70+ MARATHI UKHANE FOR BRIDE | ७०+ नवरीसाठी मराठी उखाणे

70+ MARATHI UKHANE FOR BRIDE

1) भवसागरात तरंगते संसार रुपी नौका

——- रावांचे नाव घेते सर्वजण ऐका

2) भवसागरात तरंगते संसार रुपी होडी

लक्ष्मीच्या कृपेने सुखी राहो—— व——- ची जोडी

3) विनय हाच खरा स्त्रीचा अलंकार

——- रावांच्या सहवासात होवो ध्येय साकार

4) एकनाथांच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने

——– रावांचे नाव घेते मी आवडीने

5) लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी

——– रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

6) सागराला भेटण्याकरिता जाते सरिता

—— रावांचे नाव घेते तुमच्या करिता

7) संसार रुपी कादंबरीत रेखल्या भावनेच्या ओळी

—— रावांचे नाव घेते—– च्या वेळी

8) यौवनात पदार्पण केले सरले माहेरचे अंगण

——- रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण

9) मैत्रीच्या निरंजनात तेवते प्रीतीचे फुलवात

——— रावांच्या साथीने करते संसाराला सुरुवात

10) बरेच दिवसांनी आकांक्षा आज झाली साकार

——- रावांनी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार

11) बरेच दिवसांनी आकांक्षा आज झाली साकार

——– रावांनी करावा घासाचा स्वीकार

12) भुंग्याच्या सहवासात विकसित कळी

——– रावांचे नाव घेते——- च्या वेळी

13) मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरचा संगम

——- रावांच्या सहवासाने आज झाला सौभाग्याचा उगम

14) असावे नेहमी हसत मुख बोलावे नेहमी गोड

—— रावांच्या संसाराला——— ची लाभली जोड

15) भुंग्याच्या सहवासात विकसत कळी

———— रावांच्या साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी

16) विद्येचा नसावा अभिमान पैशाचा नसावा गर्व

—– रावांचे नाव घेते ऐका सर्व

17) सौभाग्याचे लेणे आहे काळी पोत

——– रावांच्या जीवनात सदैव उजळत राहो जीवन ज्योत

18) पॉलिस्टर चा कपडा कात्रीने कापला

——- रावांच्या जीवनात मला आनंद वाटला

19) कौतुक करणारे सासू-सासरे, हौशी आहे ननंद

——— रावांचे नाव घेताना होतो खूप आनंद

20) गुलाबाचे फुल दिसायला ताज

—— रावांचे नाव घेते सौभाग्य माझं

70+ MARATHI UKHANE FOR BRIDE | ७०+ नवरीसाठी मराठी उखाणे

70+ MARATHI UKHANE FOR BRIDE

21) कांजीवरम साडी बनारसी खन

——- रावांचे नाव घेते आज आहे——- सण

22) केस माझे कुरळे सावली पडली गालावर

——– रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या बोलावर

23) दवबिंदू चा जन्म असे विरण्यासाठी

——- रावांशी विवाह केला सुख जोपासण्यासाठी

24) कवीच्या कलमातून काव्य बहरे

——– रावांच्या साथीने मन माझे मोहरे

25) श्रीरामाच्या पावली वाहते फुल आणि पान

——– रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान

26) मंगळागौरी पुढे हळद कुंकवाच्या राशी

———– रावांचे नाव घेते वानाच्या दिवशी

27) नागपूरचे संत्री कोकणातले नारळ

———– रावांचे नाव घेते साधे आणि सरळ

28) द्राक्षाच्या वेलाचे त्रिकोणी पान

——– रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान

नवरदेवा साठी मराठी उखाणे https://marathisampada.com/marathi-ukhane-2/

29) गोकुळात नंदन वनात नाचतो मोर

———- रावा सारखे पती मिळाले भाग्य माझे थोर

30) सौभाग्याचा अलंकार म्हणजे हिरवा चुडा

——- रावांचे नाव घेते सुहासिनी पुढे

31) तबला वाचे पेटी वाजे छान वाजे वीणा

——– रावांचे नाव घेते वंदे मातरम म्हणा

32) सूर्याला म्हणतात रत्नाकर

—– राव माझे जन्मोजन्मीचे प्रियकर

33) सूर्याला म्हणतात भास्कर

—– राव माझे जमिनीचे प्रियकर

34) कात, लवंग, पानाचा विडा

——- रावांच्या नावाने भरते लग्नाचा चुडा

35) लग्न करून आनंदाने संसार करते सुरू

——- राव आहेत माझे प्राणपाखरू

36) पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागणे

——– रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते

37) महादेवाला बेल विष्णूला तुळस

—— रावांचे नाव घ्यायला कसला आळस

38) रानातील मेवा पोपटाने खावा

——- रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा

39) वसंत ऋतूची लागली चाहूल सृष्टी गेली खुलून

———- रावान मुळे जीवन माझे गेले बहरून

40) खारकेच्या झाडावर चढला दोडक्याचा वेल

———- रावांचे नाव घेते वाचवा इंधनाचे तेल

70+ MARATHI UKHANE FOR BRIDE

41) मृगाच्या पावसाने पालटले वनश्रीचे रूप

——– रावांचे नाव घेते वृक्षारोपण करून वाचवा जमिनीची धूप

42) रंगात रंग काळा निळा जांभळा पिवळा

——– रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला जाताना वेळेचे बंधन पाळा

