VEGAN DIET INFORMATION IN MARATHI | वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?

VEGAN DIET INFORMATION IN MARATHI | वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?, आपल्याला शाकाहारी, मांसाहारी असे दोन आहाराचे प्रकार माहित आहे. शाकाहारी लोकं दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, धान्य, कडधान्य, ड्राय फ्रुट्स या पदार्थांचा त्यांच्या रोजच्या आहारात समावेश करतात. मांसाहारी लोक शाकाहारी लोक जो आहार घेतात त्याबरोबर अंडे, मांस, मासे यांचा रोजच्या आहारात समावेश करतात. शाकाहारी आणि मांसाहारी आहारा व्यतिरिक्त वेगन आहार हा थोडा वेगळा आहे. वेगन आहारामध्ये प्राण्यांपासून मिळणारे मांस आणि दूध व त्यापासून तयार करण्यात येणारे कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खात नाही.वेगन आहारात प्रामुख्याने फळ, भाज्या, कडधान्य, डाळी, धान्य, ड्रायफ्रूट्स यांचा समावेश असतो.वेगन आहारात अंडे, मांस, आणि दूध यांचा समावेश होत नाही.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपण जो रोजचा आहार घेतो तो पौष्टिक असणे फार महत्त्वाचे असते. आता सध्या खूप सारे लोक हे मांसाहार सोडून शाकाहारी होत आहेत. तर खूप सारे लोक हे वेगन आहार घेण्याला पसंती देत आहे.वेगन आहार आणि शाकाहार हे काही दृष्ट्या सारखेच वाटत असले तरी ते सारखे नाहीत शाकाहारात गाई ,म्हशीच्या, बकरीच्या दुधाचा आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश असतो. तसे वेगन आहारात नाही.वेगन आहारात दुधाला पर्याय म्हणून सोया मिल्क वापरले जाते, पनीरला पर्याय म्हणून सोयाबीन पासून बनवलेले तोफू वापरले जाते. लोण्याला पर्याय म्हणून शेंगदाण्या पासून तयार केलेले पीनट बटर वापरले जाते.

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वेगन आहार घेण्याकडे लोकांचा कल जात आहे. म्हणूनच 1 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये WORLD VEGAN DAY म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या या लेखात आपण वेगन डाएट म्हणजे काय? वेगन डाएट चे प्रकार काय? वेगन डाएट चे फायदे काय? वेगन डाएट घेताना कोणती काळजी घ्यावी. याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

VEGAN DIET INFORMATION IN MARATHI

VEGAN DIET IN MARATHI

वेगन डाएट म्हणजे काय?

1)वेगन डाएट असे डायट आहे ज्यामध्ये प्राण्यांपासून मिळणारे अंडी, मध,दूध आणि सर्व दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जात नाही.

2)वेगन डाएट मध्ये प्रामुख्याने फळे, भाज्या, डाळी, कडधान्य, धान्य, ड्राय फ्रुट्स यांचा आहारात समावेश केला जातो.

3)वेगन डाएट मध्ये दुधाला पर्याय म्हणून सोया मिल्क वापरले जाते.

4) वेगन डाएट मध्ये पनीरला पर्याय म्हणून सोयाबीन पासून बनवलेले तोफू वापरले जाते.

5)वेगन डाएट मध्ये लोण्याला पर्याय म्हणून शेंगदाण्या पासून तयार केलेले पीनट बटर वापरले जाते.

वेगन डाएटचे प्रकार:

वेगन डाएटचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत:

1) होल व्हीट वेगन डाएट:

2) रॉ फूड वेगन डाएट:

3)था्इव डायट:

4) स्टार्च सोल्युशन वेगन डाएट

1) होल व्हीट वेगन डाएट:

या डाएटमध्ये फळे, भाज्या, कडधान्य, धान्य, डाळी, पालेभाज्या, ड्राय फ्रुट्स/ सुकामेवा यांचा आहारात समावेश केला जातो.

2) रॉ फूड वेगन डाएट:

या डाएटमध्ये कच्ची फळं, कच्चा भाज्या, ड्रायफ्रूट्स/ सुकामेवा , बिया, नट्स यांचा आहारात समावेश केला जातो.

