100 Marathi Ukhane|मराठी उखाणे

Marathi Ukhane |मराठी उखाणे किवा उखाणा म्हणजे पती किंवा पत्नीचे नाव घेऊन शब्दांचे यमक जुळवून तयार केलेली सुंदर शब्द रचना म्हणजे उखाणा . पिढ्यान पिढ्या चालत आलेले असे उखाणे मराठी लोक वाड्मयातील अनमोल खजिनाच आहे .


Marathi Ukhane |मराठी उखाणे हे कुणी लिहून ठेवलेले नाही किंवा पाठ केलेले नाही ते एका स्त्री कडून दुसऱ्या स्त्री कडे असेच तोंडी संक्रमण होत गेलेले आहे. परंतु आजकाल पूर्वी सारखी एकत्र कुटुंब पद्धत राहिली नाही , घरात वयस्कर लोक असतातच असा नाही , परंतु मंगल प्रसंगी , सणासुदीला , लग्न कार्यात वधु -वराला नाव घ्यावेच लागते, त्यावेळी काय नाव घ्यावे याचे कोडे पडते म्हणून अश्या नाव वधु वरांसाठी उखाण्याचा खास संग्रह देत आहोत .

Marathi Ukhane


Marathi Ukhane | Marathi Ukhane for Bride | मराठी उखाणे | नवरी साठी मराठी उखाणे


१) मंदिरात वाहते , फुल आणि पान ,

—– रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान

२)छन छन बांगड्या , छुम छुम पैंजण

—–रावांचे नाव घेते, एक सारे जन

३)गोकुळ सारखा सासर , सारे कसे हौशी

—-रावांचे नाव घेते , तीळ संक्रातीच्या दिवशी

४)माहेर तसं सासर , नाते संबंधही जुने

—-रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

५) कपाळाचा कुंकु, जसा चांदण्याचा ठसा

—-रावांचे नाव घेते, सारे जन बसा

६) रातराणीचा सुगंध , त्यात मंद वारा

—-रावांचे नावाचा , भरला हिरवा चुडा

७ ) खडी साखरेची गोडी अन फुलांचा सुगंध

—-रावांच्या संसारात , स्वर्गाचा आनंद

८) पंचपक्वनाच्या ताटात , वाढले लाडू पेढे

—–रावांचे नाव घेताना , कशाला आढे वेढे

९) मंदिराचे वैभव , परमेश्वराची मूर्ती

—–रावांचे नाव घेवून करते इच्छापूर्ती

१०) सनई आणि चौघडे , वाजे सप्त सुरात

—–रावांचे नाव घेते,—–च्या घरात

११) कपाळावर कुंकू , हिरवा चुडा हाती

—-रावं माझे पती , सांगा माझे भाग्य किती

१२) मोह नाही , माया नाही , नाही मत्सर हेवा

—–रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा

१३)संसार रुपी वेलीला गगनात गेला झुला

—-रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा मला

१४)अंगणात वृंदावन , वृंदावनात तुळस

—-रावांचे नाव घेते , मला कसला आळस

१५)पतीव्रतेचे व्रत घेवून ,नम्रतेने वागते

—–रावांचे नाव घेताना , आशीर्वाद मागते .