43) शूटिंग शर्टिंग कट पिसेस

—— राव माझं मिस्टर मी त्यांचे मिसेस

45) स्वर्गीच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी

——– रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी

46) दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस

———— रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस

47) सागराला आली भरती नदीला आला पूर

——– रावांच्या प्राप्तीसाठी माहेर केले दूर

48) कुबेराच्या भांडारात हिरे -माणिकांच्या राशी

———- रावांचे चरण हीच माझी अयोध्या काशी

49) स्वाती नक्षत्रातील थेंबाचे शिंपल्यात होते मोती

———– रावांच्या संगतीत उजळली जीवन ज्योती

50) पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा

—— राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा

51) शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी

——रावांचे नाव घेते ——च्या दिवशी

53) चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा

———रावांच्या राणीला मोत्याचा चुडा

54) दारापुढे वृंदावन त्यात तुळशीचे झाड

——रावांच्या गुणापुढे दागिन्यांचा काय पडाव

55) महादेवाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार

—— रावण सोबत मी केला सुखी संसार

56) आई आई-वडिलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी

माहेर सोडले—— रावांच्या सौख्यासाठी

57) राम गेले वना, राज्या दिले भरता

—– रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांकरता

58) आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण

——- रावांचे नाव घेऊन बांधते मी काकण

59) शंकरासारखा पिता, पार्वती सारखी माता

——- रावा सारखा पती मिळाला स्वर्ग आला होता

60) दूरवर पसरला अंगरख्याचा घोळ

——– रावांच अक्षर जशी मोत्याची ओळ

७०+ नवरीसाठी मराठी उखाणे

61) गणेशाच्या आशीर्वादाने सगळे विघ्न पळती

——- रावांचे प्रेम पाहून सवती मनात जळती

62) चंदनाचा पाट त्याला सोन्याची हुक

——- रावांच्या हाती इंग्रजी बुक

63) सत्य अहिंसा बापूंचे गिरवा धडे

—— रावांचे नाव घेते ऐका बाई गडे

64) लवंगी वाडी, बदामी बंगला

——— रावांच्या सहवासात जीव माझा रंगला

65) चांदीच्या भांड्यात केशराचे पाणी

——- रावां सारखा हुशार कोणी नाही

66) अप्सरा मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला

—— रावांचे गुण बघून अर्पण केले मला

67) संसार सुखी सागरात पती-पत्नीचे नौका

—— रावांचं नाव घेते सर्वजण ऐका

68) तारामती राणी, हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र

——- रावांच्या नावाचे घातले मी मंगळसूत्र

69) वाद्यांमध्ये सुरेल वाद्य म्हणजे बिन

—— रावांच्या चरणी झाले मी लीन

70) संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती

—— रावांशी लग्न झाले झाली इच्छापूर्ती

71) चंद्राचा झाला उदय आणि समुद्राला आली भरती

——– रावांच्या दर्शनाने सगळे श्रम हरती

72) —— रावांची कन्या झाली—— पंतांची सून

——– रावांच्या राज्यात नाही कशाचे न्यून

73) अत्तर दानी, गुलाब दानी, विडे ठेवले करून

——— रावणा घातली माळ कुलस्वामिनीला स्मरून

74) आधी घातला चंद्रहार, मग घातली ठुशी

——- रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी

75) दसराच्या सणाला केला साखर भात

——- रावांचे नाव घेते——- पंतांची नात

76) पंढरीच्या यात्रेत विठ्ठल नामाचा गजर

