IRON RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्न पदार्थ, बाळाची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी प्रत्येक आई बाळाला घरगुती पौष्टिक अन्न कसे मिळेल याकडे लक्ष देत असते. आपण जे अन्नपदार्थ देतो त्यात सर्व पोषणमूल्य असणे आवश्यक असते. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम त्याचबरोबर लोह या सर्व खनिजांची गरज असते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून हे सर्व घटक थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीराला मिळत असतात.
एखादी स्त्री गरोदर असते तेव्हापासूनच आईच्या आणि बाळाच्या शरीराचे योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी आईला आयर्न सप्लीमेंट दिल्या जातात. या आयर्न सप्लीमेंट च्या माध्यमातून आईच्या शरीरात लोह पुरवले जाते. त्यामुळे बाळाची योग्य वाढवते आणि बाळाच्या शरीराचा विकास होतो. जन्म झाल्यानंतर साधारण पहिले चार सहा महिने बाळाला लोहाची गरज भासत नाही. सहा महिन्यापर्यंत बाळ पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असते. त्यामुळे शारीरिक विकासासाठी लागणारे सर्व घटक बाळाला आईच्या दुधातून मिळतात. परंतु सहा महिन्यानंतर बाळाला द्रव स्वरूपातील इतर अन्नपदार्थ दिले जातात. त्या माध्यमातून बाळाला लोह मिळेल याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
जर एखाद्या बाळाचा जन्म अकाली झाला असेल किंवा गरोदरपणा बाळाला योग्य ते पोषण आहार मिळाला नसेल तर त्या बाळाला लोहाची कमतरता भासू शकते. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया सारखे आजार होण्याची शक्यता असते. जर शरीरात लोहाची कमतरता असेल तर बाळाला किंवा लहान मुलांना खूप थकवा येतो, त्यांच्या वयानुसार त्यांची योग्य ती वाढ होत नाही, ते वारंवार आजारी पडतात , लोहाच्या कमतरतेमुळे बाळाची त्वचा निस्तेज आणि मलूल दिसते, बाळाची भूक मंदावते बाळ काहीही खात नाही. अशा वेळेस लोहाची कमतरता असण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते.
IRON RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्न पदार्थ, आजच्या या लेखात आपण असे कोणकोणते अन्नपदार्थ आहेत ज्यातून आपल्याला मुबलक प्रमाणात लोह मिळू शकते याची माहिती घेणार आहोत. शरीरासाठी लोहाची का गरज आहे हे बघणार आहोत, फक्त लहान मुलांसाठीच नव्हे तर मोठ्या माणसांसाठी देखील लोहयुक्त अन्नपदार्थ कसे उपयुक्त आहेत हे आपण बघणार आहोत. लोहाच्या कमतरतेमुळे कोणकोणते शारीरिक मानसिक आजार संभवता हे बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला किती लोहाची गरज असते याची माहिती घेणार आहोत.
IRON RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्न पदार्थ
शरीरासाठी लोह का गरजेचे आहे?
आपल्या शरीरात लोह स्वतःहून तयार होऊ शकत नाही त्यामुळे आपण जे अन्नपदार्थ खातो त्याद्वारे जे लोह आपल्या शरीरात जाते ते लोह शरीरात साठवून ठेवले जाते आणि नंतर त्याचा उपयोग केला जातो. म्हणूनच शरीराची लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ खाणे गरजेचे आहे. आपल्या रक्तातील लाल पेशींमध्ये लोह हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जर शरीरात लोहाची कमतरता भासली की आपण हिमोग्लोबिन कमी झाले असे म्हणतो. याच हिमोग्लोबिनच्या साहाय्याने शरीरात कार्बन डाय-ऑक्साइड आणि ऑक्सिजन यांची देवाण-घेवाण होते. हिमोग्लोबिन मार्फत संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवला जातो. फुफ्फुसांमध्ये तयार झालेला शुद्ध ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक स्नायूंना आणि पेशींना पोहोचविण्याचे कार्य हिमोग्लोबिन करते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची योग्य ती पातळी राखणे गरजेचे आहे. त्यासाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ सेवन करण्याची सवय लहानपणापासूनच लावून घेणे गरजेचे आहे.
मुलांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे कसे ओळखाल?
साधारणपणे लहान मुलांच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर खालील लक्षणे दिसतात. ती लक्षणे ओळखून आपण त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाळासाठी योग्य तो आहार निवडू शकतो.
लवकर थकवा येणे
सतत डोके दुखणे
चक्कर येणे
सतत चिडचिड करणे
ॲनिमियाचा त्रास होणे
शरीरात ऊर्जा कमी जाणवणे
रोगप्रतिकार शक्ती कमी होणे
वयानुसार योग्य वाढ न होणे
भूक न लागणे
सतत आजारी पडणे
असामान्य श्वासोच्छवास
त्वचा निस्तेज आणि मलूल दिसणे
हे हि वाचा
६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/
२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/
मुलांच्या दैनंदिन आहारात लोहाचे प्रमाण किती असावे?
जन्मजात बाळ ते एक वर्ष : 0.27 mg to 11 mg
एक वर्ष ते तीन वर्षे: 7 mg
चार वर्षे ते आठ वर्ष: 10 mg
नऊ वर्षे ते 13 वर्षे: 8 mg
14 वर्षे ते 18 वर्षे मुले:11 mg
14 वर्षे ते 18 वर्ष मुली:15 mg
वर सांगितलेले प्रमाण हे अंदाजे सांगितलेले प्रमाण आहे. हे प्रमाण प्रत्येक बाळा नुसार प्रत्येक मुला नुसार वेगवेगळे असते. आपण जर आपल्या बाळाच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपाय करत असाल डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ:
1) मांसाहार /चिकन:
मांसाहार किंवा चिकन मध्ये मुबलक प्रमाणात लोह उपलब्ध असतात. साधारणपणे लाल मांस आणि यकृताचा भाग यामध्ये लोह आढळून येते. त्यामुळे लहान मुलांना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस व्यवस्थित शिजलेले चिकन किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खायला द्या.