१६)लावीत होते कुंकू , त्यात पडला मोती

—–रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती

१७)ताजमहाल बांधायला , कारागीर होते कुशल

—-रावांचे नाव घेते , तुमच्या साठी स्पेशल

१८) कन्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर

—-रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर

१९) शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन

—–रावांचे नाव घेते , सर्वांचा मान राखुन

२०) श्री विष्णुच्या मस्तकावर सदैव असतो शेष

—-रावांचे नाव घेवून करते गृह प्रवेश

२१) यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली

—–रावांची जन्मदाती धन्य ती माऊली

२२) अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा

—–रावांना घास भरवते वरण-भात-तुपाचा

२३)लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा

—-रावांचे नाव घेवून उखाणा करते पुरा

२४) पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार

—–रावांच्या नावाने घालते मंगल सूत्राचा हार

Marathi Ukhane for Bride | नवरी साठी मराठी उखाणे

Marathi Ukhane

२५)आकाशी चमकती तारे , जमिनीवर चमकती हिरे

—-रावं हेच माझे अलंकार खरे

२६) पूजेच्या साहित्यात उदबतीचा पुडा

—–रावांच्या नावाने , भरला सौभाग्याचा चुडा

२७) सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान

—-रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान

२८) राज हंस पक्षी शोभा देतो वनाला

—–रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला

२९) श्री कृष्णाने पण केला रुक्मिनीलाच वरीन

—–रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन

३०)जन्म दिला मातेने , पालन केले पित्याने

—-रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

३१) वय झाले लग्नाचे , लागली प्रेमाची चाहूल

—-रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल

३२) घातली मी वरमाला हसले —-राव गाली

थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली

३३) जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मुक होऊन

घडविले देवानी —– रावांना जीव लावून

३४) धरला यांनी हात , वाटली वाटली मला भीती

हळूच म्हणाले —-राव अशीच असते प्रीती

३५)नववधु आले मी घरी, जीव माझा गेले बावरून

—-रावांनी मारली हाक , शिनच गेला निघुन

३६) हृदयात दिले स्थान , तेव्हा दिला हातात हात

—-रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवात

३७) नव्हती कधी गाठ भेट, एकदाच झाली नजरा नजर

आई वडील विसरले ,—-रावांसाठी सुटला प्रीतीचा पाझर

३८) राम, लक्ष्मण , भरत , शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार

—–रावांनी घातला मला मंगल सूत्राचा हर

३९)पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा

—–रावांनी आणला मला मंगल सूत्राचा हार

४०)चांदीचे जोडावे पतीची खुन

—–रावांचे नाव घेते ,—ची सुन

४१) दारी होता टेबल , त्यावर होता फोन

—-रावांनी सिनेमा दाखवला हम आपके है कोण ?

