अर्ज करताना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात. याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR MAHILA STARTUP YOJANA 2024

योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप:

1) महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या नेतृत्वातील व्यवसायांना/ स्टार्टअप ला पाठिंबा देणे हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा मुख्य उद्देश आहे.

2) राज्यातील ज्या महिला स्वतःचा व्यवसाय करू इच्छिता आणि नवीन संकल्पनेचा विचार करून नवीन व्यवसाय करू इच्छिता अशा महिलांना एक वेळेस आर्थिक मदत करणे.

3) राज्यातील महिलांना व त्यांच्या स्टार्टअप ला स्वावलंबी बनवणे.

4) महाराष्ट्र राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविणे.

5) देशातील सर्वात जास्त महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे नवीन ओळख निर्माण करणे.

6) नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

7) राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.

8) या योजनेअंतर्गत महिला स्टार्टअप ला एक लाख ते 25 लाख इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

9) आर्थिक सहाय्याची रक्कम व्यवसायाच्या उलाढाली नुसार ठरवण्यात येईल.

10) या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम महाराष्ट्र शासनाद्वारे मागासवर्गातील महिला, आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/

योजनेसाठी पात्रता:

1) उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार(Department for Promotion of industry & internal trade) मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप या योजनेसाठी पात्र असतील.

2) व्यवसायामध्ये/ स्टार्टअप मध्ये महिला संस्थापकांचा किंवा संस्थापकांचा किमान 51% इतका वाटा असणे आवश्यक आहे.

3) महिलांनी चालू केलेला व्यवसाय हा कमीत कमी एक वर्षापासून कार्यरत असलेला असावा.

4) महिला नेतृत्वातील स्टार्टअप ची/ व्यवसायाची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असावी.

5) महिला नेतृत्वातील स्टार्टअप ने याआधी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून आर्थिक लाभ मिळवलेला नसावा.

6) महाराष्ट्र राज्यातील फक्त महिला या योजनेसाठी पात्र असतील.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

कंपनी प्रस्ताव

कंपनी नोंदणी प्रमाणपत्र(MCA)

DPIIT मान्यता प्रमाणपत्र

कंपनी बँक खाते स्टेटमेंट

या आधी शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-tirth-darshan-yojana-maharashtra-2024/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे अधिकृत वेबसाईट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे अधिकृत वेबसाईट https://www.msins.in/

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR MAHILA STARTUP YOJANA 2024

योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजने साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चण्याच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

2) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे

https://www.msins.in

3) वेबसाईट वर गेल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

4) अर्जात वैयक्तिक माहिती बरोबरच कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र(MCA), DPIIT मान्यता प्रमाणपत्र यांची माहिती द्या.

5) सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर सबमिट करा.

6) तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची योग्य ती पडताळणी केली जाईल.

7) आश्वासक, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येणार आहे.

8) त्याचप्रमाणे ज्या व्यवसायातून रोजगार निर्मिती जास्त प्रमाणात होणार अशा स्टार्टअप ला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

9) वरील सांगितलेल्या (7/8) निकषांची पूर्तता करणाऱ्या स्टार्टअप चे सादरीकरण सत्र घेण्यात येईल त्यानुसार स्टार्टअप ची निवड करण्यात येईल.

10) या सगळ्या निकषांवर पात्र ठरलेल्या स्टार्टअप ला योजनेचा लाभ घेता येईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजने मध्ये स्टार्टअप ची निवड प्रक्रिया:

1)आश्वासक, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येणार आहे.

2) ज्या व्यवसायातून रोजगार निर्मिती जास्त प्रमाणात होणार अशा स्टार्टअप ला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

3) निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध समित्या नेमण्यात येणार आहेत.

4) बँकिंग तसेच स्टार्टअप क्षेत्रातील अग्रगण्यसंस्थेच्या मदतीने निवड प्रक्रिया तसेच निधी वितरण प्रक्रिया राबविण्यात येईल.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana-maharashtra-2024/

निष्कर्ष:

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR MAHILA STARTUP YOJANA 2024 | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 या लेखात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेबद्दल सविस्तर माहिती बघितली. या योजनेअंतर्गत कोणत्या स्टार्टअप ला प्राधान्य देण्यात येणार आहे. याबद्दल माहिती बघितली. या योजनेमुळे महिला स्वावलंबी होतील, आत्मनिर्भर बनतील, त्याचप्रमाणे नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील. जास्तीत जास्त महिलांनी सरकारच्या या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार च्या विविध योजनांमधील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या अधिकृत वेबसाईटला आवश्यक भेट द्या. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना फायदा होण्यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:

1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना काय आहे?

ans: महाराष्ट्रातील स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आणि स्वतःचा व्यवसाय करत असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे.

2) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळणार आहे?

ans:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत एक लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे?

3) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोणासाठी आहे?

ans: ही योजना महाराष्ट्रातील नवीन स्टार्टअप/ व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आहे.

4) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.

5) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची अधिकृत वेबसाईट काय आहे?

ans: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे: https://www.msins.in/

6)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कधीपासून सुरू झाली आहे?

ans:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना जून 2024 सुरू झाली आहे.

7)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ans:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिला घेऊ शकतात.

8)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोणत्या राज्यासाठी आहे?

ans:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्र राज्यासाठी आहे.

9)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना फक्त महिलांसाठीच आहे का?

ans: होय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना फक्त महिलांसाठीच आहे.

10)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत कोणत्या स्टार्टअप स ला प्राधान्य देण्यात येणार आहे?

ans:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत आश्वासक, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येणार आहे.

11)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील स्टार्टअप ला मिळणार आहे का?

ans: होय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील स्टार्टअप ला मिळणार आहे .

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/