100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे या लेखात आपण आपल्या लाडक्या नवरी बाई साठी काही मजेशीर , काही खटयाळ, पाठ करायला सोपे उखाणे बघणार आहोत . आपल्याकडे लग्नात ,सण-समारंभात ,हळदी -कुंकू किंवा धार्मिक कार्यक्रमात उखाणे घ्यायची प्रथा आहे .नेहमीचेच पारंपारिक उखाणे तर सगळ्यांच परिचित आहेत, आणि नेहमीचेच उखाणे ऐकून खूप कंटाळवाणे झाले असेल तर काही आधुनिक ,modern आणि मजेशीर उखाणे आपण बघणार आहोत . तुमच्या घरातील एखाद्या कार्यक्रमाला यातील उखाणे घ्या , आवडले तर मैत्रीणीना पण पाठवा .

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे :

१००+ नवरीसाठी मराठी उखाणे

रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा

जीवनाचा खेळ समजला —-रावांमुळे सारा

सोन्या चे ताट चांदीची वाटी

सात जन्म घेईल मी —-रावांसाठी

ज्याचा जसा भाव तसा देव त्याला दिसते ,

—– रावांची प्रतिमा नेहमी माझ्या मनी वसते

ध्येय प्राप्तीसाठी प्रत्तेकाने झटावे,

—– रावांचे नाव घेण्यास मागे का हटावे

वन , टू , थ्री ,

—– रावांचे बोलणे एकदम फ्री

रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाले मोहित ,

—- रावांना आयुष्य मागते सासू- सासऱ्या सहित

जास्वंदीचे फुल गणपतीला वाहिले ,

—– रावांसाठी —- गाव पहिले

कळत नाही माझेच मला , आहे स्वप्न कि भास ,

—- रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास

पती पत्नी असतात सुख दुखाचे साथी ,

—– रावांचे नाव घेते आशीर्वाद असुद्या माथी

प्रांजळ मनाने बोलणे , मन मोकळे हसणे ,

—- रावांच्या सहवासात कशाला हवे रुसणे

कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार ,

—— रावांचे नाव घेते कर संसार नौका पार

सूर्याला कुणी म्हणतात रत्नाकर कुणी म्हणतात भास्कर

—— राव माझे जन्मो जन्मीचे प्रियकर

शुटींग , शर्टिंग , कटपिसेस,

—– राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस

सुख दुखाच्या उन पावसात , चालतो संसाराचा खेळ ,

—– रावांचे नाव घेते —- ची वेळ

बालपण गेले मातापित्याच्या पंखाखाली ,

तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रिणींची साथ

संसाराच्या वळणावर मिळाला —– रावांचा प्रेमळ हात

आली आली संक्रांत घ्या सौभाग्याच वाण ,

—– राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण

श्रीमंत माणसाना पैशांची धुंदी ,

—– रावांचे घ्यायचे पहिलीच संधी

तुकारामाचा अभंग वामनाची कविता ,

—- राव आहेत सागर मी त्यांची सरिता

सौभाग्याच लेण काळी पोथ

—– रावांच्या जीवनात उजळीन जीवन ज्योत

नाही मोठे पणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा

—— रावांच्या संसारी आपण सर्वांच्या शुभेच्छा

संसार रुपी करंडा मनोरूपी झाकण

—-रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात

—– रावांचे नाव घेते —- च्या अंगणात

झाशीच्या राणीचा स्वातंत्र्यासाठी झाला घात ,

—– रावांचा जन्मोजन्मी धरेन मी हात

कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती

—– राव माझे पती माझे भाग्य किती

सनई आणि चौघडे वाजे सप्त सुरात

—- रावांचा नाव घेते —- च्या घरात

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे :

खडी साखरेची गोडी अन फुलांचा सुगंध

——- रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद

श्रीमंत असो व गरीब असो स्त्रीयांना आवडते माहेर

—- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व

—– रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला

——रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला

बहिणी सारख्या नंदा भावा सारखे दिर ,

—– रावांचे नाव घेण्यासाठी झाले मी अधीर

वडिलाची छाया आईची माया

—– रावांच्या सुखासाठी झिजवते काया

बोलताना जिभेचा जाऊ देऊ नये तोल ,

—-रावांच्या प्रीती इतके नाही कशाचे मोल

चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा

—– रावांसारखा गुणी पती जन्मोजन्मी मिळावा

सासूबाई आहेत प्रेमळ सासरे आहेत दयाळू

—राव तर आहेत अतिशय मायाळू

गुलाब पेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी ,

—— रावांचे नाव घेते —– च्या वेळी

हुरहूर दाटली मनी जीव माझा बावरला ,

—– रावांच्या ओढीने माहेरचा मोह सोडला

वडिलांनी केले लग्न भवानी दिले आंदन

मामानी केला आहेर —— रावांसाठी सोडले प्रेमाचे माहेर

कस्तुरीचा जन्म सुगंध करिता

माझे जीवन —– रावांकरिता

चंद्राचा होतो उदय समुद्राला येते भरती

—– रावांच्या दर्शनाने माझे श्रम हरती

संगीत नाटकात नाटक सुभद्राहरण ,

—– रवंचे नाव घ्यायला हरतालिकेचे कारण

सोन्याचे तबक चांदीची परात ,

—– रावांचे नाव घेते नव्या घरात

श्रीमंतांची श्रीमंती , गरीबाचा देव वाली

—– रावांचे नाव घेऊन मी झाले भाग्यशाली

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे :

नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा

—— रावांच्या संगतीने संसार करते सुखाचा

सोन्याच्या बासरीत पाचूचा खडा ,

—— राव अन माझा सात जन्माचा जोडा

रिमझिम पाऊस पडे मोत्याचा सुटला वारा

—— रावांच्या घरी येताना डोळयाला लागतात धारा

चिकन सुपारी फोडावी दाताने ,

—— रावांचे काकान सोडावे उजव्या हाताने

पोथी , पुराने वाचून बोध होतो मनाला ,

—– रावांचे नाव घेते वड सावित्री सणाला

चहा केला नेऊन दिला , दुधाने भरला कप

—— रावांसाठी केले अठरा वर्षे तप

चांदीची कुयीरी हळद कुंकवाने भरावी

—– रावांची सेवा जन्मो जन्मी घडावी

आता वाजले दहा / सहा ,

—–राव म्हणतात माझ्याकडे एकदा तरी पहा

काचेची बांगडी केसापेक्षा बारीक ,

—- रावांचे नाव घेते आज आहे —-तारीख

२०० शेची दमनी ३०० शे चा बिछाना

—– राव बसले धुरीवर चंद्र सूर्य दिसेना

अडचणी च्यावेळेस कामात पडते साठवण ,

—– राव इथे नसले कि येते त्यांची आठवण

झुन झुन झुण्यात , बसली मेण्यात ,

कांचोळी अंगात गुळाला भांगात

जायफळ वटीत, लवंगा दोळे मुठीत

हंड्यावर परात परातीत भात भातावर तूप तुपासारखा रूप

रूपासारखा जोड —— रावांना म्हणते ,

सातही काम सोडा अन माहेरी चला !

दारी होती विहीर , विहिरीवर होते बारा हंडे,

बारा हंड्यांवर बारा करंडे , बारा कारांड्यावर बारा वाती ,

—— राव माझे शंकर मी त्यांची पार्वती !

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे :

१००+ नवरीसाठी मराठी उखाणे

सासू सासरे ज्ञानी , आई वडील सद्गुणी

—– रावांच्या नावाने गळ्यात घालते काळे मनी

हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम ,

—- रावांचे चरण हेच माझे चारही धाम !

सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मनी ,

—– राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी

काचेच्या आलमारीत गणपतीची मूर्ती ,

——राव बसले पूजेला मी ओवाळते आरती

नाशिक केले पंढरपूर केले , करायची राहिली काशी

—— रावांचे नाव घेते —-ची भाची

कुबेराच्या भांडारात हिरे मानकाच्या राशी

—– रावांचे नाव घेते हीच माझी अयोध्या काशी

द्वारकेत कृष्ण , अयोध्येत राम

—– रावांचे चरण हेच माझे चारही धाम

काचेच्या पेल्यात सुख दुखाचे पेय

—— रावांना कीर्ती मिळावी हेच माझे ध्येय

असंख्य तारे नभात पाहावे निरखून ,

—— रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून

भाऊ माझा दादा, बहिण माझी ताई

—— रावांच्या साठी सोडली प्रेमाची आई

मिठाचा सत्याग्रह झाला समुद्र काठी

——-रावांचे नाव घेते तुमच्या आग्रह साठी

जोडावी केली , तोरड्या केल्या नाथ केली जाईची ,

—- रावांसाठी आशा सोडली आईची !

पातल्या केल्या हात दिसे सवाई

वडिलांनी —- रावांना केले जावई !

कोल्हापूरच्या अंबा बाईला सोन्याचा साज

—– रावांच्या बरोबर शुभ मंगल झाले आज

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे :

लग्न प्रसंगी लोक करतात आहेर

—— रावांसाठी सोडले आई वडील आणि माहेर

गुलाबाचे झाड फुलांनी वाकले ,

—– रावांमुळे सासरी पाऊल टाकले

इंग्लिश मध्ये चाकुला म्हणतात नाईफ ,

—– राव माझे हसबंड मी त्यांची वाईफ !