3)था्इव डायट:

डाएट मध्ये होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही डाएटचा समावेश असतो.

4) स्टार्च सोल्युशन वेगन डाएट:

या डाएटमध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असलेले आणि कर्बोदके म्हणजेच कार्ब्स जास्त प्रमाणात असलेले शाकाहारी पदार्थांचा आहाराचा समावेश केला जातो. यामध्ये बटाटा, रताळे, भात, मका यांचा आहारात समावेश केला जातो.

VEGAN DIET IN MARATHI

वेगन डाएट कसा केला जातो?

1)वेगन डाएट सुद्धा आपल्या इतर डाएट प्रमाणेच केला जातो.

2) जे काही पोषणमूल्य इतर डाएट मधून मिळतात तेच पोषणमूल्य वेगन डाएट मधून सुद्धा मिळतात.

3)वेगन डाएट वजन कमी करण्यासाठी मदत करतो.

4) वेगन डाएट फॉलो करताना कोणत्या वेळी काय खायचे हे आधीच ठरवलेले असते आणि त्या वेळापत्रकानुसारच आहार घ्यावा लागतो. असा आहार घेतल्यामुळे सगळे पोषणमूल्य शरीरात जातात आणि त्यामुळे शरीराला फायदा होतो. वेळापत्रकामुळे कोणत्याही पोषण मूल्यांचे प्रमाण खूप अधिक किंवा खूप कमी होत नाही. शरीराला गरजेचे असलेले सर्व पोषणमूल्य योग्य प्रमाणात मिळतात.

हे हि वाचा

वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/

शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/

वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/

वेगन डाएट चे फायदे:

1) वेगन डाएट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

2)वेगन डाएट मध्ये जास्त प्रमाणात फळे व भाज्या खाल्ल्या जातात त्यामुळे शरीराला फायबर जास्त प्रमाणात मिळते त्यामुळे पोट भरल्या सारखे जाणवते आणि आपसूकच कमी खाल्ले जाते आणि त्यामुळे वजन कमी करण्याला फायदा होतो.

3)वेगन डाएट केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात आणायला मदत होते. एका अभ्यासानुसार वेगन डाएट करणाऱ्या लोकांमध्ये नॉनवेगन डाएट करणाऱ्या लोकांच्या तुलनेत टाईप टू डायबिटीस होण्याचे प्रमाण 78 % टक्क्यांपर्यंत कमी होते.

4)वेगन डाएट केल्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते. या डाएट मुळे हाय ब्लडप्रेशरचा धोका 75 % आणि हृदयाचे इतर प्रॉब्लेमची जोखीम 42% पर्यंत कमी होते.

5)वेगन डाएट केल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

वेगन डाएट घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी:

1) हा डाएट चालू करण्यापूर्वी आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

2)वेगन डाएट मुळे जिभेची चव बिघडू शकते.

3)वेगन डाएट मुळे विटामिन बी 12 आणि विटामिन डी ची कमतरता होऊ शकते.

4) आहार तज्ञांनी जसे सांगितले आहे त्याचप्रमाणे वेगन डाएट घ्या.

5) वेगन डाएट कायमस्वरूपी घ्यायचा असेल तर आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

वेगन डाएट मध्ये समाविष्ट पदार्थ:

प्रत्येकाच्या शरीराला कॅल्शियम गरजेचे असते शाकाहारी आणि मांसाहारी आहारातून कॅल्शियम मिळते परंतु वेगन डाएट मध्ये प्राण्यांपासून मिळणारे दूध, अंडी, मध, आणि इतर दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होत नाही. मग वेगन डाएट फॉलो करणाऱ्या लोकांना कॅल्शियम कसे मिळू शकते याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून कॅल्शियम मिळते हे खरे आहे परंतु फक्त याच पदार्थांपासून कॅल्शियम मिळते असे नाही. असे कोणकोणते पदार्थ आहेत ज्यापासून कॅल्शियम मिळते आणि ते पदार्थ आपण वेगन डाएट मध्ये सुद्धा घेऊ शकतो.