2) अंडे:
अंड्याचा पिवळा बलक मध्ये लोह आढळून येते. साधारणपणे बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर बाळाच्या आहारात अंडे किंवा अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. उकडलेले अंडे खाणे सोपे असते. त्याचबरोबर अंड्याचे विविध प्रकार बनवून मुलांना दिल्यास मुले अंडे आवडीने खातात. दररोज एक अंडे खाल्ल्यास शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा केला जातो.
3) बीन्स:
बीन्स मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळून येते. बीन्स मध्ये मसूर, राजमा, चणे, सोयाबीन यांचा समावेश होतो. मसूर, राजमा, चणे, सोयाबीन रात्रभर भिजत ठेवून सकाळी शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यात मीठ आणि थोडेफार मसाले घालून लहान मुलांना खायला देऊ शकता. बिन्स तुम्ही भाता सोबत देखील देऊ शकता .
4) बटाटे:
बटाटे शक्यतो स्वच्छ धुऊन साल न काढता वापरावे. बटाट्यामध्ये लोह टिकवून ठेवण्यासाठी सालीसकट बटाट्याचा वापर करा. उकडलेले किंवा वाफवलेले बटाटे थोडेसे मीठ घालून मुलांना दिल्यास मुले आवडीने खातात. बटाट्याचे कटलेट्स किंवा इतर पाककृती करून मुलांना दिल्यास मुलांना आवडते.
5) रताळे:
बटाटे सोबतच रताळ्या मध्ये देखील लोह मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. रताळ्या मध्ये लोहा बरोबरच फायबर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. भाजलेले किंवा उकडलेले रताळे मुले आवडीने खातात. त्याचबरोबर रताळ्याचा शिरा करणे, किंवा रताळ्याचे चिप्स करून देखील तुम्ही मुलांना देऊ शकता.
6) मासे:
मासे हे लोहाचा समृद्ध स्त्रोत आहे. त्यामुळे आहारात माशांचा समावेश केल्यास लोहाची कमतरता भासत नाही. मासे स्वच्छ धुऊन योग्य पद्धतीने शिजवून मुलांना नियमित द्यावे.
7) काळे मनुके:
काळे मनुके हे लोह या खनिज तत्त्वाने संपन्न आहेत. त्यामुळे दररोज काळे मनुके खाणे फायद्याचे ठरते . रोज रात्री 10 ते 12 काळे मनुके पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिऊन ते मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच शरीराला भरपूर प्रमाणात लोह पुरविले जाते. काळे मनुके चवीला गोड असल्यामुळे मुलांना खाणे आवडते.
8) बिया:
बिया हे नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, परंतु सूर्यफूल, भोपळा, तीळ या बियांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. आणि या बिया खाणे मुलांना आवडते. त्यामुळे दोन जेवणांच्या मधल्या काळात खाण्यासाठी मुलांना या बिया तुम्ही खाण्यास देऊ शकता. मुले या बिया खात नसतील तर जेवणानंतर आपण जी बडीशोप खातो त्यामध्ये या बिया तुम्ही टाकू शकता.
हेही नक्की वाचा
वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/
शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/
वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/
वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/
झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/
9) खजूर:
खजूर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. दररोज खजूर खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. खजूर हा चवीला गोड असल्याने मुलांना देखील खजूर खाणे आवडते. त्यामुळे दररोज सुकामेवा, खजूर खाण्याची सवय मुलांना लावा.
10) गुळ:
गुळामध्ये खूप मुबलक प्रमाणात लोह उपलब्ध असते. त्यामुळे दररोज गुळ शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते. मुले गुळ शेंगदाणे खात नसतील तर तुम्ही गुळ शेंगदाण्याचा लाडू करून त्यांना देऊ शकता. दररोज गूळ खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमतरता भरून निघते. झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडासा गूळ खाणे जेवण पचनास फायदेशीर ठरते.
11) हिरव्या पालेभाज्या:
हिरव्या पालेभाज्या यामध्ये पालक, ब्रोकोली, बीट रूट यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह आढळून येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात एका तरी हिरव्या पालेभाजीचा समावेश करावा.
12) टोमॅटो/ बीटरूट:
टोमॅटो आणि बीटरूट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह असते. त्यामुळे दररोजच्या आहारात सॅलड मध्ये टोमॅटो आणि बीटरूट चा समावेश असावा. मुलांना टोमॅटो सूप देखील करून देऊ शकतात. मुलांना आवडत असल्यास बीटरूट चा ज्यूस देखील तुम्ही मुलांना करून देऊ शकता. टोमॅटो आणि बीटरूट खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
निष्कर्ष:
IRON RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्न पदार्थ या लेखात आपण लोहाच्या कमतरतेमुळे कोणकोणत्या समस्या उद्भवतात हे बघितले. दैनंदिन आहारात किती प्रमाणात लोहा चा समावेश असावा याबद्दल आपण माहिती घेतली. मुलांसाठी समृद्ध अन्नपदार्थ कोणकोणते आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली.
परंतु मुलांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्यांचे मार्गदर्शन घेऊनच मुलांच्या आहारात बदल करा.
लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. असेच महत्त्वपूर्ण लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लेख जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.