YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI | वजन कमी करण्यासाठी योग अभ्यास

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI | वजन कमी करण्यासाठी योग अभ्यास, योग अभ्यास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळी आसने येतात. परंतु प्रत्येक आसन करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ती पद्धत समजून घेतल्यास आसन करणे सोपे जाते.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, योग करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्याबरोबरच बाहेरील तेलकट पदार्थ खाणे, जंक फूड खाणे, फास्ट फूड खाणे या सगळ्यामुळे वजन वाढते. कितीही ठरवले तरी वाढलेले वजन कमी करणे शक्य होत नाही. अशावेळी व्यायाम करणे, योग करणे महत्त्वाचे ठरते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या पद्धतीत बदल करणे जितके आवश्यक असते तितकेच दररोज नियमित व्यायाम करणे, योग करणे, सायकलिंग करणे हेदेखील महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी खूप पैसे खर्च करून जिमला जाणे प्रत्येकाला परवडते असे नाही. त्यामुळे दररोज नियमितपणे घरी योग अभ्यास केला, किंवा व्यायाम करून देखील आपण आपले वजन कमी करू शकतो आणि वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.

व्यायाम किंवा योग अभ्यास केल्यामुळे वाढलेले वजन कमी होते परंतु ही प्रक्रिया घडण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु आपण नियमितता आणि संयम ठेवल्यास योग अभ्यासामुळे वाढलेले वजन कमी करू शकतो.

जेव्हा आपण वजन कमी करायचा असं ठरवतो त्यावेळी व्यायाम, योग, जिमला जाणे या गोष्टी करणे जितके महत्त्वाचे असते. तितकेच आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे. पौष्टिक आणि सर्व जीवनसत्त्वांनी संपन्न असा आहार घेणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे आपण किती प्रमाणात आहार घेतो हे देखील महत्त्वाचे असते. एका ठराविक प्रमाणात आहार घेणे गरजेचे असते.

वजन कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात व्यायाम करणे किंवा योग करणे फायद्याचे ठरत नाहीत. खूप जास्त प्रमाणात योग केल्यास किंवा व्यायाम केल्यास शरीराला अशक्तपणा येऊ शकतो, शरीराला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमितपणे थोड्या थोड्या प्रमाणात रोज व्यायाम केल्यास वजन कमी होऊ शकते.

वजन कमी करत असताना ज्या ज्या पदार्थांपासून वजन वाढते जेवण कमी करणे किंवा न करणे फायद्याचे ठरते. वजन वाढवणारे पदार्थ जसे की जंक फूड, फास्ट फूड, तेलकट मसालेदार पदार्थ, जास्त साखर असलेले गोड पदार्थ, फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रिंक्स, बेकरी पदार्थ, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, चायनीज पदार्थ इत्यादी. खरे तर हे पदार्थ वजन वाढत नाही तर शरीराला हानी देखील पोहोचवितात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन कमीत कमी प्रमाणात करणे किंवा न करणे योग्य ठरते. वजन कमी करताना जिभेवर ताबा असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आजच्या YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI या लेखात आपण वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध आसनांची माहिती घेणार आहोत. आसने करण्याची योग्य पद्धत काय हे समजून घेणार आहोत. कोणती आसने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत हे बघणार आहोत.

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI

योग अभ्यासाद्वारे वजन कसे कमी कराल?

1) योगासने नियमित करावी.

2) दररोज ठरवून घेतलेल्या वेळेतच योगासने करावे.

3) योगासने करण्याची योग्य पद्धत समजावून घ्या आणि त्याप्रमाणे दररोज योगासने करा.

4) योगासना बरोबर इतर व्यायाम जसे की सायकलिंग करणे, दोरी उड्या मारणे, जॉगिंग करणे, रनिंग करणे हे केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

5) वजन कमी- जास्त होण्यास 80% आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि 20% व्यायाम या गोष्टींवर अवलंबून असते.

6) दररोज योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घ्या.

7) दररोज योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करा.