—— रावांच्या सेवेला मी नेहमी हजर

77) लहानशा भिंतीवर चित्र काढून किती

—— सासूबाई च्या पोटी—— राव मोती

78) बारा वर्षे तुळशीला प्रेमाने घातले पाणी

देवतेच्या वरदानाने झाले—— रावांची राणी

79) आपल्या देशात आहे मराठी भाषेला मान

——- रावांचे नाव घेते ऐका देऊन कान

80) देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले

——- रावांशी लग्न होऊन सर्व मनोरथ पूर्ण झाले

70+ MARATHI UKHANE FOR BRIDE | ७०+ नवरीसाठी मराठी उखाणे

70+ MARATHI UKHANE FOR BRIDE

81) विवेकी लोकांच्या समुदायात विद्वानांचा मान

——– रावांचे नाव घेते ऐका देऊन कान

82) गौरीहार पुजले आणि बोहल्यावर चढले

——- रावांच्या सुखासाठी संसारात गढले

83) सोन्याच्या तारेत गुंफली एकदाणी

——- रावांचे नाव घेते——- पंतांची तान्ही

84) गाण्याच्या मैफिलीत पेटीचा सूर

—— रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर

85) आईने वाढवलं वडिलांनी पढवलं

——- रावांनी त्यांची होताच सोन्याने मढवल

86) सासर माहेर घराणे आहेत कुलीन

——- रावांच्या सहवासात झाले मी लीन

87) स्त्रीला भूषविते तिची शालीनता

—— रावांच्या सहवासात करील कर्तव्य तत्परता

88) सागर मिलनास उत्सुक होते सरिता

——– रावांच्या जीवनात सौभाग्याची पूर्तता

89) अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान

——- रावांच्या मुळे मिळाला सौभाग्याचा मान

90) रूप गुण संपदेच्या जोडीला हवे चारित्र्य

—— रावांच्या नावात आहे पावित्र्य

91)अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान

——–रावांच्या मुळे मिळाला सौभाग्याचा मान

92) सडा घातला तुळशीला घातले पाणी

—— रावांचे नाव घेते जमल्या साऱ्या मैत्रिणी

93) प्रभात समय सुखावते गाता भूपाळी

——– रावांचे नाव घेते——- च्या वेळी

94) संध्या समयास आतुरलेले जीव घरी घेतात धाव

सर्वांच्या आग्रहास्तव घेते—— रावांचे नाव

95) मनाला समाधान देते देवापुढची सांजवात

संसाराच्या सुखी वाटचालीकरता——— रावांच्या हाती दिला हात

96) तिळगुळाच्या देण्या- घेण्याने दृढ होते प्रेमाचे नात

——- रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत

97) तिळाची माया गुळाची गोडी

परमेश्वरा सुखी ठेव—— राव——- ची जोडी

98) भूतदया आहे संतांची शिकवण

——— रावां चे हृदय म्हणजे प्रीतीचे साठवण

99) नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडव

—— रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा

100) वसंत चाहुली हळदी कुंकू करतात सुवासिनी

——— रावांनी भरला आनंद जीवनी

70+ MARATHI UKHANE FOR BRIDE | ७०+ नवरीसाठी मराठी उखाणे

101) वसंतातील डाळ पन्ह देते थंडावा

——- रावांच्या सह मला आपला आशीर्वाद हवा

102) सावित्रीच्या पुण्याईने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म

——– रावांचे सौभाग्य छत्र लाभो जन्मोजन्म

103) पंचमीचा सण आला हालू लागे हिंदोळे

——- रावांच्या सहवासात माझे आनंदी मन खेळे

104) माहेरच्या मायला नाही कशाची सर

——– रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर

105) श्रावण महिना म्हणजे सणाची सुरुवात

—— रावांचे नाव घेते गौरी आल्या घरात

106) श्रावणात हिरवा साज सृष्टी देवी सजली

——- रावांच्या सौख्यात मंगळागौर पुजली

107) वर्षा ऋतूच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती

——— रावांचे नाव घेते मंगळागौरी च्या रात्री