100 MARATHI UKHANE FOR FEMALE | महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे, सण उत्सवांच्या वेळी महिलांना नाव घ्यावे लागते, अशावेळी पटकन नाव आठवतेच असे नाही, यमक ही लवकर जुळत नाही. अशावेळी काय करावे सुचत नाही. म्हणूनच तुमच्यासाठी काही सहज सोपे आणि पटकन लक्षात राहतील असे भन्नाट मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. उखाणे तुम्ही कोणत्याही सण उत्सवात, लग्नात, मंगळागौरीला घेऊ शकतात.
१) शुभ दिनी मंगलकाली मंगलमूर्ती ये घरा
——– रावांच्या जीवनात भाग्योदय झाला खरा
२) दसऱ्याचे महत्व सीमा उल्लंघनात
——– रावांच्या सोबत सुखी झाले या नंदनवनात
३) दारापुढे वृंदावन त्यात आहे तुळशीचे झाड
—— रावांच्या गुणांमुळे दागिन्यांचा काय पाड
४) वैशाखाच्या महिन्यात उन्हाळ्याचा जोर
——- घराण्यात——- राव पुरुष थोर
५) श्रावणाच्या महिन्यात जिकडेतिकडे पाणी
——— माझ्या भेटीसाठी मी आतुर चातकावानी
६) मखमली शेजेवर अत्तराचे सिंचन
करते सदा मनामध्ये—— रावांचे चिंतन
७) श्लोक रामदासांचे आहेत किती छान
——– रावांच्या संसारात हरवले माझे भान
८) भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळीन
——– रावांचे नाव घेते——— दादा ची बहीण
९) लांबसडक वेणीत शोभे गुलाबाचे फुल
———— रावांना बघताच पडली मला भूल
१०) शिवाजी सारखा राजा गादीवर बसावा
———- रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा
११) चांदीच्या समईत रेशमाची वात
——- रावां सोबत करते संसाराला सुरुवात
१२) सारच गेले बदलून, माझं नावही नाव
————- रावांनी तिला मला सर्वच जे हवं
१३) मंगळागौरीसाठी जमवली सोळा प्रकारची पत्री
———– रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या रात्री
१४) नको सोन नको मोती नको मला चंद्रहार
———- रावांचं ज्ञान आणि कर्तृत्व हेच माझे अलंकार
१५) खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी
———- रावांचे नाव घेते——– च्या दिवशी
१६) केतकीच्या वासाने मन होते धुंद
——– रावांच्या संसारात आनंदच आनंद
१७) इंद्रधनुष्याच्या झुल्यावर मन झोके घेई
———– रावांच्या संसारी बाळकृष्ण येई
१८) ताटभर दागिन्यांपेक्षा माणसे असावी घरभर
——— रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर
१९) कोकिळेच्या गाण्याने लागली वसंताची चाहूल
——-रावांबरोबर टाकते संसारात पाऊल
२०) द्राक्षाच्या वेलीची दाट पसरते सावली
——- रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
100 MARATHI UKHANE FOR FEMALE | महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे
२१) सौभाग्यकांक्षिणी कालची झाले सुहासिनी आज
——— रावांनी दिला सौभाग्याचा साज
२२) गजाननाची कृपा, गुरूंचा आशीर्वाद
———– रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
२३) देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घेतला हातामध्ये हात
—————- रावांची लाभली मला सात जन्मासाठी साथ
२४) सुगंधात न्हाल्या दिशा आहे
——— रावांचे नाव नेहमी माझ्या ओठी येई
२५) प्रेमळ माझे आई वडील, वत्सल सासू-सासरे
——- रावांच्या घरी येणार आता तारे हसरे
२६) निळ्याभोर आकाशात चंद्राची प्रभा
———– रावांच्या नावामुळे कुंकवाला आली शोभा
२७) पायातल्या जोडव्यात माहेरचे स्मृती
——- रावांच्या प्रेमाने गेली माझी भीती
२८) सुहासिनी ची पहिला व्रत मंगळागौरीची पूजा
——— रावांचे नाव घेणे म्हणजे गोड सजा
२९) नीलमनी आकाशात लक्ष्मी करते वास
———– रावांना भरवते करंजीचा घास
३०) चंद्र, सूर्य, नक्षत्रांनी शोभा येते नभाला
——- रावांच्या प्रेमाचा सुगंध माझ्या मनाला
मॉडर्न मराठी उखाणे https://marathisampada.com/100-modern-marathi-ukhane-for-bride/
नवरदेवासाठी मराठी उखाणे https://marathisampada.com/marathi-ukhane-2/
३१) चंद्रसूर्य नक्षत्रांनी शोभा येते नभाला
