MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI | मुख्यमंत्री योजना दूत २०२४

MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI | मुख्यमंत्री योजना दूत २०२४ , मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचे प्रसिद्धी करणे, योजनांचा प्रसार करणे, योजनांचा प्रचार करणे आणि आपल्या विभागातील नागरिका पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती पोहोचवून जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा फायदा करून देणे. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मुख्यमंत्री योजना दूत २०२४ कार्यक्रमांतर्गत 50,000 योजना दूत नेमण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी नेमण्यात येणारे योजनादुतांचे मानधन हे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत देण्यात येणार आहे.

2024 -25 या आर्थिक वर्षासाठी योजना दूतांची नेमणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करणे, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे, महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा नागरिकांना लाभ घेण्यासाठी मदत करणे हे योजना दूताचे मुख्य काम आहे. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक योजनेला समाजातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI |

MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI

मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची रूपरेषा:

१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

२) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायती साठी एक योजना दूत नेमण्यात येणार आहे.

३) शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत नेमण्यात येणार आहे.

४) ग्रामीण आणि शहरी भाग मिळून एकूण 50,000 योजना दूत निवडण्यात येणार आहे.

५) मुख्यमंत्री योजना दूतास प्रवास खर्च आणि सर्व भत्ते समावेश करून महिन्याला 10000 इतके मासिक वेतन देण्यात येणार आहे.

६) मुख्यमंत्री योजना दूता सोबत महाराष्ट्र शासन सहा महिन्यांचा करार करणार आहे.

७) हा सहा महिन्यांचा करार वाढविला जाणार नाही.

हे हि वाचा

माझी लाडकी बहिण योजना २०२४https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/

पिंक इ रिक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/pink-e-rikshaw-yojana-2024/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 https://marathisampada.com/punyashlok-ahilyadevi-holkar-mahila-startup-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रता:

१) मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

२)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 ते 35 या वयोगटातील असावे.

३)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने कोणत्याही शाखेची किमान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

४)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

५)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे.

६)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे आधार कार्ड असावे व त्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI

मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

पदवीधर प्रमाणपत्र

रहिवासी दाखला

बँक खात्याचा तपशील

पासपोर्ट साईज फोटो

हमीपत्र

मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

१) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मुख्यमंत्री योजना दुत साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

२) अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती व्यवस्थित करावी.

३) अर्जात सांगितलेले सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावेत.

४) अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची आणि सर्व कागदपत्रांची योग्यती पडताळणी करण्यात येईल.

५) अर्ज केलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व वया संबंधित मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील.

६) तुम्ही या कार्यक्रमासाठी पात्र असाल तर निवडलेल्या उमेदवारास सोबत सहा महिन्याचा करार केला जाईल.

७) निवड केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती आणि त्या संदर्भात समुपदेशन पण निर्देशन करण्यात येईल.

८) ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात योजनादूत नेमण्यात येतील.

९) मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना जे काम सोपवण्यात येईल ते शासकीय सेवा समजण्यात येणार नाही.

१०) मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमात काम केले आहे ही सबब सांगून भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी करता येणार नाही त्याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येणार आहे.

MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI

मुख्यमंत्री योजनादूतांची कामे:

१) जिल्हा माहिती अधिकारी त्यांच्या संपर्कात राहून योजना दूत जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.

२) प्रशिक्षण दिलेल्या योजनादूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांचे काम करणे बंधनकारक राहील.

३) राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रसिद्धी करताना योजनादूतांनी ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधून योजनांची माहिती घरोघरी पोहोचवली जाईल यासाठी प्रयत्न करावा.

४) योजना दूतांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक आहे.

५) योजना दूत त्यांना सोपवलेल्या कामाचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य काम करण्यासाठी उपयोग करणार नाही.

६) योजना दूत कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत.

७) गैरवर्तन करताना आढळल्यास योजना दुतासोबतचा करार संपुष्टात आणण्यात येईल.

८) योजनादूत अनधिकृत रित्या कामावर गैरहजर राहिल्यास किंवा मध्येच काम सोडून गेल्यास त्याला मानधन देण्यात येणार नाही.

FAQ: MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI |

१) मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम कोणत्या राज्यासाठी आहे?

ans: मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासाठी आहे.

२) मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमांतर्गत उमेदवारासोबत किती दिवसाचा करार करण्यात येतो?

ans: मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमांतर्गत उमेदवारा सोबत सहा महिन्याचा करार करण्यात येतो.

३) मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमात सहभागी उमेदवाराला किती मानधन मिळेल ?

ans: मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमात सहभागी उमेदवाराला दर महिना 10,000 रुपये इतके मानधन मिळेल.

४) मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वयाची अट किती आहे?

ans: मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे या वयोगटातील असावे.

५) मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी?

ans: मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे.

६) मुख्यमंत्री योजना दुत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड, पदवीधर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला,बँक खात्याचा तपशील ,पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र इत्यादी.

7) मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमात योजना दूत ग्रामीण आणि शहरी भागासाठी असणार आहेत का?

ans:मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमात योजना दूत ग्रामीण आणि शहरी भागासाठी असणार आहेत.

8)मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे?

ans: महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे हा मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

9)मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम किती दिवसांचा असणार आहे?

ans:मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच सहा महिन्यांचा असणार आहे.

10)मुख्यमंत्री योजना दूत फक्त महाराष्ट्र राज्यासाठी काम करतील का?

ans: होय,मुख्यमंत्री योजना दूत फक्त महाराष्ट्र राज्य साठीच काम करतील.

11)मुख्यमंत्री योजना दूत गैरवर्तन करताना काय कारवाई होईल?

ans: मुख्यमंत्री योजना दूत गैरवर्तन करताना आढळल्यास दुतासोबतचा करार संपुष्टात करण्यात येईल.

12)योजना दूतांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक आहे का?

ans:योजना दूतांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक आहे.

13)मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम फक्त मुलांसाठीच आहे का?

ans: होय,मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम फक्त मुलांसाठीच आहे.

14)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे का?

ans:मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

15)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारा साठी शैक्षणिक अट काय आहे?

ans: मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने कोणत्याही शाखेची किमान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

16)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारा ला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे का?

ans: होय,मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारा ला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

17)मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारा चे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे का?

ans:मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारा चे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

निष्कर्ष:

आजच्या MUKHYAMANTRI YOJANA DOOT 2024 IN MARATHI या लेखात आपण मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासंबंधी सविस्तर माहिती बघितली. आपल्या आजूबाजूला असे काही मुले असतील ज्यांना कामाची गरज असेल. अशा उमेदवारां सोबत हा लेख जरूर शेअर करा जेणेकरून ते या कार्यक्रमाचा फायदा घेऊ शकतील .

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे महिलांसाठी, मुलींसाठी, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली आणि त्यांची अंमलबजावणी केली. त्याचप्रमाणे राज्यातील बेरोजगार मुलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध होईल . या कार्यक्रमात काम केल्यानंतर मुलांना एक महत्वाचा अनुभव प्राप्त होईल .ज्यातून भविष्यातील कामासाठी फायदाच होईल.

मुलींसाठीच्या, महिलांसाठीच्या , शेतकऱ्यांसाठीच्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/