यमुनेकाठी कृष्ण खेळत होता खेळ

—— रावांचे नाव घेते संध्याकाळची वेळ

अशोक वनात लावली केळी

—— रावांचे नाव घेते संध्याकाळची वेळ

इंग्लिश मध्ये भिंतीला म्हणतात वाल ,

—–रावांच्या नावाचे कुंकू लावते लाल !

अजुन नवीन आणि नवरदेवासाठी उखाणे हवेत मग हे हि बघा

१०० मराठी उखाणे संग्रह https://marathisampada.com/marathi-ukhane/

७०+ नवरदेवासाठी मराठी उखाणे https://marathisampada.com/marathi-ukhane-2/

प्रेमरूपी नंदादिपात लावते प्रीतीची फुलवात ,

——- रावांचे नाव घ्यायला केली आज पासून सुरुवात

शेगावच्या गजानना वंदन करते तुला

—- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला

प्राण्यांमध्ये हत्ती आहे लठ्ठ ,

—– रावांचे नाव घेण्यासाठी —— चा हट्ट

—– भाजीला सुवासिक मसाला ,

——रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला

हिमालय पर्वतावरून नदी वाहते कलिका

—— रावांचे नाव घेते —— पाटलांची बालिका

देवासमोर काढली रांगोळी मोराची

—– रावांचे नाव घेते स्नुषा थोराची

सुशील सासूकडे पाहून आईची नाही येत आठवण

—— रावांच्या जीवनात सुख समृद्धीची साठवण

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,

—– रावांचे नाव असते ओठावर, पण प्रश्न असतो उखाण्याचा

यमुने काठी कृष्ण वाजवीत होता बासरी ,

—– रावांमुळे आले मी सासरी

शब्द तिथे नाद , कवी तिथे कविता

—— रावांची जोड जणू सागर आणि सरिता

आगगाडीची शिट्टी , मोटारीचा भोंगा , सायकलची घंटी ,

—— रावांच्या गळ्यात सोन्याची कंठी

नव्या दिशा , नव्या आशा नव्या घरी पदार्पण

—— रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण

हिरवी साडी बुट्ट्याचा खण

—– रावांचे नाव घटे —- चा सण

लाल चुटूक मेंदी , हिरवागार चुडा

—- रावांसाठी जीव झाला माझा वेडा

द्राक्ष्यां च्या वेळी खाली चरत होती हरणी

आई वडिलांनी अर्पण केले —— रावांच्या चरणी

फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे

—– रावांच्या बाळाचे आज आहे बारसे

पारिजातकाचे फुल मधोमध पिवळे

—-रावांचे रूप कृष्णासारखे सावळे

संथ वाहते गंगा यमुना आणि सरस्वती

—- रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती

ठेम्बाठेम्बाची रांगोळी शेवटच्या ठेम्बा पर्यंत जोडावी

—–रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी

नागपंचमीच्या सणी सख्या पूजती वारुळाला

——-रावाविना शोभा नाही वैभवच्या देऊळा ला

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे :

१००+ नवरीसाठी मराठी उखाणे

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी

—— रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी

नाही काशी म्हणू घेते मी नाव

—- रावांच्या बाळाला दिले तुम्ही गोड नाव

ध्येय , प्रेम आकांक्षांची जिथे होतसे पूर्ती

अशा —— रावांची माझ्या हृदयात मूर्ती

हिमालय पर्वतावर मोरणी फोडला टाहो

—-रावांचे नाव नेहमी माझ्या हृदयात राहो

100+ Modern Marathi Ukhane For Bride |१००+ नवरीसाठी मराठी उखाणे :

बंधनात असते अवीट गोडी

म्हणून —-रावांनी आणि मी घालून घेतली लग्नाची बेडी

नंदन वनात फुलली सोन्याची कमळे

—-रावांच्या मुले मला संसाराचा अर्थ कळे

इंग्लिशमध्ये आईला म्हणतात मदर

— रावांचे नाव घेते सोडा माझा पदर

चकोराला असते चांदण्याची आस

—– रावांना देते —- चा घास

मुळा मुठेच्या संगमावर वसले सुंदर पुणे

—— रावांच्या संसाराला नाही कशाचे उणे

कॉलेज मध्ये असतानाच —— रावांनी मला हेरलं

शिक्षण संपल्या बरोबर त्यांनी मला वरल

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात ,

—–रावांचे नाव नेहमी माझ्या मनात

मित्रांच्या घोळक्यात उठून दिसते स्वारी

——- रावांची झाले मी भाग्यवान खरी

गोकुळात आला कृष्ण सर्वाना झाला हर्ष

—– रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष

सोन्याच डोरलं सोनाराने घडवल

—रावांच्या नावासाठी —— बाईन अडवल

कोजागिरीच्या चांदण्यात हातात घेतला हात

——-राव देणार मला जन्मभराची साथ

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा

—–रावांच्या वंशात लावीन दीप नवा

दहा तून दहा गेले बाकी राहिले शून्य

—— रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य