——– रावांच्या प्रेमाचा सुगंध माझ्या संसाराला
३२) सरस्वतीच्या देवळात तांदळाच्या राशी
———– रावांचे नाव घेते———- च्या दिवशी
३३) माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून
——— रावांच्या संसारात मन घेते वळून
३४) प्रसन्न माझे घरकुल शांती येथे नांदे
——– राव मला पती लाभले थोर भाग्य माझे
३५) रात्री फुलराणी देते सुगंध
——– रावांच्या जीवनात नेहमीच असतो आनंद
३६) लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
———— रावांचे नाव घेते तुमच्यासाठी
३७) उत्तम कुळी जन्मले, उच्च कुळी आले
——— रावांचे नाव घेऊन भाग्यशाली झाले
३८) संसार रुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते——- रावां बरोबर
३९) आई-वडिलांनी केले लग्न, लग्नानंतर केले कन्यादान
——- रावांना मिळाला——- जावयाचा मान
४०) निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात
अर्धांगिनी म्हणून दिला——— रावांच्या हातात हात
100 MARATHI UKHANE FOR FEMALE | महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे | स्त्रियांसाठी मराठी उखाणे
४१) श्री गजानन महाराजांना वंदन करून पहिला पाऊल टाकलं जपून
———- रावांबरोबर चालता चालता देहभान गेले विसरून
४२) अभिमान नसावा रूपाचा गर्व नसावा पैशाचा
——— रावांचा संसार करते सुखाचा
४३) राजे बांधतात कोल्हापूर फेटा
———- रावांच्या संसारात माझा आहे अर्धा वाटा
४४) सुखी माझ्या संसारात नित्य लागे सांजवात
पावलो पावली मिळो मला——– रावांची साथ
४५) काचेच्या वाटीत ठेवली बर्फी
——— रावांचं नाव ऐकण्यासाठी सर्वांनी केली गर्दी
४६) वडिलांना होती काळजी कसे मिळेल घर
——- रावांसारखे शांत मिळाले वर
४७) शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी
आज पासून———– राव झाले माझे जीवन साथी
४८) भरल्या ताटाला देते रांगोळी ची शोभा
——— रावांच्या विद्येला आहे विनया ची प्रभा
४९) कळलेच नाही भातुकली संपून स्वामिनी मी कधी झाले
——— रावांच्या सहवासात आनंदाने नहाले
५०) गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा
————– रावांच्या नावाने भरला हिरवागार चुडा
५१) ताऱ्यांचे लुकलुकन चंद्राला आवडलं
——- रावांनी जन्मभरासाठी मला निवडल
५२) वादळ वाऱ्यासह आला पाऊस
—— रावांनी केली नाही——- ची हाऊस
५३) सात पावले चालून जाता स्वर्ग आले हाता
——– रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरता
५४) दत्ताला शोभे गाय महादेवाला शोभे नंदी
——– रावांच्या जीवनात मी आहे सदैव आनंदी
५५) राम-लक्ष्मण निघाले, सीता म्हणते मीही येते
————- रावांचे नाव तुमच्या आग्रहा करिता घेते
५६) वडिलांचा आशीर्वाद मातेचे माया
———- रावांसारखे पती मिळाले हीच आहे ईश्वराची दया
५७) हिरव्यागार पालवीने लागते वसंताची चाहूल
——– रावांचे नाव घेऊन टाकते संसारात पाऊल
५८) शुभ्र चांदनी शुभ्र तिची कला
——– रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लागले मला
५९) हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात
—————- रावांचे नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात
६०) स्वच्छ घर आहे आरोग्याचे मूळ
———– रावांसाठी सोडले——- चे कुळ
100 MARATHI UKHANE FOR FEMALE | महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे | नवरीसाठी भन्नाट मराठी उखाणे
६१) छोटेसे घरकुल माझे सामावून घेते साऱ्यांना
———— रावांची प्रेमळ साथ तृप्त करते मनाला
६२) वटवृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचून केली कीर्ती
———— रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी
६३) चेहरा आहे मनुष्य मनाचे दर्पण
———- रावांना केले मी सर्वस्व अर्पण
६४) सोन्याचे घागर अमृताने भरावी
——— रावांची सेवा जन्मभर करावी
६५) माहेर सोडून येताना डोळ्यात होते अश्रू
———— रावांच्या प्रेमात संसारात ओठावर असते हसू