8) दररोज किमान आठ तास तरी झोप घ्या.

9) वजन कमी करण्याबरोबरच ताण तणाव कमी करण्यासाठी दररोज ध्यान धारणा करा.

वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण योगासने:

सूर्यनमस्कार

भुजंगासन

वीरभद्रासन

धनुरासन

त्रिकोणासन

कपालभारती

हेही नक्की वाचा

वजन कमी कसे करायचे याबद्दल तर आपण माहिती घेतली परंतु वेगवेगळ्या आहार प्रकारांबद्दल/ डाएट बद्दल जसे की वेगन डाएट म्हणजे नक्की काय ? वेगन डाएट मध्ये नक्की कसा आहार घेतला जातो, हा हा शरीरासाठी कसा फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे प्रथिने युक्त आहार कोणता, कॅल्शियम समृद्ध पदार्थ कोणते, तसेच लोहयुक्त पदार्थ कोणते त्याबद्दल सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये दिलेली आहे. हे लेख नक्की वाचा.

आजच्या लेखात आपण वजन कमी करण्यासाठी योग प्रकार बघितले. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी काही खास टिप्स एका लेखात दिलेले आहे. तो लेख नक्की वाचा. वजन कमी करण्यासाठी शरीराला सर्व जीवनसत्वे योग्य प्रमाणात मिळणे आणि योग्य त्या पदार्थातून मिळणे गरजेचे आहे . रोजच्या आहारात आपण जे पदार्थ खातो त्यातून आपल्याला कोण कोणते जीवनसत्व मिळतात त्याचप्रमाणे एखाद्या विशेष जीवनसत्व शरीरासाठी किती गरजेचे असतात याबद्दल सविस्तर माहिती इतर लेखांमध्ये दिलेली आहे ती नक्की वाचा.

वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/

शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/

वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/

वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/

1) सूर्यनमस्कार:

सूर्यनमस्काराला सर्वांगासन असे देखील संबोधले जाते. सूर्यनमस्कार केल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. दररोज सूर्यनमस्कार केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. सूर्यनमस्कार शक्यतो सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी करावा. दररोज किमान सूर्यनमस्काराच्या 12 फेऱ्या तरी करा. सूर्यनमस्कार करताना तुम्हाला लक्षात राहिल्यास सूर्याच्या 12 नावांचा उच्चार करा. ही सूर्याची बारा नावे खालील प्रमाणे:

1)ओम मित्राय नमः

2) ओम रवय नमः

3)ओम सूर्याय नमः

4)ओम भानवे नमहा

5)ओम खगाय

6)ओम पुष्पे नमः

7)ओम हिरण्य गर्भाय नमहा

8)ओम मरीचये नमहा

9)ओम आदित्यय नमः

10)ओम सवित्रे नमः

11)ओम अर्काय नमः

12)ओम भास्कराय नमः

खाली सूर्यनमस्कार कसे करावे याबद्दल सांगितले आहे. सूर्यनमस्कारात एकूण 12 स्टेप्स आहेत. त्यातील प्रत्येक स्टेप खालील चित्रात दाखवले आहे. प्रत्येक स्टेप करताना सूर्याच्या एका नावाचा उच्चार करणे योग्य ठरते. सूर्याचे देखील 12 नावे सांगितले आहे. त्यामुळे एका स्टेपला एक नाव असे उच्चारावे. नावे लक्षात राहत नसतील तर नाव न घेता देखील सूर्यनमस्कार करू शकतात. श्वासोच्छवासाचा योग्य तो समन्वय साधून सूर्यनमस्कार करावे.

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI SURYANMASKAR

2) भुजंगासन:

भुजंगासन पोटाच्या भागावर झोपून करावे लागते. भुजंगासन मुळे छाती आणि पाठीच्या मणक्याचा योग्य तो व्यायाम होतो. भुजंगासन करताना खोलवर श्वास घेतल्यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात शुद्ध हवा घेतली जाते त्यामुळे शरीराला फायदा होतो. पुरेशा प्रमाणात शुद्ध हवा शरीरात गेल्यामुळे हृदयाचे काम योग्य पद्धतीने चालते. भुजंगासन मुळे पोटावरील आणि नितंबा वरील चरबी कमी होण्यास मदत होते.