1) नाचणी:

1) नाचणी हा एक नॉन डेअरी प्रोडक्ट आहे. परंतु दुधा प्रमाणेच नाचणीमध्ये ही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

2) नाचणी भाकरी, डोसे नाचणीची पेज यांसारखे नाचणीचे विविध पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकतो.

3) नाचणी भिजवून तिला मोड आणून आपण खाऊ शकतो.

4) नाचणीमध्ये कॅल्शियम बरोबरच, प्रथिने, फायबर आणि कर्बोदके यांचे प्रमाण मुबलक असते.

5)वेगन डाएट मध्ये शरीराला कॅल्शियम उपलब्ध करून देण्यासाठी नाचणी फायदेशीर ठरते.

2) तीळ:

1) काळे आणि पांढरे तीळ दोन्ही मध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

2) तिळापासून बनविण्यात येणाऱ्या तेलाचा रोजच्या आहारात समावेश करू शकता.

3)वेगन डाएट मध्ये शरीराला कॅल्शियम उपलब्ध करून देण्यासाठी तीळ किंवा तिळाचे तेल याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

VEGAN DIET IN MARATHI TIL

3) ओवा:

1) ओव्या मध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

2) नुसता ओवा खाणे किंवा रोज ओव्याचे पाणी पिणे यामुळे शरीरातील कॅल्शियम ची कमतरता भरून काढू शकतो.

3) ओव्या मध्ये कॅल्शियम बरोबरच सोडियम आणि पोटॅशियम अधिक प्रमाणात असतात.

4)वेगन डाएट मध्ये शरीराला कॅल्शियम उपलब्ध करून देण्यासाठी ओवा हादेखील एक पर्याय आहे.

VEGAN DIET IN MARATHI OVA

निष्कर्ष:

आजच्या VEGAN DIET INFORMATION IN MARATHI या लेखात आपण वेगन डाएट म्हणजे काय? वेगन डाएट चे प्रकार काय? वेगन डाएट चे फायदे काय? वेगन डाएट घेताना कोणती काळजी घ्यावी. याबद्दल सविस्तर माहिती बघितली. त्याचप्रमाणे या डाएटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो याबद्दलही थोडक्यात माहिती बघितली.

परदेशात लोकं खूप आधीपासून हा वेगन डाएट करतात. भारतामध्ये वेगन डाएट बद्दल लोकांना आता माहिती होण्यास सुरुवात झाली आहे. सिनेसृष्टीतील लोक वेगन डाएट करतात म्हणून आपणही करावे असे न करता. आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे हे ठरवूनच आपण कोणत्याही डायट सुरू करावे. कोणतेही डायट शरीराला सर्व पौष्टिक,जीवनसत्वांचा आणि खनिजांचा पुरवठा करत असेल तर ते डाएट आपल्यासाठी योग्यच असते. फक्त डायट करताना आपण जे खातो त्याचे प्रमाण योग्य असावे.

वेगन डाएट केल्यामुळे शरीराला फायदा होतोच परंतु त्याचबरोबर हा डायट चालू असताना विटामिन बी 12 आणि विटामिन डी ची कमतरता भासू शकते. हा डायट चालू करण्यापूर्वी याबद्दल सविस्तर माहिती द्या. आपल्या आहार तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. आपल्या शरीराला या डाएटची खरच गरज आहे का याची पडताळणी करा आणि मगच कोणतेही डायट सुरू करा. वेगन डाएट ते जसे तोटे आहेत तसे फायदे देखील आहेत जसे की वजन कमी करण्यास मदत होते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, आपले हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते, कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो, ब्लड प्रेशरचा धोका कमी होऊ शकतो. परंतु वेगन डाएट करताना शरीराला अशक्तपणा येणार नाही याची काळजी घ्या.

VEGAN DIET INFORMATION IN MARATHI लेखात सांगितलेली माहिती वेगवेगळ्या आहार तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार देण्यात आली आहे. परंतु कोणतेही डाएट सुरू करण्यापूर्वी ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी जरूर करावी. कोणतेही डाएट सुरू करण्यापूर्वी आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

VEGAN DIET INFORMATION IN MARATHI लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.