६६) सत्यवानाची सावित्री ने केला यमाचा पिच्छा
——— राव सुखी राहोत हीच माझी सदैव इच्छा
६७) गीतेत जसा भाव, फुलात तसा गंध
———- रावांबरोबर जुळले जन्मोजन्मीचे बंध
६८) पूजा केली मनोभावे गौराई म्हणे काय हवे
———— राव आणि माझ्या संसाराला देवी तुझे आशीर्वाद हवे
६९) दाग दागिने नको नको चंद्रहार
———– राव आहेत माझा अलंकार
७०) यमुनेच्या डोहात कृष्ण वाजवतो पावा
——– रावांचा आणि माझा संसार सुखाचा व्हावा
100 MARATHI UKHANE FOR FEMALE | महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे
७१) परिसाच्या संगतीत राहून लोखंडाचे झाले सोने
——– रावांमुळे मला लाभले सौभाग्याचे लेणे
७२) मंगळसूत्राच्या वाट्यानी जोडले सासर आणि माहेर
———- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
७३) मनी आणि मंगळसूत्र हेच बायकांचे लेणे
———- रावां करिता स्वीकारले——– घराणे
७४) विठ्ठलाचे पायी वीट झाली भाग्यवंत
——– रावांच्या छायेत मी हे झाले भाग्यवंत
७५) कर्ज काढून सहन करणे हे आहे दूषण
———- राव आहेत माझे भूषण
७६) रामाने केले शिवधनुष्य भंग
——- रावांच्या जीवनात मी झाले दंग
७७) कोजागिरी पौर्णिमा ला असते शरदाचे चांदणे
———– राव आहेत सर्वात देखणे
७८) शरदाच्या चांदण्यात चंद्र करतो अमृताचा वर्षाव
——– रावांच्या यशाने झालाय त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव
७९) सासू-सासरे यांच्या छायेत मला नाही काही कमी
——– राव हेच माझ्या सर्वस्वाचे स्वामी
८०) सद्सद विवेक बुद्धीला असे शिक्षणाचे वरदान
——– रावांच्या संसारात देईल सर्वांना मान
100 MARATHI UKHANE FOR FEMALE | महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे |MARATHI UKHANE FOR WOMENS
८१)——— रावांच्या कर्तृत्वाची पाहून चढती कमान
त्यांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान
८२) राम लक्ष्मण सीता निघाले वनी
———— रावांचे नाव पडो सर्वांच्या कानी
८३) निसर्गाला नाही सुरुवात नाही अंत
———— राव आहेत मला पसंत
८४) नव्या नवरीचा आज उतरला साज
——— रावांची झाले खऱ्या अर्थाने गृहिणी आज
८५) सहवासाने वाढते संसारात रंगत
———– रावांचे नाव घेताना वाटते मला गंमत
86) खवळला समुद्र लाटा आल्या काठोकाठ
———- रावांचे नाव घेते——- च्या पाठोपाठ
87) नको मला सोन चांदी नको मला शालू शेला
———- रावांच्या संसारासाठी देह अर्पण केला
८८) थोडा गुण सोन्याचा थोडा गुण सोनाराचा
——— रावांनी आणि मी केला संसार सुखाचा
८९) राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात
——— रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात
९०) संसारात करावी लागते तडजोड
———– रावांची लाभली मला छान जोड
100 MARATHI UKHANE FOR FEMALE | महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे
९१) स्त्रीच्या जातीने नम्रतेने वागावे
———– रावांसारखे पती मिळाले आणि काय मागावे
९२) पदस्पर्शाने ओलांडते उंबरठ्यावरचे माप
——— रावांची पत्नी म्हणून गृहप्रवेश करते आज
९३) दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य
———– रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य
९४) कोजागिरीच्या चांदण्यात हाती घेतला हात
———- राव देणार मला जन्मभराची साथ
९५) सोन्याचा डोरलं सोनाराने घडवलं
——— रावांच्या नावासाठी———– बाईंन अडवला
९६) गोकुळात आला कृष्णा सर्वांना झाला हर्ष
——— रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष
९७) कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
———– रावांचे नाव नेहमी माझ्या मनात
९८) नंदन वनात फुलली सोन्याची कमळे
———- रावांच्या मुळे मला संसाराचा अर्थ कळे
९९) बंधनात असते अवीट गोडी
म्हणून——– रावांनी आणि मी घालून घेतली लग्नाची बेडी
१००) कॉलेजमध्ये असतानाच——— रावांनी मला हेरलं
शिक्षण संपल्याबरोबर त्यांनी मला वरलं