PRADHAN MANTRI JAN AUSHADHI PARIYOJANA 2024 | प्रधानमंत्री जन औषधी परियोजना २०२४

PRADHAN MANTRI JAN AUSHADHI PARIYOJANA 2024 | प्रधानमंत्री जन औषधी परियोजना २०२४ , केंद्र सरकारच्या औषध विभागामार्फत चांगल्या प्रतीचे औषध जनतेला स्वस्त दरात मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी परियोजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब जनतेला चांगल्या प्रतीचे औषध स्वस्त दरात मिळवून देणार आहे.

सध्या उपलब्ध असलेले ब्रँडेड औषधे खूप जास्त किमतीला विकली जातात. त्यामुळे प्रत्येकाला ती औषधे घेता येतातच असे नाही. परंतु प्रधानमंत्री जन औषधी केंद्रात मिळणारे जनरिक औषधे ही अगदी माफक दरात उपलब्ध होतील. जनरिक औषधांची गुणवत्ता आणि दर्जा हा ब्रँडेड औषधा इतकाच असेल. PRADHAN MANTRI JAN AUSHADHI PARIYOJANA 2024 अंतर्गत प्रधानमंत्री जन औषधी केंद्राची उभारणी चांगल्या प्रतीचे आणि कमी किमतीचे जनरिक औषधे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांची स्थापना Department of pharmaceuticals in association with central pharma public sector त्यांच्या अंतर्गत करण्यात येणार आहे.Bureau of pharma PSUs of India (BPPI) त्यांच्या अंतर्गत जन औषधींचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

आपल्या भारत देशात जास्तीत जास्त लोकसंख्या ही सर्वसामान्य आणि गरीब या गटातील असून ब्रँडेड औषधांसाठी खर्च करण्या इतपत पैसा प्रत्येकाकडेच उपलब्ध असतो असे नाही. देशातील गरीब जनतेची संख्या लक्षात घेऊन प्रधानमंत्री जन औषधी परियोजना २०२४ अंतर्गत प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांची उभारणी करण्याचे योजना आखण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील प्रत्येक गरिबाला ब्रँडेड औषधा इतकेच परिणाम कारक असणारे जनरिक औषध स्वस्त दरात मिळणार आहे.

आजच्या या लेखात आपण जन औषधी परियोजनेची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याच्याबद्दल या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच जन औषधी केंद्र विषयी माहिती बघणार आहोत, जन औषधी केंद्र कोण उघडू शकतो? जन औषधी केंद्र उघडण्यासाठी काय काय पात्रता व अटी आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जन औषधी दुकान उघडण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहे याची माहिती करून घेणार आहोत. त्याचबरोबर जन औषधी केंद्रांच्या मालकांसाठी सरकारमार्फत कोणकोणते अनुदान दिले जाते याबद्दल माहिती बघणार आहोत. त्यामुळे लेख नक्की वाचा.

या योजनेचा फायदा जास्तीत जास्त पात्र लोकां मिळवून देण्यासाठी लेख जास्तीत जास्त शेअर करा.

PRADHAN MANTRI JAN AUSHADHI PARIYOJANA 2024 | प्रधानमंत्री जन औषधी परियोजना २०२४

PRADHAN MANTRI JAN AUSHADHI PARIYOJANA

प्रधानमंत्री जन औषधी परीयोजनेचे मुख्य उद्दिष्ट:

1) ठरवून दिलेल्या दुकानांमध्ये चांगल्या दर्जाची औषधे कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देणे.

2) गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी प्रत्येक व्यक्तीमागे उपचारातील युनिट कोस्ट कमी करणे.

3) खूप महाग औषधेच चांगल्या प्रतीची असतात आणि जास्त गुणवत्ता देतात हा जनतेतील गैरसमज दूर करणे.

4) जनरिक औषधांबाबत लोकांमध्ये शिक्षण आणि जाहिरातींच्या माध्यमातून जागृतता आणणे.

5) डॉक्टरांना जनरिक औषधे लिहून देण्यास प्रोत्साहन देणे.

