MUKHYAMANTRI ANNAPURNA YOJANA 2024 |मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र २०२४

MUKHYAMANTRI ANNAPURNA YOJANA 2024 |मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र २०२४ , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा करण्यात आली. त्यातीलच एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. देशामध्ये तसेच राज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबद्दल नेहमीच कमी अधिक प्रमाणात चर्चा होत असते. अशातच महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजनेची घोषणा करून महिलांना वर्षाला तब्बल तीन घरगुती सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र २०२४ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला घरगुती वापरासाठी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. ही योजना सर्वांसाठीच लागू असणार नाही. योजनेसाठी ही पात्रता व अटी आहेत. त्यांची पूर्तता केल्यानंतरच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येईल.

अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करताना सांगितले की या योजनेमुळे ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे शहरी भागातील देखील महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी होणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात चुलीसाठी वापरण्यात येणारे इंधन आणि त्यामुळे तयार होणाऱ्या धुराचा घरातील महिलेला तसेच घरातील लहान मुलांना त्रास होतो. या धुरामुळे श्वसनाचे विकार जडतात. अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबीय वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळू शकतात. आणि आरोग्य समस्यांना आळा घालू शकता.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना वर्षाला घरगुती वापरासाठी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेसाठी त्याने काही पात्रता व अटी घालून दिले आहेत. तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करावा, अर्ज करताना कोणकोणती आवश्यक कागदपत्रे सोबत असावी याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

MUKHYAMANTRI ANNAPURNA YOJANA 2024 |मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र २०२४

MUKHYAMANTRI ANNAPURNA YOJANA MAHARASHTRA 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश:

1) योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

2) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

3) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना वर्षाला घरगुती वापरासाठी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

4) या योजनेमुळे महिलांच्या आणि घरातील लहान मुलांच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे.

5) या योजनेमुळे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे जीवनमान उंचावणार आहे.

6) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे गरीब कुटुंबीयांना अन्न शिजवण्यासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करता येणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये:

1) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबीयांना वर्षाला घरगुती वापरासाठी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.

2) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर दिले जातील .

3) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे गरीब कुटुंब यांना अन्न शिजवण्यासाठी स्वच्छ एलपीजी इंधनाचा

वापर करता येणार आहे.

4) पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे.

5) येत्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येईल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अटी:

1) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

2) महाराष्ट्र राज्याबाहेरील व्यक्तीला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही.

3) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला फक्त तीनच गॅस सिलेंडर मोफत मिळतील.

4) या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरचा लाभ घेतल्यानंतर लागणारे अतिरिक्त गॅस सिलेंडर हे लाभार्थ्याला विकत घ्यावे लागते.

5) योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीचा कुटुंबात कितीही गॅस कनेक्शन असले तरी एकाच सदस्याला योजनेचा लाभ घेता येईल.

6) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारा च्या कुटुंबात किमान पाच सदस्य असणे आवश्यक आहे.

7) पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

8) पांढऱ्या रेशन कार्ड धारक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता :

1) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.

2) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात किमान पाच सदस्य असणे आवश्यक आहे.

3) स्वतःच्या नावाचे रेशन कार्ड असलेली व्यक्तीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकते.

MUKHYAMANTRI ANNAPURNA YOJANA MAHARASHTRA 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

रहिवासी दाखला

रेशन कार्ड

मतदार ओळखपत्र

एलपीजी गॅस कनेक्शन

बँक खाते नंबर

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचे फोटो

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-tirth-darshan-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत:

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आत्ताच घोषणा केली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच अधिकृत वेबसाईट लाभार्थ्यांसाठी खुली करण्यात येईल तोपर्यंत लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला लेखाद्वारे लवकरात लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करू.

निष्कर्ष:

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र २०२४ या लेखात आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सविस्तर माहिती. योजनेतील लाभार्थी कोण कोण आहेत. योजनेसाठी कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली. योजनेसाठी अर्ज करण्याच्या पद्धतीबद्दल आम्ही लवकरच आपल्याला अपडेट कळवू.

महिलांसाठीच्या, मुलींसाठी चा, शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विविध योजनांचे सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. आणि या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना पोचविण्यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.

FAQ:MUKHYAMANTRI ANNAPURNA YOJANA 2024

1) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा कधी करण्यात आली?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी करण्यात आली.

2) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना वर्षाला घरगुती वापरासाठी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

3) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किती गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

4) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात सदस्य किती असावे?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात किमान पाच सदस्य असावेत.

5) कोणत्या रेशन कार्ड धारकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे?

ans: पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे.

6) पांढरे रेशन कार्ड धारक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकता का?

ans: नाही, पांढरे रेशन कार्ड धारक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

7) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र,एलपीजी गॅस कनेक्शन, बँक खाते नंबर, मोबाईल नंबर,पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी.

8) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

9) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्यासाठी आहे?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्यासाठी आहेत.

10) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी बंधनकारक आहे का?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी बंधनकारक आहे.

11) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कधी पासून मिळणार आहे?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ जुलै 2024 पासून मिळणार आहे.

12) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणासाठी आहे?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे.

13) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केले?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली.

14) महाराष्ट्र बाहेरील व्यक्ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करू शकते का?

ans: महाराष्ट्र बाहेरील व्यक्ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.

15) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी महाराष्ट्रातील कोणत्या महिला अर्ज करू शकतात?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला अर्ज करू शकता.

16) महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या योजना कोण कोणत्या आहेत?

ans: महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना, लखपती दीदी योजना, या योजना सुरू केल्या आहेत.

17) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कोणत्या वयोगटातील महिला घेऊ शकतात?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची कोणती अट नाही.

18) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कधीपासून सुरू झाली आहे?

ans: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जून 2024 पासून सुरू झाली आहे.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/