४२) अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होते पाणी

आधी होते आई -बाबाची तान्ही , आता झाले—–रावांची राणी

४३) गुलाबाचे फुल दिसायला ताजे

—-रावांचे नाव घेते, सौभाग्य ,माझे

४४) डाळिंबाचे झाड,पानोपानी दाटले

—रावांचे नाव घेताना, आनंदी मला वाटले

४५) ओल्याचिंब केसांना , टॉवेल द्या पुसायला

—-रावांचे नाव घेते, शालू द्या नेसायला

४६) डाळींब ठेवले फोडून संत्राची काढली साल

—रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

४७)अंगणात होती मेथी , पाणी घालू किती

—-रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी

४८) हिमालय पर्वतावर , बर्फाच्या राशी

—-रावांचे नाव घेते —–च्या दिवशी

४९)वेळेचे कालचक्र फिरते रात्र -दिवस कधी पुनव कधी अवस

—–रावांचे नाव घेते , आज हळदी कुंकवाचा दिवस

४९) शरदाचे संपले अस्तित्व , वसंताची लागली चाहूल

—-रावांचे नाव घेत संसारात टाकते पहिले पाऊल

५०) गृह कामाचे शिक्षण देते माता

—-रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता

Marathi Ukhane | मराठी उखाणे |

Marathi Ukhane

५१) दीन दुबल्यांचे गाऱ्हाणे परमेश्वराने ऐकावे

—-रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे

५२) पौषातील धुंद वर छेडीतो, माझ्या अंगाला

——रावांचे नाव घेते सुर्यानारायानाच्या साक्षीने

५३) चंदेरी सागरात , रुपेरी लाटा

—–रावांच्या सुखदु:खात अर्धा माझा वाटा

५४) नाजुक अनारसे साजूक तुपात तळावे

——रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

५५) —-रावांच्या नावाने , भरला हिरवा चुडा

त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

५६) पौर्णिमेच्या दिवस चंद्राला लागते चाहूल

—–रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल

५७) तळ हातावर मेहंदी रचली , त्यावर तेल शिंपडले

—–रावांचे मान, मी केव्हाच जिंकले

५८) केसात मळते रोज , मी गुलाबाचे फुल

—-राव माफ करतात माझी प्रत्येक भुल

५९) मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले

—–रावांचे हेच रूप मला आवडले

६०)आज सारे सुख माझ्या दारी दाटले

—-रावांचे प्रेम अजून नाही आटले

६१) मला गुणवान पती मिळाले , याचा वाटतो प्रत्येकीला हेवा

—–राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

६२) माझ्या सासरी आहे सुंदर हिरवा मळा

—-रावांमुळे लागला मला त्याचा लळl

६३)शिक्षणाने विकसित होते, संस्कारित जीवन

—-रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

६४)इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग

—–रावांच्या संसारात मी आहे दंग

६५) निळ्या नभात चंद्राचा प्रकाश

—–रावांवर आहे माझा विश्वास

६६) प्रेमळ शब्द मागे भावना असते कौतुकाची

—-रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची

६७) चंद्राचा झाला उदय अन समुद्राला आली भरती

—–रावांच्या प्रेमापुढे सर्व दु:ख हरती

६८)नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार

—–रावांचा स्वभाव आहे फारच उदार

६९) करवंदाचे साल चंदनाचे खोड

—-रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

७०) सुख दुखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले

—-रावांच्या सहवासाचे भाग्य मला मिळाले

७१) वसंतातील डाळ पन्ह , देती थंडावा

—–रावांसह मला आपला आशीर्वाद हवा

७२) सुशिक्षित घरात जन्मले , कुलवंत घरात आले ,

—–रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

७३) मंगल देवी, मंगल माता वंदन करते तुला

—-रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

७४) पिवळा पितांबर श्री कृष्णाने अंगावर घातला

—–रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

७५)पती व्रतेचे व्रत घेवून , नम्रतेने वागते

—-रावांचे नाव घेवून आशीर्वाद मागते

Marathi Ukhane | Marathi Ukhane for Bride | मराठी उखाणे | नवरी साठी मराठी उखाणे

Marathi Ukhane | Marathi Ukhane for Bride | मराठी उखाणे | नवरी साठी मराठी उखाणे

marathi Ukhane

७६)सासू-सासर्यांनी काम कला पुण्याच

—–रावांचे दान दिले मला जन्माचे

७७) गळ्यात मंगळसूत्र , मंगल सूत्रात डोरलं

—–रावणे नाव माझ्या हृदयात कोरल

७८) मंद मंद गंध घेताना झाले मी धुंद

—-रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद

७९) पेरूची फोड दिली पिंजर्यातल्या पोपटाला

—-रावांचे नाव घेते चंद्र तारे आहे साक्षीला

८०) कशी बाई कोकिला , कुहू कुहू बोले

—-रावांनी आणले माझ्यासाठी सोन्याची कर्णफुले

८१) मंदिराच्या गाभारयात विठालाची मूर्ती

—–रावांची होवो सगळीकडे कीर्ती

८२) चांदीच्या चमच्याने वाढते मीठ

घाबरू नका —–रावांचा संसार करीन मी नीट

८३) आपले राष्ट्रगीत आहे जणगणमन

—रावांनl अर्पण केले तनमनधन

८४)आधुनिक स्वयंपाक घरात शोभतो जेवणाचा टेबल

—-रावांच्या नावा समोर माझ्या नावाचे लागले लेबल

८५) दिल्ली राजधानी आहे भारताची , मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची

—–राव आहेत तर कमी नाही कशाची

८६) पूर्ण नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी

—-रावा सोबत आले मी सासरी

८७)आम के पेड पार बैठे थे बंदर

—-रावजी का घर स्वर्ग से सुंदर

८८) इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून

—–रावांचे नाव घेते —सुन

८९) गुलाबाचे फुल मधोमध पिवळे

—-राव दिसतात कृष्णासारखे सावळे

९०) दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून

—-रावांचे नाव घेते तुमचा मान राखून

९१)कवीची कविता कवीनेच वाचावी

—–रावांची प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी

९२) अंगणी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी

—-रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे वेळी

९३) जीवन रुपी कादंबरी वाचली दोघांनी

—-रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

९४) ज्योतीला मिळेल ज्योत आता पडेल प्रकाश

—–रावांच्या जीवनात ठेंगणे होईल आकाश

९५) गुलाबाचे फुल दिसायला छान

—–रावांचे नाव घेता ठेवते तुमचा मान

९६) चांगली पुस्तके आहेत माणसाचे मित्र

—–रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र

९७) विद्येच माहेर घर म्हणतात पुण

—-रावांच्या संसारात मला नाही उण

९८) गुलाबाच्या फुलाचा लाजवाब सुगंध

—-रवाना केले मी हृदयात बंद

९९)इंग्लिश मध्ये गावातला म्हणतात ग्रास

—–रावांच नाव घ्यायला मला नाही त्रास

१००)श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक

—–रावांच्या नावाने बेल वाहिले एकशे एक