6) कमी किमतीच्या जनरिक औषधांना मागणी मिळवून देणे.

जन औषधी केंद्रा विषयी:

1) जन औषधींचे दुकाने देशभर उघडली गेली आहेत.

2) जन औषधीं दुकानाची कामकाजाची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी असेल.

3) सगळ्या प्रकारच्या आजारांवरील औषधी जन औषधी दुकानांमध्ये उपलब्ध असेल.

4)over the counter म्हणजेच डॉक्टरांच्या परवानगीशिवाय लागणारी औषधे जन औषधी दुकानांमध्ये उपलब्ध असतील.

5) काही विशिष्ट औषधांसाठी डॉक्टरांची परवानगी असणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे जन औषधी दुकानांमध्ये उपलब्ध असते.

6) जेनेरिक औषधांचे गुणवत्ता, सुरक्षितता आणि औषधांचा प्रभावीपणा तपासण्यासाठी प्रयोगशाळेत चाचणी केली जाते.

हे हि वाचा

माझी लाडकी बहिण योजना २०२४https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/

पिंक इ रिक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/pink-e-rikshaw-yojana-2024/

जन औषधी केंद्र कोण उघडू शकतो?

1) कोणतीही NGO/ राज्य सरकार द्वारे मान्य संस्था/ सहकारी सोसायटी आणि राज्य शासनाच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात जन औषधी केंद्र उघडू शकतात

2) कोणतीहीNGO/ ट्रस्ट/ संस्था/ आरोग्य गट ज्यांना कल्याणकारी योजनांमध्ये काम केल्याचा तीन वर्षांचा अनुभव असेल असे सगळे जन औषधी केंद्र होऊ शकतात. त्यांच्याकडे जागा आणि आर्थिक क्षमता असणे गरजेचे आहे.

3) फार्मासिस्ट/ वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती ज्याच्याकडे जागा उपलब्ध आहे आणि आर्थिक क्षमता ही आहे अशी व्यक्ती जन औषधी केंद्र उघडू शकते.

4) डॉक्टर आणि नोंदणी कृत वैद्यकीय व्यावसायिका व्यतिरिक्त जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना B.PHARM किंवा D.PHARM ची पदवी असणे बंधनकारक आहे.

5) एखादी संस्था जन औषधी च्या दुकानात करिता अर्ज करत असेल तर त्या संस्थेला B.PHARM/D.PHARM पदवी असणाऱ्या लोकांना संस्थेत घ्यावे लागेल आणि त्यासंबंधीचे लिखित पुरावे अर्ज सादर करताना द्यावे लागते.

6) जन औषधी केंद्र उभारण्यासाठी नामांकित स्वयंसेवी संस्था किंवा धर्मदाय संस्था पात्र असतील.

7) वैयक्तिक दुकानदार देखील जन औषधी केंद्र उघडू शकतो.

जन औषधी दुकाने उघडण्या करिता आवश्यक असणारे घटक:

1)विहित नमुन्या नुसार योग्य प्रकारे भरलेला अर्जासोबत ₹2000/- चा डिमांड ड्राफ्ट लावणे आवश्यक आहे.

2) स्वतःची जागा किंवा भाड्याने घेतलेली जागा योग्य प्रकारे करार करून घेतलेली असावी.

3)BPPI नुसार दुकानासाठी 120 स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे.

4) सक्षम प्राधिकरणा कडून मिळालेला विक्री परवाना त्यात( अर्जदारा चे नाव/ टीन क्रमांक/ रिटेल औषध परवाना)

5) फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या पुरावा( फार्मसिस्ट चे नाव,State Council नोंदणी केलेले नोंदणी प्रमाणपत्र) असणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

6) दुकान चालविण्यासाठी आर्थिक क्षमता आहे हे सिद्ध करण्यासाठी मागील तीन वर्षापासून चे ऑडिट खात्याची माहिती.( बँकेचे मागच्या तीन वर्षापासूनची बँक स्टेटमेंट)

PRADHAN MANTRI JAN AUSHADHI PARIYOJANA

जन औषधीच्या मालकांसाठी असलेले अनुदान:

राज्य शासनाने नामांकन दिलेल्या एजन्सी कडून चालविले जाणारे जन औषधी दुकाना चे मालक:

– प्रत्येक उत्पादनाच्या MRP वर 20% मार्जिन नुसार नफा ठेवता येईल.