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI BHUJANGASAN

3) वीरभद्रासन:

वीरभद्रासन उभे राहून करण्याचे आसन आहे. वीरभद्रासन या आसनात मांड्या, पायाच्या पोटऱ्या, गुडघे, घोटा यांच्यावर तणाव निर्माण होतो आणि ते बळकट होण्यास मदत होते. वीरभद्रासन करताना संपूर्ण शरीराचा भार मांड्यांवर येतो त्यामुळे मांड्यांवर ताण निर्माण होतो. मांड्यांच्या भागात असणारी जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते.

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI VIRBHADRASAN

4) धनुरासन:

धनुरासन करताना शरीराचा आकार हा धनुष्यबाण सारखा होतो म्हणून या आसनाला धनुरासन असे म्हणतात. या आसनामुळे पोटावरील, मांड्या वरील, नितंबा वरील जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते. नियमित धनुरासन केल्यास शरीर कमानदार होते. धनुरासन करताना ओटीपोटावर ताण निर्माण होतो आणि त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI DHANURASAN

5) त्रिकोणासन:

त्रिकोणासन करताना शरीराचा आकार हा त्रिकोणा सारखा होतो म्हणून या आसनाला त्रिकोणासन असे म्हणतात. त्रिकोणासन केल्यामुळे पोटावर, कमरेवर आणि मांड्यांवर जमा झालेली चरबी वितळून जाण्यास मदत होते. नियमित त्रिकोणासन केल्यास शरीराला योग्य आकार मिळतो. त्रिकोणासन मुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI TRIKONASAN

6) कपाल भारती:

कपालभारती करताना शरीरातील हवा नाकाद्वारे बाहेर टाकली जाते. हवा बाहेर टाकताना पोट आत मध्ये खेचले जाते ही क्रिया वारंवार केल्यास त्याला कपालभारती असे म्हणतात. दररोज कपालभारती केल्यामुळे पोटावरील जास्तीची चरबी वितळून जाण्यास मदत होते.

YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI KAPALBHARATI

निष्कर्ष:

आजच्या YOGA FOR WEIGHT LOSS IN MARATHI या लेखात आपण कोणकोणते आसनांमुळे वजन कमी करण्यास मदत होते हे बघितले. योग अभ्यास करण्याआधी योगासनांची योग्य ती माहिती घ्या. योगासने कशी करावीत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन घ्या. आणि त्यानंतरच योग अभ्यास चालू करा.

लेखात सांगितलेले योग प्रकार सर्वसामान्य ज्ञानातून सांगण्यात आलेले आहे. योग करताना शरीराला झेपेल इतकाच व्यायाम करावा. अति प्रमाणात व्यायाम करणे फायद्याचे ठरत नाही. व्यायाम करण्यासाठी व्यायाम कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती घ्या. व्यायाम करण्याची पद्धत समजून घ्या. श्वासाशी योग्य ताळमेळ साधून व्यायाम करा.

दररोज फक्त सूर्यनमस्कार केले तरी तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळेच सूर्यनमस्कार या योगाला सर्वांगासन असे म्हणतात. सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत समजून घ्या आणि त्यानंतरच सूर्यनमस्कार करा. सूर्योदयाच्या आधी आणि रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करण्याची योग्य वेळ आहे.

लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी खूप प्रमाणात व्यायाम करणे योग्य नाही. दररोज फक्त अर्धा ते एक तास व्यायाम करा. जास्त व्यायाम केल्यामुळे शरीराला थकवा जाणवेल अशक्तपणा येईल त्यामुळे नियमितपणे दररोज व्यायाम केल्यास नक्कीच वजन कमी होते.

वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात आहार आणि योग्य प्रमाणात व्यायाम यांची सांगड घालणे महत्त्वाचे ठरते.