– 2.5 लाखापर्यंत BPPI एकदा आर्थिक मदत करू शकेल.

1) फर्निचर आणि FIXTURES वर एक लाखापर्यंतची परतफेड

2) कम्प्युटर्स, इंटरनेट, प्रिंटर, स्कॅनर साठी 50 लाखांपर्यंतची परतफेड.

– सुरुवातीला 1 लाख रुपयांपर्यंतची औषधे फ्री.

जन औषधी चे दुकाने चालवणाऱ्या इतर एजन्सी:

– प्रत्येक उत्पादनाच्या MRP वर 20% मार्जिन नुसार नफा ठेवता येईल.

– स्वतंत्र व्यवसाय/ फार्मासिस्ट/NGO/ ट्रस्ट/ संस्था जेBPPI चा मुख्य ऑफिस सोबत इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेले आहे त्यांना दीड लाखाचे अनुदान मिळेल.

– रुपये दीड लाख एकूण मर्यादेपर्यंत दर महिन्याला 10,000 प्रमाणे 10% च्या मासिक विक्रीवर देण्यात येते.

– नक्षल प्रभावित आदिवासी भाग आणि पूर्वोत्तर राज्य यांना प्रोत्साहन पर 1.5 लाख मर्यादेवर 15% रुपये 15000 मासिक विक्रीवर देण्यात येईल.

निष्कर्ष:

आजच्या या लेखात आपण जन औषधी पर योजनेची सविस्तर माहिती बघितली. या योजने अंतर्गत सुरू केलेल्या जन औषधी केंद्रांमधून चांगल्या दर्जाचे औषधे कमीत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर महाग औषधे चांगल्या प्रतीची असतात आणि जास्त गुणवत्ता देणारे असतात हा लोकांमधला दूर होणार आहे. देशातील गरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य मिळावे. यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर आजारांसाठीची औषधे देखील कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त पात्र लोकांना होण्यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा .लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा, धन्यवाद.

FAQ:

1) प्रधानमंत्री जन औषधी परी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

ans: देशातील गरीब जनतेला चांगल्या प्रतीचे औषध स्वस्त दरात मिळवून देणे हा प्रधानमंत्री जन औषधी परी योजनेचा मुख्य उद्देश आहे.

2) जन औषधी दुकानाची वेळ काय असते?

ans: जन औषधी दुकानाची वेळ सकाळी आठ ते रात्री 8 अशी असतात.

3) जन औषधी केंद्र कोण उघडू शकतो?

ans:कोणतीही NGO/ राज्य सरकार द्वारे मान्य संस्था/ सहकारी सोसायटी आणि राज्य शासनाच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात जन औषधी केंद्र उघडू शकतात. तसेच कोणतीहीNGO/ ट्रस्ट/ संस्था/ आरोग्य गट ज्यांना कल्याणकारी योजनांमध्ये काम केल्याचा तीन वर्षांचा अनुभव असेल असे सगळे जन औषधी केंद्र होऊ शकतात. त्यांच्याकडे जागा आणि आर्थिक क्षमता असणे गरजेचे आहे.

4) जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अर्जदाराला कोणती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे?

ans: जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अर्जदारांना B.PHARM किंवा D.PHARM ची पदवी असणे बंधनकारक आहे.

5) वैयक्तिक दुकानदार जन औषधी केंद्र उघडू शकतो का?

ans: होय,वैयक्तिक दुकानदार जन औषधी केंद्र उघडू शकतो .

6) जन औषधी केंद्र उघडण्यासाठी किती जागा असणे आवश्यक आहे?

ans: जन औषधी केंद्र उघडण्यासाठी 120 स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/